हिंदू धर्मशास्त्रामध्ये अशा काही विधी असतात त्या विधींना अत्यंत महत्त्व मानले जाते. त्यापैकी एक विधी म्हणजे कपाळावर कुंकू लावणे होय. अनेकदा विवाह झाल्यानंतर पत्नी आपल्या नवऱ्याच्या नावाने कुंकू लावत असते. परंतु आज आपण कुंकू कशा पद्धतीने लावायचे आहे? कुंकू लावण्याची योग्य पद्धत कोणती आहे? कोणत्या बोटाने कुंकू लावायला हवा? हे पाहणार आहोत. त्याचप्रमाणे चुकीच्या पद्धतीने कुंकू लावण्याचे कोणते परिणाम भोगावे लागू शकतात. तसेच कुंकू लावण्याचे काय फायदे आहेत याबद्दल माहिती पाहणार आहोत.
सुवासिनी स्त्रिया कपाळावर कुंकू लावत असतात. कपाळी कुंकू लावत असताना कधीही चार चौघांमध्ये लावू नये. त्याचबरोबर कपाळी कुंकू लावताना नेहमी आपल्या बेडरूममध्ये जाऊन एकांतात कपाळाला कुंकू लावायला पाहिजे. त्याचबरोबर आपल्या कुंकवाचा डबा वेगळा असायला हवा. इतरांसोबत तो कुंकुवाचा डबा ठेऊ नये.
आपण आपलं मेकअपचे सामान इतरांसोबत शेयर करत असतो. परंतु कुंकुवाचा डबा कधीही चुकून एकमेकांसोबत शेयर करू नका. कपाळी कुंकू लावण्याचे वेगळे प्रकार आपल्याला बाजारामध्ये सहज उपलब्ध होताना पाहायला मिळतात. त्याचबरोबर कोरडा कुंकू, सिंदूर व त्याचे वेगवेगळे प्रकार सुद्धा बाजारात उपलब्ध असतात.
कपाळाला कोरडा कुंकू लावणे अत्यंत शुभ मानले जाते. जेव्हा आपण कपाळावर कोरडा कुंकू भरत असतो तेव्हा जर कुंकू तुमच्या नाकावर पडत असेल तर हे लक्षण अत्यंत शुभ मानले जाते. याचा अर्थ असा होतो की तुमच्या पतीचे तुमच्यावर खुप प्रेम आहे. कुंकुवाची डबी ठेवताना शक्यतो लहान मुलांचा हात पोहचणार नाही अशा पद्धतीने ठेवा. अन्यथा कुंकू जमिनीवर पडून त्याची अवहेलना सुद्धा होऊ शकते.
जर आपल्या हातून किंवा इतरांच्या हातून कुंकू जमिनीवर चुकून पडले तर त्या कुंकुवाला नमस्कार करावे, थोडासा कुंकू घेऊन कपाळावर लावावा व त्यानंतर उरलेला कुंकू डब्यात भरून ठेवावा व जमिनीवर जो कुंकू पडलेला आहे तो एखाद्या झाडामध्ये टाकून द्यावा. कुंकू पायाखाली येणार नाही याची शक्यतो काळजी घ्या. सकाळी अंघोळ केल्यानंतर भांग भरा. अंघोळ करण्याआधी भांग भरू नका. तुम्ही दिवसभरातून कित्येकदाही कपाळी कुंकू लावू शकता. परंतु दिवसभरातून दोन वेळा तरी कपाळी कुंकू अवश्य लावा.
जी स्त्री एका बाजूला तिरकस भांग करते अशा व्यक्तीचा पतीसुद्धा तिच्यापासून दूर होऊन जातो. पण त्याचबरोबर समाजामध्ये अशा सुद्धा काही स्त्रिया आहेत ज्या कपाळी भांग पाडताना ते झाकून देतात. अशा व्यक्तींचा पतीसुद्धा समाजामध्ये सगळ्यांपासून अलिप्त राहतो. म्हणून कुंकू लावताना नाकाच्या शेंड्यापासून सरळ मधोमध एका टोकाला लावा. जर तुम्ही कुंकू कपाळी लावत असाल तर तुमच्या उजव्या हाताच्या मधल्या बोटाने कपाळी कुंकू लावा.
सुवासनी स्त्रियांच्या जीवनामध्ये कुंकूवाला अतिशय महत्व प्राप्त झाले आहे. लग्नाच्या आधी मुलगी टिकली लावते, लिपस्टिक लावते परंतु कुंकू कपाळी लावत नाही. म्हणून लग्न झाल्यानंतर पतीच्या हाताने कपाळावर कुंकू लावला जातो आणि भांग सुद्धा भरला जातो. जेव्हा एखाद्या मुलीचे लग्न होते तेव्हा सर्वप्रथम तिच्या पतीच्या हाताने कपाळावर भांग भरला जातो आणि या सगळ्याला कुमारीपासून सुवासिनीचा प्रवास सुरु होतो.
कपाळी कुंकू लावताना तो चांगल्या दर्जाचा लावायला हवा. जेणेकरून कोणत्याही प्रकारची तुम्हाला रिअकॅशन होणार नाही. कपाळी कुंकू लावल्याने स्त्रियांच्या सौंदर्यामध्ये भर पडत असते आणि त्याचबरोबर त्यांच्या वैवाहिक जीवनामध्ये अनेक फायदे होत असतात. म्हणून स्त्रियांनी कुंकू अवश्य लावले पाहिजे.