१०० वर्षे निरोगी जगण्याची ग्यारंटी, हे झाड जवळ असेल तर; डॉक्टर तोडकर उपाय…भयंकर उष्णता 3 दिवसात गायब…

आपल्या सभोवताली आपल्या भौगोलिक रचनेनुसार अनेक वेगवेगळ्या वनस्पती पाहतो. पण उंबर असा वृक्ष आहे जो संपूर्ण भारतभर आढळतो. हिंदीत गुलर म्हणून ओळखल्या जाणाऱ्या उंबराला संस्कृतमधून औदुंबर म्हणून ओळखतात. आपल्या सभोवती अनेक औषधी वनस्पती उपलब्ध असतात.

पण माहितीच्या अभावामुळे त्यांचा आपण योग्य प्रकारे वापर करू शकत नाही. म्हणून आज आपण या उंबराच्या झाडाचे असेच औषधी उपयोग जाणून घेणार आहोत. शरीरातील उष्णता वाढल्यानंतर तोंडात फोड येतात. ज्याला आपण तोंड येणे म्हणतो. अशावेळी मेडिकलमधील केमिकलयुक्त जेल उपयोगी येत नाहीत. अशावेळी तुमच्या जवळ असणारे उंबराची दहा ग्रॅम ताजी साल घेऊन ती ठेचावी व एक ग्लास पाण्यामध्ये उकळावी.

यामध्ये चिमूटभर तुरटी पावडर मिसळून हे पाणी कोमट झाल्यानंतर या पाण्याने गुळण्या केल्याने तोंडातील अल्सर नष्ट होतो. मुक्कामार लागल्याने किंवा कोणत्याही कारणाने लागल्याने अंगावर आलेली सूज कमी करण्यासाठी याच्या सालीची पेस्ट त्यावर लावावी. सूज कमी येते. याशिवाय त्वचेवर फोड येऊन ते दुखत असतील किंवा केसतोडा होऊन फोड आलेले असेल तर त्यावर देखील ही पेस्ट लावावी. दोन ते तीन दिवसातच आराम पडतो.

रक्त शुद्धी करण्यासाठी आणि रक्तातील टॉक्सिक पदार्थ शरीराबाहेर फेकण्यासाठी या उंबराच्या पाल्याचा उपयोग होतो. यासाठी उंबराची कवळी पाने वाटून याचा रस काढावा व रोज सकाळ संध्याकाळ सलग सात ते आठ दिवस पिल्याने रक्त शुद्धी होते व यामुळे त्वचेवर येणारे पिंपल्स किंवा चेहऱ्यावरील तांबडे पांढरे चट्टे नष्ट होतात. चिकनपॉक्स किंवा कांजण्या झाल्या असतील तर या उंबराच्या पानाच्या गाठी शेळीच्या दुधासोबत उगाळून किंवा दगडी उकळामध्ये याची पेस्ट बनवून ते दुधासोबत पिल्याने दाब कमी होतो व यानंतर त्वचेवर राहणारे काळे डाग देखील ते राहत नाहीत.

चेहऱ्यावरील वांगाचे चट्टे घालवण्यासाठी देखील सात ते आठ दिवस याची पेस्ट चट्ट्यांवर लावल्याने वांगाचे चट्टे नष्ट होतात. त्वचा भाजल्यावर राहणारे चट्टे देखील याच उपायाने नष्ट होतात. त्वचा भाजल्यानंतर लगेचच या उंबराची ताजी पाने आणि साल बारीक करून याची पेस्ट भाजलेल्या जागी लावल्याने दाह कमी होतो व जखम लवकर भरली जाते.

रक्त पित्त झाल्यावर देखील हे उंबराचे झाड अतिशय उपयोगी आहे. नाकातून रक्त येत असेल तर अशावेळी या उंबराच्या ताज्या पानाचा रस दहा ते पंधरा मिली या प्रमाणात दोन ते तीन दिवस सकाळ संध्याकाळ प्यावा. शितपित्त म्हणजे त्वचेवर खाज येण्याची समस्या असेल तर अशावेळी दहा ते पंधरा मिली रस सेवन करावा. या उंबराच्या कच्च्या फळांची भाजी देखील बनवली जाते. हिचे सेवन केल्याने ज्या व्यक्तींना भस्म्या रोग आहे म्हणजे कितीही खाल्ले तरी भुक कमी होत नाही.

अशा व्यक्तींनी तीन ते चार दिवस सलग ही भाजी खावी. पुन्हा भस्म्या आयुष्यभर होणार नाही. जुलाब, अतिसार झाल्यावर याच्या कवळ्या पानांचा दहा ते पंधरा मिली रस प्यावा. उंबराच्या कच्च्या फळांच्या भाजीच्या सेवनाने पोटाचे सर्वच विकार अपचन, बद्धकोष्ठ हे सर्व नष्ट होतात आणि विशेष म्हणजे पोटातील अल्सर देखील कमी होतो.

तुम्हाला काय अजून वाचायला आवडेल हे आम्हाला कमेंट मार्फत नक्की कळवा कारण तुमची एक कमेंट आमचे प्रोत्साहन वाढवत असते. तसेच आमचे फेसबुक पेज हि नक्की लाईक करा जेणेकरून तुम्हाला आमच्या सर्व अपडेट मिळतील आणि त्याच बरोबर आमचे फेसबुक पेज शेअर हि नक्की करा धन्यवाद.

Leave a Reply

Your email address will not be published.