गुरुवारी रात्री झोपताना येथे ठेवा एक नारळ सात पिढ्या बसून खातील….श्री स्वामी समर्थ…

मित्रांनो एक नारळ, श्रीफळ आपण इथं ठेवायचं आहे, पैशाच्या सर्व समस्या दूर होतील. अचानक धनलाभ होईल, पैसा इतका येईल की तुम्ही विचार देखील केला नसेल. आपण पैसे कमावण्यासाठी अनेक प्रकारचे उद्योग, उपाय आणि व्यवसाय करत असतो. काहीजण नोकरी करतात. प्रत्येक माणसाचा उद्देश पैसे कमावणे, धनसंपत्ती कमावणे आणि आपल्या कुटुंबाचा उदरनिर्वाह करणे हाच असतो. मात्र धनसंपत्ती, पैसा अडका कमवताना आपल्याला अनेक प्रकारच्या अडचणी येत असतात.

कधी कधी आपण मेहनत तर फार करतो, कष्ट करतो मात्र त्या प्रमाणात आपल्याला पैसा, धन मिळत नाही किंवा मागे अनेक कारणे असतात, आपण करत असलेल्या घरातील चुकीच्या पद्धती या गोष्टीला कारणीभूत ठरत असतात आणि म्हणूनच मित्रांनो या चुका सुधारण्यासाठी काही उपाय वास्तुशास्त्रामध्ये आणि ज्योतिष शास्त्रामध्ये सांगितलेले आहेत.

त्यापैकी एक म्हणजे श्रीफळ. नारळाचा योग्य प्रकारे वापर केला तर आपल्याला धनसंपत्ती, पैशाच्या अडचणी, पैशाच्या समस्या सर्व दूर होतील. आपल्याकडे पैसा येत असताना ज्या काही अडचणी येत असतील त्या अडचणी दूर करण्यासाठीचा नारळाचा खुप मोठा उपयोग, फायदा आपल्याला होतो. यामुळे आपल्याकडे भरपूर पैसा येऊ शकतो.

आपल्याला पहिली गोष्ट जर घरी नारळाचे झाड असेल तर अतिउत्तमच. मित्रांनो त्याचा एक नारळ घ्या. तुमच्याकडे झाड नसेल बाजारातुन एक चांगल्या प्रकारचा नारळ विकत घ्या. मित्रांनो तो नारळ घेताना तो नारळ सोलायचा नाही. त्याच आवरण, त्याच कवच त्यावर तसच ठेवायचं आहे. असा हा नारळ आपल्या घरात स्वामींची मूर्ती किंवा स्वामींचा फोटो असेल म्हणजे तो देवघरात असेल, देवघरातील स्वामींच्या फोटो किंवा मुर्ती समोर हा नारळ ठेवायचा आहे.

मनोभावे श्री स्वामी समर्थांची पुजा करायची आहे. त्या नारळाची पुजा करायची आहे आणि पुजा केल्यानंतर हा नारळ हातामध्ये घ्यायचा आहे आणि दोन्ही हातामध्ये आपली जी काही नारळ धरून इच्छा आहे, आपल्याला ज्या काही अडचणी आहेत, ज्या काही समस्या आहेत, आपल्याला स्वामींकडून कोणती इच्छा पुर्ण करायची आहे ती इच्छा स्वामींना सांगायची आहे. पुन्हा स्वामींचा फोटो किंवा मूर्ती आहे त्यासमोर हा नारळ ठेवायचा आहे, त्यांच्या पायथ्याशी ठेवायचा आहे.

सात दिवस ही पुजा अशीच करायची आहे. पण हा उपाय सुरू करण्यासाठी गुरुवारचा दिवस लाभदायी मानला जातो. गुरुवार पासून पुढच्या गुरुवारपर्यंत हा उपाय करायचा आहे. सात दिवस हा उपाय केल्यानंतर हा नारळ जवळच्या नदीमध्ये विसर्जित करायचा आहे. ज्या ठिकाणी वाहते पाणी आहे म्हणजे नदी तिथे विसर्जित करायचा आहे.

हा नारळ विसर्जित केल्यानंतर काही दिवसांतच आपल्याला पैशा संबंधीच्या अडचणी आहेत त्या सुटलेल्या दिसतील. तुमच्या घरामध्ये पैसा, धनसंपत्ती येऊ लागेल. तुम्हाला जाणवेल आणखी थोड्या दिवसानंतर तुमच्या समस्या सुटलेल्या असतील. तुमचे घर पैशाने, धनधान्याने भरलेलं असेल. तुमच्या घरात सुखसमृद्धी, समाधान, आरोग्य, ऐश्वर्य सर्व काही नांदेल. अशक्य हे शक्य करतील स्वामी, ज्यांच्या जीवनात आहेत स्वीमी समर्थ त्यांच्या जीवनात कसलाच नाही अनर्थ.

Leave a Reply

Your email address will not be published.