तुम्हालाही स्वप्नात साप दिसला असेल, या स्वप्नाचा अर्थ जाणून घ्या…

हजारो वर्षांपूर्वी काही लोक स्वप्नांचा अभ्यास करीत होते. स्वप्नात कोणती घटना घडते आहे व स्वप्नात काय दिसते आहे याचा अभ्यास करून करून जीवनाच्या बाबतीतील माहीती जाणून घेत होते. त्या वेळी ऋषिमुनींचे असे
मानत होते, की देव आपल्या सर्वांना दिसू शकत नाही पण ते स्वप्नांच्या माध्यमातून आपल्या जीवनात काय होणार आहे याविषयी आपल्याला आधीच सूचित करतात.

आज हजार वर्षांपूर्वी स्वप्नात प्रत्येक वस्तु दिसण्याचे एक वेगवेगळा अर्थ होता. चला तर मग आज आम्ही तुम्हाला सांगणार आहोत की जर आपल्याला स्वप्नात साप दिसला तर त्याचा काय अर्थ आहे. असे म्हटले जाते, की जर आपल्याला स्वप्नात साप दिसायला सुरुवात झाली तर त्याचा अर्थ आहे की आपली कुंडली जागृत होते आहे आणि आपले चांगले दिवस सुरू झाले आहेत.

जर तुम्हाला वारंवार स्वप्नात साप दिसू लागला तर त्याचा अर्थ आहे, आपल्याला या दुंनियेतून खूप काही मिळणार आहे. जर आपण
कुंडलीच्या प्रमाणे काम करीत असू, तर आपल्याला असे भरपूर काही मिळेल ज्याची आपण कधी अपेक्षाच केली नव्हती. जर तुम्हाला स्वप्नात असे दिसत असेल, साप तुम्हाला चावण्यासाठी तुमच्या पाठी येत असेल, किंवा तुमचे नुकसान करण्यासाठी तुमच्या मागे येत असेल, तर त्याचा अर्थ असा आहे, तुम्ही चुकीच्या मार्गाने जात आहात किंवा तुम्ही असे काहीतरी करीत आहात, जे तुमच्या कुंडलीत लिहिलेले नाही.

तुम्ही असे काहीतरी करीत आहात जे तुमच्या भविष्यासाठी ठीक नाही. म्हणून जर स्वप्नाततुम्हाला साप काही इजा पोहोचविण्याचा प्रयत्न करीत असेल, किंवा त्याने प्रयत्न केला असेल तर दुसर्‍या दिवशी सकाळी उठून तुम्ही विचार केला पाहिजे की त्या दिवशी तुम्ही कोणते चुकीचे काम केले होते., जे तुम्ही करायला नको होते. त्यानंतर जीवनात ते काम तुम्ही कधीही करू नका.

स्वप्नात तुम्हाला भुर्‍या रंगाचा नाग दिसत असेल, तर समजून जा तुमच्याकडे भरपूर धन येणार आहे व त्याचबरोबर समृद्धि येणार आहे. असे स्वप्नात दिसले तर सकाळी उठून शंकराची प्रार्थना करा व मंदिरात दूध अर्पण करा. जर नाग नागिणीची जोडी दिसली, तर समजून जा की तुमची कुलदेवता आहे व तुमच्या घरात त्यांची स्थापना करा व रोज घरातील सदस्यांनी त्यांची पुजा करा. तुमच्या
घरात समृद्धि येईल.

मित्रांनो कोणत्याही प्रकारची अंध श्रद्धा पसरवणे हा आमच्या पेज चा उद्देश नाही. केवळ भारतीय समाज मान्य असलेल्या कथा, उपाय, विधी आपल्या पर्यंत पोहचवले जातात आमचे पेज कोणत्याही प्रकारच्या अंध श्रद्धेला खतपाणी घालत नाही. इथे शेयर होणारे लेख हे फक्त माहिती साठी आहेत. त्यांचा वापर अंध श्रद्धा म्हणून करू नका.

तुम्हाला काय अजून वाचायला आवडेल हे आम्हाला कमेंट मार्फत नक्की कळवा कारण तुमची एक कमेंट आमचे प्रोत्साहन वाढवत असते. तसेच आमचे फेसबुक पेज हि नक्की लाईक करा जेणेकरून तुम्हाला आमच्या सर्व अपडेट मिळतील आणि त्याच बरोबर आमचे फेसबुक पेज शेअर हि नक्की करा धन्यवाद.

Leave a Reply

Your email address will not be published.