आज गुरुवार स्वामीचा वार.. गुपचूप ठेवा इथे 1 हळकुंड गरिबी निघून जाईल, पैसा इतका येईल की…

मित्रांनो गुरुवारच्या दिवशी आपल्या पर्स किंवा पॉकेटमध्ये एक हळकुंड आणि त्यासोबत अजून काही धनसमृद्धीकारक वस्तु आपण नक्की ठेवा. या वस्तु ठेवण्यापूर्वी कोणता मंत्र म्हणावा आणि त्या मंत्राच्या प्रभावाने आपल्या घरात सुखसमृद्धी कशाप्रकारे नांदू लागते, अगदी संपुर्ण माहिती आपण जाणून घेणार आहोत. मित्रांनो गुरुवारचा दिवस देव गुरू बृहस्पतींचा वार मानला जातो आणि ज्या व्यक्तीच्या जीवनात देव गुरू बृहस्पतींची कृपा बरसते त्या व्यक्तीला अपार धनप्राप्ती नक्की होते. म्हणजेच धन, वैभव, पैसा त्या व्यक्तीच्या जीवनात नक्की येतो.

हा उपाय आपण विशेष करून गुरुवारच्या दिवशी करायचा आहे. अगदी शुक्ल पक्ष असेल किंवा कृष्ण पक्ष असेल कोणत्याही पक्षातील कोणताही गुरुवार हा उपाय करण्यासाठी अतिउत्तम मानला जातो आणि एकदा हा उपाय केल्यानंतर हा उपाय पुढे येणाऱ्या कोणत्याही गुरुवारी पुनरावृत्त करू शकता. त्याचा प्रभाव अनेक पटींनी वाढतो. हा उपाय देव गुरू बृहस्पतींना तर प्रसन्न करवतोच मात्र सोबतच देवीदेवतांचे जे कोशाध्यक्ष आहेत कुबेर महाराज. तर हा गुरुवार कुबेर देवांचा सुद्धा मानला जातो.

या दिवशी केलेली देव गुरू बृहस्पतींची पुजा ही भगवान श्रीविष्णूंना प्रसन्न करवते. आपण हा उपाय करण्यासाठी गुरुवारच्या दिवशी सकाळी लवकर उठावे, स्वच्छ स्नान करावे. स्वच्छ वस्त्र परिधान करावे आणि त्यांनतर ज्या प्रकारे नित्य आपली देवपुजा करतो त्याचप्रमाणे देवपुजा करायची आहे आणि ही देवपुजा करत असताना आपल्या देवघरासमोर स्वच्छ पाटावरती एक लाल रंगाचे वस्त्र अंथरावे आणि त्या कापड्यावरती आपण एक हळकुंड ठेवावे.

हे हळकुंड खराब झालेले, किडलेले किंवा त्याला किड वगैरे लागलेली नसावी, असे एक हळकुंड ठेवायचे आहे. जर तुमच्याकडे गोमती चक्र असतील तर एक गोमती चक्र गंगा जलाने स्वच्छ धुवून गंगा जल नसेल तर साध्या पाण्याने धुवून हे गोमती चक्र सुद्धा ठेवू शकता. जर कवडी असेल कोणतीही असेल लाल कवडी चालते, पांढरी, पिवळी चालते, लक्ष्मी कवडी चालते, कोणतीही एक कवडी आपण त्याठिकाणी अवश्य ठेवावी. जर केशर असेल तर केशराचे एक दोन दाणे म्हणजे काड्या ठेवाव्या. या सर्व वस्तु लक्ष्मी दायक, समृद्धीदायक आहेत.

या वस्तु ज्या ठिकाणी असतात माता लक्ष्मी त्या ठिकाणी नक्की धावून येतात. लक्ष्मीची कृपा नक्की बरसते. तर जितक्या वस्तु तुमच्याकडे असतील तितक्या वस्तु आपण या ठिकाणी ठेवाव्यात आणि तुमच्याकडे कुबेर यंत्र असेल विशेष करून तांबे या धातूवरती बनवलेलं कुबेर यंत्र असेल तर हे कुबेर यंत्र सुद्धा या लाल रंगाच्या कपड्यावरती आपण ठेवू शकता. त्यानंतर आपण मनोभावे आपली देवपुजा करायची आहे. देवपुजा करताना ज्या आपण वस्तू ठेवलेल्या आहेत यांना सुद्धा हळदी कुंकू लावू शकता. पुजा संपन्न झाल्यानंतर हा मंत्र या वस्तूंना भारित करतो. या वस्तूंमध्ये जे काही देवतत्व आपल्याला आकृष्ट करायचे आहे त्या देवतत्वाला आकृष्ट करण्याचे काम हा मंत्र करत असतो.

मंत्र आहे “ओम बृ बृहस्पतये नमः”, ओम बृ बृहस्पतये नमः”. या मंत्राचा 108 वेळा जप करून लाल कपड्यातच आपण या वस्तु गुंडाळून आपल्या पर्स किंवा पॉकेटमध्ये ठेवायच्या आहेत. जेव्हा जेव्हा तुम्ही घराबाहेर पडाल सातत्याने या वस्तु तुमच्या सोबत ठेवा आणि तुमच्यासोबत ठेवणे शक्य नसेल तर आपल्या पर्स, पॉकेट, तिजोरीमध्ये किंवा ज्या ठिकाणी पैसे ठेवता, पैशाचा डबा असेल, गल्ला असेल कोणत्याही ठिकाणी या वस्तु ठेवा. ज्या ठिकाणी या वस्तु असतील लक्ष्मी, धन, पैसा, वैभव, ऐश्वर्य आपोआप खेचले जाईल. नक्की करून पाहा.

मित्रांनो कोणत्याही प्रकारची अंध श्रद्धा पसरवणे हा आमच्या पेज चा उद्देश नाही. केवळ भारतीय समाज मान्य असलेल्या कथा, उपाय, विधी आपल्या पर्यंत पोहचवले जातात आमचे पेज कोणत्याही प्रकारच्या अंध श्रद्धेला खतपाणी घालत नाही. इथे शेयर होणारे लेख हे फक्त माहिती साठी आहेत. त्यांचा वापर अंध श्रद्धा म्हणून करू नका.

तुम्हाला काय अजून वाचायला आवडेल हे आम्हाला कमेंट मार्फत नक्की कळवा कारण तुमची एक कमेंट आमचे प्रोत्साहन वाढवत असते. तसेच आमचे फेसबुक पेज हि नक्की लाईक करा जेणेकरून तुम्हाला आमच्या सर्व अपडेट मिळतील आणि त्याच बरोबर आमचे फेसबुक पेज शेअर हि नक्की करा धन्यवाद.

Leave a Reply

Your email address will not be published.