आज बुधवारी करा हा एक उपाय… गणपती बाप्पा होतील प्रसन्न, पडेल पैशांचा पाऊस…

प्रथम पूजनीय गणपती बाप्पांची मनापासून आणि विधीने पूजा केली तर त्यांची अपार कृपा प्राप्त होते. इतकेच नाही तर बुधवारी ज्योतिषानुसार बाप्पाला संतुष्ट करण्यासाठी उपाययोजना केल्या तर बाप्पा प्रसन्न होतो आणि सर्व रखडलेला कामे पूर्ण करतो. ज्योतिषी व वास्तू तज्ज्ञ सचिन मेहरा यांचे म्हणणे आहे की बुधवार हा फक्त गणेशाचा दिवस आहे, म्हणून या दिवशी केलेल्या उपायांनी नक्कीच फळ मिळेल. परंतु हे लक्षात ठेवा की हे उपाय कोणालाही नुकसान पोहोचवण्याच्या भावनेने करता कामा नयेत, अन्यथा स्वतःचे नुकसान होईल. त्याचवेळी बाप्पा देखील प्रसन्न होणार नाही. चला तर मग जाणून घेऊया या खास उपायांबद्दल …

आठवड्यातील बुधवार हा श्री गणेश यांचा वार समजला जातो. श्री गणेशाला सर्व दुःखांचे निवारण करणारे दुःख हर्ता, मंगलमूर्ती म्हटले जाते. हिंदू धर्मात आद्य पूजेचा म्हणजेच सर्व देवांमध्ये प्रथम पूजेचा मान हा श्री गणेशाला आहे.श्री गणेशाचे पूजन हे भौतिक, दैविक व आध्यात्मिक कार्याच्या पुर्तते साठी केले जाते. बुधवारी श्री गणेशाचे विधिवत व श्रद्धेने पूजन केले तर सर्व प्रकारच्या इच्छा आणि मनोकामना पूर्ण होतात.

दुर्वा गणेशाचे पूजन

मित्रांनो जर तुमच्या घरी सतत वादविवाद व भांडणे होत असतील. भांडणामुळे घरात सुख व शांती लाभत नसेल तर बुधवारी श्री गणेशाची दुर्वाची प्रतिकात्मक मूर्ती बनवावी.आपण बनवलेली दुर्वांच्या गणेश मूर्तीला आपल्या देवघरात स्थापन करावे. दररोज या दुर्वा गणेशाचे विधिवत पूजन करावे. यामुळे तुमच्या घरातील भांडण तंटे थांबून घरात शांततेचे वातावरण तयार होईल.

हत्तीला खाऊ घाला चारा

जर तुमच्या घरात प्रत्येक गोष्टीत अडचणी येत असतील, काही केल्या अडचणी कमी होत नसतील तर बुधवारी कोणत्याही हत्तीला हिरवा चारा खाऊ घालावा.हिरवा चारा खायला घालण्यासाठी हत्ती नसेल तर तुम्ही एखाद्या गायी ला सुद्धा हिरवा चारा घालू शकता.

गणेशाचा अभिषेक

शास्त्रामध्ये श्री गणेशाचा अभिषेक करण्यासाठी विधी सांगितले आहेत. बुधवारी श्री गणेशाचा अभिषेक केल्याने त्याचा विशेष लाभ आपल्याला होतो. गणेशाचा अभिषेक शुद्ध पाण्याने करावा.गणपती चा अभिषेक करण्यासोबतच गणपती अथर्वशीर्ष पठण सुद्धा करावे. त्यानंतर माव्याचे लाडू नैवेद्य म्हणून ठेवावे आणि नंतर प्रसाद म्हणून वाटून टाकावे.बुधवारी कोणत्याही गणेश मंदिरात जाऊन आपल्याला शक्य असलेल्या वस्तूंचे दान करावे. दान केल्याने आपल्या पुण्यात वाढ होते आणि श्री गणेशाची सुद्धा आपल्यावर कृपा राहते.

टीप – कोणतीही अंध श्रद्धा पसरवणे हा या पोस्ट मागचा उद्देश नाही. फक्त समाज मान्य असलेले उपा य आपल्या पर्यंत पोहोचवणे हा एकच हेतू या पोस्ट मागे आहे. कोणीही गैर समज करू घेऊ नये.

Leave a Reply

Your email address will not be published.