उद्या 10 सप्टेंबर चुकूनही घरी आणू नका या 5 गणेश मूर्ती घर बरबाद होईल…

मित्रांनो 10 सप्टेंबर 2021 शुक्रवारचा दिवस आणि या दिवशी आलेली आहे श्री गणेश चतुर्थी. दरवर्षी भाद्रपद महिन्यातील शुक्ल पक्षातील चतुर्थी तिथीस आपण श्री गणेश चतुर्थीचा उत्सव साजरा करतो. यालाच गणेशोत्सव असे म्हटले जाते. या निमित्ताने गणपती बाप्पा घरी येतात दीड दिवस, पाच दिवस, सात दिवस असतात आणि त्यांना निरोप देतो. गणेशोत्सवाच्या प्रारंभी अनेक लोक बाजारातून श्री गणेश मूर्ती खरेदी करतात आणि घरी आणून त्याची पुजा प्रारंभ करतात.

मात्र हिंदू धर्मशास्त्राने पाच अशा गणेश मूर्ती खरेदी करण्यास त्यांची आपल्या घरात स्थापना करून त्यांची पुजा करण्यास मनाई केली आहे. कारण या गणेश मूर्ती आपल्या घरात दुःख, दारिद्र, संकटे, भय इत्यादी अनिष्टकारक गोष्टी उत्पन्न करू शकतात आणि गणपती बाप्पांचा कृपाशीर्वाद तर मिळणार नाहीच मात्र श्री गणेश क्रोधीत सुद्धा होऊ शकतात. यातील पहिली मूर्ती आहे अर्थातच ज्या गणेश मूर्तीवर मुकुट नसेल, ज्या गणपती बाप्पांच्या डोक्यावरती मुकुट नाही अशी मूर्ती आपण चुकूनही खरेदी करू नका.

मुकुट हा गणपती बाप्पांच्या मानाचे प्रतीक मानण्यात आलेलं आहे आणि जर आपण मुकुट नसलेली मूर्ती आपण घरात आणत असेल आणि तिची जर पाच दिवस, दहा दिवस पुजा करत असु तर त्यामुळे निश्चतच गणपती बाप्पा त्यांच्या आशीर्वाद, कृपाशीर्वाद आपल्यावरती बरसवतील की नाही याबद्दल साशंकता वाटते. जर अशा प्रकारची गणेश मूर्ती खरेदी केली असेल तर बाजारातुन एखादा मुकुट खरेदी करून तो गणपती बाप्पांना नक्की परिधान करा आणि त्यांची पुजा चालू करा.

दुसरी मूर्ती आहे जी गणेश मूर्ती उभी राहिलेली आहे, उभ्या अवस्थेत आहे. मित्रांनो ज्याप्रकारे आपण आपल्या घरात माता लक्ष्मीची उभी असणारी मूर्ती स्थापित करू नये कारण लक्ष्मी आधीच चंचल आहेत आणि त्यांची उभी असणारी मुर्ती घरात असेल तर लक्ष्मी आपल्या घरात दीर्घकाळ टिकत नाही. अगदी त्याचप्रकारे गणपती बाप्पांना उभ्या अवस्थेत आपल्या घरात आणत असू तर त्याचं लवकरात लवकर मग दीड दिवसात, पाच दिवसात विसर्जन केलेलं उत्तम राहील.

तिसरी मुर्ती आहे शिवपार्वती सहित असणारी किंवा शिवपरिवारासोबत असणारी गणेश मुर्ती. अनेक लोक गणपती बाप्पांची मुर्ती खरेदी करताना गणपती बाप्पांसोबत भगवान शिव शंकरांना आणि माता पार्वती यांची सुद्धा एकत्रित रित्या घरी आणतात. जेव्हा आपण गणपती बाप्पांची पूजा करतो तेव्हा या इतर देवतांकडे आपल्याकडून नकळत अनावधानाने दुर्लक्ष केले जाते. म्हणून याचे वाईट परिणाम नक्कीच भोगावे लागू शकतात. म्हणून केवळ गणपती बाप्पांची एकट्याची मुर्ती ही आपण आपल्या घरात आणावी.

