मीठ घरात या जागी ठेवल्यामुळे गरीबी घरापासून कोसभर दूर राहील, आयुष्यात गोडवा आणेल…

नमस्कार, तुमचे स्वागत आहे. मित्रांनो, मनुष्याच्या जिवनाच्या प्रत्येक गोष्टीत संतुलन असणे का महत्वाचे आहे हे आपण मिठापासून शिकले पाहिजे. हो, मित्रांनो, मीठापासून आपण संतुलित जिवनाचा धडा घेऊ शकतो. जसे की आपल्या
खाण्यामध्ये मिठाचे काय महत्व आहे हे आपण सर्व चांगल्या पद्धतीने जाणतो व हे ही आपल्याला माहीत आहे की खाण्यामध्ये योग्य प्रमाणातच मीठ घातले गेले तरच जेवणाचा किंवा खाण्याचा स्वाद वाढतो, खाण्यात जरूरीपेक्षा जास्त किंवा कमी मीठ हे जेवणाची चव बिघडवते त्याचबरोबर स्वास्थ्याच्या दृष्टीने पण जास्त मीठ हानिकारक असते.

तसेच आपल्या जिवनातही काही महत्वपूर्ण वस्तूंची कमतरता किंवा अधिकता कोणतेही सुख आपल्या जीवनात आणू शकत नाही,
परंतु दोन्ही एक प्रकारे हानिकारक असतात. जर विज्ञानाची गोष्ट सांगायचे म्हटले तर मिठाचे योग्य प्रमाण आपल्या शरीराच्या प्रत्येक कार्यासाठी आवश्यक आहे. आपल्या मेंदूच्या स्वास्थ्यासाठी मीठ अत्यंत आवश्यक आहे. त्याचबरोबर, ज्योतिषशास्त्रामध्ये मिठाचे साधारण महत्व सांगितले गेले आहे. मीठ आपल्या खाण्यामध्ये स्वाद वाढवायचे काम तर करतेच त्याचबरोबर
आपल्या जिवनातही सकारात्मकता आणण्याचे काम करते.

ज्योतिषशास्त्रामध्ये मिठाचे काही असे उपाय सांगितले आहेत ज्यामुळे आपण आपल्या जीवनाची दिशा व दशा दोन्ही बदलू शकतो. मात्र एक चिमटी मिठात एवढी क्षमता असते, जी आपल्याला रंकाचा राजा बनवू शकते. मित्रांनो, आज आम्ही मीठासंबंधी काही महत्वपूर्ण उपायांच्याविषयी जाणून घेणार आहोत, ज्यांचा प्राचीन युगापासून कितीतरी घरात प्रत्येक दिवशी पालन केले जाते. पण आपल्यामधील काही लोक अजूनही त्या गोष्टींपासून दूर आहते. या सगळ्या गोष्टींचे ज्योतिषशास्त्रामध्ये वर्णन केले गेले आहे. तुम्ही पण मिठाचे हे उपाय जरूर करून बघा. चला तर मग जाणून घेऊया ज्योतिषशास्त्रामध्ये मिठाचे कोणते उपाय सांगितले गेले आहेत.

सगळ्यात पहिली गोष्ट म्हणजे मीठ हे सकारात्मक ऊर्जेचे भांडार आहे. तसेच मिठामध्ये इतकी ताकद असते की ते आपल्या आजूबाजूच्या वातावरणात असलेल्या नकारात्मक उर्जेला ओढून घेते व आपल्या आतील सकारात्मक ऊर्जा वातावरणात
पसरवते. म्हणून मित्रांनो, घराच्या चारही कोपर्याात एका वाटीत खडे मीठ ठेवा. लादी पुसायच्या पाण्यात थोडे मीठ घालून जर घरातील लादी पुसून काढली, तर पूर्ण घरात सकारात्मक ऊर्जा पसरते व घरात जर परत परत क्लेश होत असतील किंवा परिवारातील सदस्यांचे आपसात छोट्या गोष्टींवरून भांडण होत असेल, तर हा मिठाचा उपाय जरूर करा.

दुसरी गोष्ट: मित्रांनो आपल्या घरातील न्हाणीघरात जर कोणत्याही प्रकारचा वास्तुदोष असेल, तर त्याचा प्रभाव घरातील पूर्ण परिवारावर होतो. त्यामुळे परिवारातील सदस्य एका मागोमाग एक असे अचानक आजारी पडू लागतात. त्यामुळे
त्याच्याबरोबर घरातील आर्थिक स्थिति पण प्रभावित होते. वास्तुशास्त्रामध्ये याचा उपाय सांगितला आहे, म्हणून न्हाणीघरात एका
काचेच्या बाटलीत मीठ भरून ठेवा, प्रत्येक आठवडा ते बदलत राहा. त्यामुळे वास्तुदोष दूर होतो व सकारात्मकता येते. आपली आर्थिक स्थिति मजबूत होते.

तिसरी गोष्ट म्हणजे घराचे मुख्य द्वार हे आपल्या घरातील सगळ्यात जास्त संवेदनाशील ठिकाण आहे. इथून आपल्या घरात नकारात्मक शक्तींचा आपल्या घरात प्रवेश करतात. आपल्या घरात सगळ्यात पहिले प्रवेश होतो म्हणून मुख्य दरवाजावर एका लाल कपड्यात खडा मीठ लटकावून ठेवा. मिठाच्या सकारात्मकतेमुळे घरात येणारी संकटे दारातच थांबतील व नकारात्मक ऊर्जा घरात प्रवेश करणार नाही.

चौथी गोष्ट मित्रांनो, तुम्ही आपल्या घरातील वडीलधार्याथ स्त्रियांना नजर उतरवताना किंवा दृष्ट काढताना पाहिले असेल. त्यामध्ये त्या मोहरीबरोबर मिठाचा वापर करतात कारण मीठ दृष्टीदोष दूर करते व नकारात्मकता बाहेर काढते. मुलांना जर नजर लागली तर स्नान करण्याच्या पाण्यात मीठ मिसळून स्नान घाला.

पाचवी गोष्ट म्हणजे राहू व केतूच्या दुष्ट प्रभावाला दूर करण्याचे काम मीठ करते. रात्री झोपण्यापूर्वी कोमट पाण्यात मीठ टाकून त्यांनी हात धुवून झोपा. तर वाईट शक्ति ज्या रात्री सक्रिय होतात, स्वप्न पडतात त्यापासून तुम्हाला मुक्ति मिळेल.

मित्रांनो, जर तुमच्या परिवारात सतत वाद असतील, मानसिक तणाव असेल, तर सैधव मिठाचा प्रयोग करा. पती पत्नीने आपल्या शयनकक्षात सैधव मीठ पाण्यात घालून ते पाणी ठेवा. निश्चित सकारात्मक परिणाम बघावयास मिळतील. घरात तुम्ही खुशी आणू शकता. रात्री कोणत्याही बाहेरील व्यक्तीस मीठ देऊ नका. मीठ कोणाच्या हातात देवू नका, थाळीत वाटीत घालून द्या.

माहिती आवडली असेल, तर लाइक व शेअर करायला विसरू नका.

Leave a Reply

Your email address will not be published.