स्त्रियांना उशिरा आंघोळ केल्याने संपूर्ण घर बरबाद होते…

नमस्कार मित्रांनो, तुमचे स्वागत आहे. मित्रांनो, तुम्हाला जर जीवनात काही नवीन शिकायचे असेल, तर आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा, लाइक व शेअर करायला विसरू नका. वास्तुशास्त्र व ज्योतिषशास्त्र आपल्या जीवनाची २ अभिन्न अंग आहेत. आपल्याद्वारे केल्या गेलेल्या प्रत्येक कामाचे फळ आपल्याला हयानुसार मिळते.

आपण दिवसभर जे कोणते काम करतो, जे काही बोलतो, जे काही ऐकतो, जे काही खातो, पितो व परिधान करतो, त्याचा प्रभाव आपल्या जीवनावर अवश्य पडत असतो. कारण घरातील वास्तुपुरुषाची आपल्या प्रत्येक कार्यावर बारीक नजर असते. वास्तुशास्त्रामध्ये आपल्या दैनिक क्रियाकर्मांसाठी काही नियम निर्धारित केले गेले आहेत, ज्यामध्ये आपल्या स्नानासंबंधी काही नियम सांगितले गेले आहेत.

जसे की आपल्याला कोणत्या वेळी स्नान केले पाहिजे व कोणत्या वेळी स्नान करणे योग्य नाही. कसे स्नान केले पाहिजे तसेच कशा प्रकारे नाही. तर आज आपण बघणार आहोत, वास्तुशास्त्रानुसार महिलांच्या स्नानासंबंधी कोणत्या नियमांचे पालन करणे
सांगितले गेले आहे., म्हणजे अशा चुका होणार नाहीत ज्या तुमच्या हातून घडायला नकोत. तुम्ही ऐकून हैराण व्हाल, की घरातील महिला स्नान करताना काही नियम अंमलात आणीत असतील, तर घरात सुख, समृद्धि येते. चला तर मग जाणून घेऊया महिलांनी कशा प्रकारे स्नान केले पाहिजे, व भगवान श्रीकृष्णाच्या मते, महिलांनी स्नान करताना कोणत्या गोष्टी लक्षात ठेवल्या पाहिजेत.

पहिली गोष्ट म्हणजे महिलांनी सकाळी लवकर उठून सगळ्यात प्रथम स्नान केले पाहिजे त्यानंतरच स्वयंपाकघरात प्रवेश केले पाहिजे. तसे तर शास्त्रांमध्ये ब्रम्हमुहूर्तावर उठून स्नान करणे सगळ्यात शुभ मानले गेले आहे. कारण ही वेळ देवतांच्या स्नानाची आहे. परंतु, हे संभव होत नाही. म्हणूनच, सकाळी जितक्या लवकर शक्य होईल, तितक्या लवकर महिलांनी स्नान केले पाहिजे. लवकर स्नान केल्यामुळे शरीरात स्फूर्ति टिकून राहाते. कामासाठी उत्साह कायम राहातो. स्वास्थ्य चांगले राहाते, आळस कमी होतो. नकरात्मक विचार मनात येत नाहीत ज्याचा परिणाम घरातील इतर सदस्यांवर होतो.

दुसरी गोष्ट स्नानानंतर देवाच्या पूजेला शास्त्रांमध्ये महत्व आहे. स्नानानंतर देवाचे नामस्मरण केल्यामुळे व पूजाअर्चा केल्यामुळे घरात सकारात्मक ऊर्जा येते व सुख शांति येते. म्हणून महिलांनी स्नान केल्यानंतर सगळ्यात पहिले देवाचे नामस्मरण करावे. त्यामुळे मानसिक तणाव दूर होतो, राग, द्वेष नाहीसा होतो. स्नेह कायम टिकतो.

मित्रांनो, तिसरी गोष्ट मीठ. आपल्या रोजच्या खाण्यातील अत्यंत महत्वाची गोष्ट आहे मीठ. जेवणाचा स्वाद वाढवण्याव्यतिरिक्त मीठ वास्तुशास्त्राच्या दृष्टीने अतिशय महत्वपूर्ण वस्तु आहे. जर कोणत्या घरात दिवसरात्र कलह होत असेल, भांडणे होत असतील, तर त्या घरातील महिलांनी अंघोळीच्या पाण्याच्या बादलीत मीठ मिसळावे. वास्तुशास्त्रानुसार, मिठामध्ये नकारात्मक ऊर्जा दूर
करण्याची शक्ति असते व ते राहू केतूच्या दूषप्रभावाला नष्ट करते. हा उपाय केल्यामुळे घरातील सगळी नकारात्मकता, तणाव दूर होतो, सुख, शांति व समृद्धि येते.

महिलांनी स्नान करताना एका गोष्टीकडे लक्ष देणे जरूरी आहे, जे वास्तुशास्त्रानुसार चुकीचे मानले गेले आहे ते म्हणजे स्नान करताना पुर्णपणे नग्न होऊन स्नान करू नये. पद्मपुराण हे हिंदू धर्मातील मोठे पुराण आहे, त्यात सांगितले आहे, की भगवान श्रीकृष्णांनी गोपिकांची वस्त्र चोरली, पण सगळ्या महिलाना त्यानुसार अशी शिकवण दिली गेली आहे की विवस्त्र होऊन कधीही स्नान करू नये कारण अपरोक्ष रीतीने तुम्हाला जीव जंतु बघत असतात.

पद्मपुराणानुसार जेव्हा आपण स्नान करतो, तेव्हा आपले पूर्वज आपल्या आसपास असतात व आपल्या वस्त्रामधून पडणारे पाणी ते ग्रहण करतात व तृप्त होतात पण विवस्त्र स्नान केल्यामुळे ते अतृप्त राहातात व आपल्यावर नाराज होतात. म्हणून महिलांनी कधीही विवस्त्र होऊन स्नान करू नये. महिलांनी सार्वजनिक ठिकाणी विवस्त्र होऊन कधीही स्नान करू नये. कमेन्ट मध्ये “जय श्रीकृष्ण” अवश्य लिहा.

Leave a Reply

Your email address will not be published.