चौथी मूर्ती अशी जी गरुडावर विराजमान आहे. तर अशी मूर्ती आपल्या घरात आणत असू गरूडासोबत दारिद्र्य, कंगाली, गरिबी या अनिष्ट गोष्टी आपल्या घरात येऊ लागतात. त्यामुळे ही मुर्ती आपण घरात आणू नये. पाचवी मूर्ती आहे मूषक विना असणारी श्री गणेश मूर्ती. मूषक म्हणजे उंदीर. हिंदू धर्मशास्त्रानुसार गणेश पुराणानुसार मूषक हे गणपती बाप्पांचे वाहन आहे. गणपती बाप्पा या मूषकवर बसून सर्वत्र विचरण करत असतात. म्हणून आपण या मूषकविना गणेशांची आपल्या घरात स्थापना करत असू तर श्री गणेशांचा आशीर्वाद प्राप्त होणे खुप कठीण असते. कारण गणपती बाप्पा आपल्या वाहनाशिवाय कुठेच येत नाहीत.

जर अशी मूर्ती तुम्ही खरेदी केली असेल तर बाजारात छोटासा मूषक आहे त्याची मूर्ती मिळून जाईल. ती खरेदी करा आणि गणपती बाप्पांजवळ ठेवण्यापूर्वी त्याची हळदी कुंकी अक्षता वाहून त्याची पुजा करा आणि त्यानंतर त्यांची गणपतीजवळ स्थापना करा. सहावी आणि सर्वात महत्त्वाची गोष्ट ती म्हणजे गणपती बाप्पांच्या सोंडेची दिशा. गणपती बाप्पाची सोंड ही एकतर डावीकडे असते किंवा उजवीकडे असते. हिंदू धर्मशास्त्र असं मानते कि जर गणपती बाप्पांची सोंड उजवीकडे असेल तर अशा मूर्तीला दक्षिणामुखी मुर्ती असं म्हटलं जातं.

दक्षिण दिशा ही यमदेवांची दिशा आहे. यासाठी अनेक नियमांचं पालन करावे लागते आणि आपल्या हातून कळत नकळत काही चुका घडल्या तर प्रचंड मोठी शिक्षा आपल्याला भोगावी लागते. ज्या गणेश मूर्तींची सोंड उजवीकडे आहे अशी गणेश मुर्ती आपण चकूनही खरेदी करू नका. ज्या गणेश मूर्तींची सोंड डावीकडे असते ती गणेश मुर्ती मात्र साध्या सुध्या पद्धतीने श्री गणेशांची पुजा करू शकतात. त्यामध्ये काही चुका जरी झाल्या तरी गणपती बाप्पा क्षमा करतात. तर गणेश मुर्ती खरेदी करताना या गोष्टींचे पालन नक्की करा.

मित्रांनो कोणत्याही प्रकारची अंध श्रद्धा पसरवणे हा आमच्या पेज चा उद्देश नाही. केवळ भारतीय समाज मान्य असलेल्या कथा, उपाय, विधी आपल्या पर्यंत पोहचवले जातात आमचे पेज कोणत्याही प्रकारच्या अंध श्रद्धेला खतपाणी घालत नाही. इथे शेयर होणारे लेख हे फक्त माहिती साठी आहेत. त्यांचा वापर अंध श्रद्धा म्हणून करू नका.

तुम्हाला काय अजून वाचायला आवडेल हे आम्हाला कमेंट मार्फत नक्की कळवा कारण तुमची एक कमेंट आमचे प्रोत्साहन वाढवत असते. तसेच आमचे फेसबुक पेज हि नक्की लाईक करा जेणेकरून तुम्हाला आमच्या सर्व अपडेट मिळतील आणि त्याच बरोबर आमचे फेसबुक पेज शेअर हि नक्की करा धन्यवाद.

Leave a Reply

Your email address will not be published.