या ८ लोकांवर हनुमानजी सदैव नाराज राहातात, ज्यामुळे हे लोक कायम दरिद्रीच राहातात…

“जय हनुमान ज्ञान गुणसागर, जय कपीस तिहु लोकउजागर, रामदूत अतुलीत बलधामा, अंजनीपुत्र पवनसुत नामा”

नमस्कार मित्रांनो, तुमचे सगळ्यांचे स्वागत आहे. मित्रांनो, हनुमान जे कलीयुगातील एक असे देवता आहेत जे आपल्या भक्तांच्या रक्षणासाठी त्वरित पोहोचतात. आपल्या भक्तांची सारी संकटे दूर करणारे हनुमान अष्टसिद्धीचे स्वामी आहेत. ते आपल्या भक्तांची प्रत्येक इछा पूर्ण करतात. जे भक्त रोज “हनुमान चालीसा” याचा पाठ करतात व श्रीरामाच्या नावाचा जप करतात त्यांच्या जीवनावर कधीही वाईट किंवा असुरी शक्तींचा प्रभाव होत नाही.

मित्रांनो, हनुमानजी चिरंजीवी आहेत. त्यांना प्रभू श्रीरामाने कलियुगाच्या अंतापर्यंत मृत्युलोकात निवास करण्याचे वरदान दिलेले आहे. म्हणूनच, हनुमान आज पण आपल्या पूर्ण स्वरूपासकट पृथ्वीवर आहेत व यांची काही उदाहरणे आपल्याला बघावयास मिळतात. हनुमानजीनी साक्षात आपल्या काही भक्तांना दर्शन पण दिलेले आहे. आज पण असे मानले जाते, की ज्या स्थानी नियमित श्रीरामकथेचा पाठ केला जातो, ती कथा ऐकण्यासाठी हनुमानजी अवश्य येतात.

हनुमानजी ज्याप्रमाणे आपल्या भक्तांची रक्षा करतात त्याचप्रमाणे ते दुष्टाना शिक्षा पण देतात. प्राचीन धर्मग्रंथानुसार काही कामे अशी आहेत जी केल्यामुळे व्यक्ति हनुमानाच्या कृपेपासून वंचित राहातो. त्यांना कलीयुगातील पापी मनुष्य मानले गेले आहे. जर कोणी स्त्री किंवा पुरुष असे काम करतो, तर तो हनुमानाला कधीच प्रसन्न करू शकत नाही. अशा व्यक्तिला हनुमानजी शिक्षेला पात्र अशी व्यक्ति मानतात. ज्या घरातील सदस्य असे काम करतात, अशा घरात माता लक्ष्मीचा निवास होत नाही व हनुमानजी
त्यांच्यावर कधीही कृपा करीत नाहीत.

या कार्यांसंबंधी अंगधने भर सभेत रावणाला सांगितले होते, या सगळ्या पापांमुळेच हनुमानजी यांनी लंका सोडण्यापूर्वी तिला नष्ट केले होते. त्यामुळे ज्या घरात अशी कामे होतात, त्या स्थानावरून हनुमानजी निघून जातात व अशा घरात राहाणार्‍या लोकांवर
नेहमी दुर्भाग्य व दारिद्र्य येते. सुख समृद्धि अशा घरात येत नाही. चला तर मग जाणून घेऊया.

सगळ्यात पहिले, ज्या घरातील लोकांचे कोणतेही आराध्य नाही, ज्यांचा कोणत्याही देवावर विश्वास नाही, ईश्वराचा अपमान ज्या घरात केला जातो, अशा घरात राहाणार्‍या लोकांवर हनुमानजी कधीच कृपा करत नाहीत. ज्या स्थानी श्रीरामाचा अपमान केला जातो, अशा दुष्ट लोकांना शिक्षेस पात्र समजले जाते.

दुसरी गोष्ट म्हणजे, जिथे मांस, दारू याचे सेवन नियमित केले जाते. शास्त्रानुसार, ज्या घरातील लोक रोजचं मांसाचे सेवन करतात किंवा दारूचे सेवन करतात, अशा लोकांना कधीच हनुमानजींची कृपादृष्टी लाभत नाही. असे लोक कायम दरिद्री राहातात. तिसरी गोष्ट म्हणजे ज्या घरात महिलांचा अपमान होतो, त्यांच्याशी गैरवर्तन केले जाते, जिथे पुरुष आपली मर्दुमकी दाखविण्यासाठी महिलांवर हात उगारतात किंवा रोज त्यांना मारपीट करतात, अशा व्यक्तिला हनुमानजी शिक्षेस पात्र समजतात. मृत्यूनंतर हे लोक नरकात जातात, पण आपल्या कर्माची शिक्षा ते मृत्यूलोकात पण भोगत असतात.

चौथी गोष्ट म्हणजे परिवारात एकता नसणे. ज्या घरात रहाणार्‍या सदस्यांमध्ये एकता नसेल, भाऊ बहीण यांच्यामध्ये सदैव भांडणे होत असतील, अशा घरात राहाणारे लोक कधीच सुखी होऊ शकत नाहीत व हनुमानजी त्यांच्यावर कधीच कृपा करत नाहीत. पाचवी गोष्ट ज्या घरात सदैव कचरा असेल, अस्वछता असेल, किंवा ज्या घरात राहाणारे लोक सदैव निंदा करत असतील, अशा घरात माता लक्ष्मी निवास करीत नाही, दारिद्र्य त्याच्या घरात निवास करते.

सहावी गोष्ट म्हणजे प्राण्यांची हत्या- ज्या घरात मुक्या प्राण्यांची हत्या होत असेल, अशा घरात राहाणार्‍या लोकांवर हनुमानजी नाराज होतात व त्यांना शिक्षेस पात्र मानतात. सातवी गोष्ट म्हणजे संतांचा अपमान ज्या घरात होतो, त्यांच्यावर हनुमानजी
नाराज होतात. आठवी गोष्ट म्हणजे जे लोक चरित्रहीन असतात, जे परक्या स्त्रीवर वाईट नजर ठेवतात, अशा घरातील व्यक्तींवर हनुमानजी कधीच कृपा करीत नाहीत.

मित्रांनो कोणत्याही प्रकारची अंध श्रद्धा पसरवणे हा आमच्या पेज चा उद्देश नाही. केवळ भारतीय समाज मान्य असलेल्या कथा, उपाय, विधी आपल्या पर्यंत पोहचवले जातात आमचे पेज कोणत्याही प्रकारच्या अंध श्रद्धेला खतपाणी घालत नाही. इथे शेयर होणारे लेख हे फक्त माहिती साठी आहेत. त्यांचा वापर अंध श्रद्धा म्हणून करू नका.

तुम्हाला काय अजून वाचायला आवडेल हे आम्हाला कमेंट मार्फत नक्की कळवा कारण तुमची एक कमेंट आमचे प्रोत्साहन वाढवत असते. तसेच आमचे फेसबुक पेज हि नक्की लाईक करा जेणेकरून तुम्हाला आमच्या सर्व अपडेट मिळतील आणि त्याच बरोबर आमचे फेसबुक पेज शेअर हि नक्की करा धन्यवाद.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *