श्री गणेश जयंतीला गणपतीला अशा प्रकारे अर्पण करा 21 गुळाचे खडे आणि 21 दुर्वा पैशांचा पडेल पाऊस…

मित्रांनो आज 10 सप्टेंबरला गणेश चतुर्थी आहे. आपल्या जीवनात ज्या काही इच्छा असतील, आपली जी स्वप्न असतील ती सर्व स्वप्न पूर्ण करण्याचा दिवस आहे. या दिवशी आपण गणरायांसमोर जे काही मागाल त्या इच्छा गणराय नक्की पुर्ण करतील. मात्र त्यासाठी आपल्याला गणरायांना काहीतरी अर्पण करावे लागेल.

एकवीस गुळाचे खडे आणि एकवीस दुर्वा. या गणरायांना अर्पण केल्या तर गणराय आपल्या सर्व इच्छा पुर्ण करतील. गणरायांचा जन्म ज्या दिवशी झालेला आहे तो दिवस गणरायांसाठीच नव्हे तर संपूर्ण सृष्टीसाठी फार महत्त्वाचा आहे. या दिवशी लवकर उठून किंवा आपले नित्यकर्म आटोपून श्री गणरायांचे दर्शन घ्यावे.

श्री गणरायांची पुजाअर्चा करावी. गणरायांच्या मुर्तीची सोंड ही उजव्या बाजूला असावी. आपण गणपतीची आरती किंवा पुजा करताना आपलं तोंड आहे हे पूर्वेकडे किंवा उत्तरेकडे असायला हवे आणि त्यांना भक्तीभावाने एकवीस गुळाचे खडे आणि एकवीस दुर्वा अर्पण कराव्यात. दुर्वा गणरायांना फार आवडतात. तसेच मोदक, गुळ आणि लाडू हे गणरायांचे आवडते पदार्थ आहेत.

श्री गणेशांची पुजा झाल्यावर ओम गणेशाय नमः किंवा ओम गण गणपतेय नमः हा मंत्र 108 वेळा उच्चारावा. या दोन्हीपैकी एक मंत्र आपण भक्ती भावाने जप करावा. हा उपाय करून पाहा गणराय तुम्हाला नक्की प्रसन्न होतील. तुम्ही ज्यावेळी गणरायांना मागणे मागता त्यावेळी गणराय देखील तुमच्याकडून श्रद्धेची, भक्तीभावाची अपेक्षा ठेवत असतात. म्हणून जे भक्तिभावाने, श्रद्धेने हे कार्य करतात त्यांच्यामध्ये प्रचंड आत्मविश्वास होतो.

हाती घेतलेले कोणतेही काम होणारच आहे. जी स्वप्न आपण पाहिलेली आहेत, ज्या आपल्या महत्त्वकांक्षा आहेत त्या पूर्ण होणारच आहेत अशा प्रकारची जबरदस्त महत्त्वकांक्षा, आत्मविश्वास, एक स्वतःबद्दल असणारी जाणीव लोकांमध्ये वाढत जाते आणि त्याचाच परिणाम म्हणून प्रत्येक काम पूर्ण होते. दैवी ज्या शक्ती आपण म्हणतो त्या दुसऱ्या तिसऱ्या कुठल्याही नसतात आपल्यामध्ये कोणतेही कार्य करण्याची धमक असते तीच दैवी शक्ती असते, तोच देवाने दिलेला आशीर्वाद असतो.

मित्रांनो कोणत्याही प्रकारची अंध श्रद्धा पसरवणे हा आमच्या पेज चा उद्देश नाही. केवळ भारतीय समाज मान्य असलेल्या कथा, उपाय, विधी आपल्या पर्यंत पोहचवले जातात आमचे पेज कोणत्याही प्रकारच्या अंध श्रद्धेला खतपाणी घालत नाही. इथे शेयर होणारे लेख हे फक्त माहिती साठी आहेत. त्यांचा वापर अंध श्रद्धा म्हणून करू नका.

तुम्हाला काय अजून वाचायला आवडेल हे आम्हाला कमेंट मार्फत नक्की कळवा कारण तुमची एक कमेंट आमचे प्रोत्साहन वाढवत असते. तसेच आमचे फेसबुक पेज हि नक्की लाईक करा जेणेकरून तुम्हाला आमच्या सर्व अपडेट मिळतील आणि त्याच बरोबर आमचे फेसबुक पेज शेअर हि नक्की करा धन्यवाद

Leave a Reply

Your email address will not be published.