या वर्षी गणपती बाप्पाची अशा प्रकारे करा स्थापना…घरात येईल सुख, शांती पैसा…गणपती बाप्पा मोरया

जरी प्रत्येक महिन्याची चतुर्थी तिथी गणपतीला समर्पित असली तरी भाद्रपद महिन्यातील शुक्ल पक्षाची चतुर्थी तिथी सर्वात मोठी गणेश चतुर्थी मानली जाते. असे मानले जाते की या दिवशी गणपतीचा जन्म झाला होता. या दिवशी लोक घरी गणपती बाप्पाला आणतात आणि ते 10 दिवसांसाठी त्यांची पूजा करतात.

असे मानले जाते की घरात गणपती आणल्याने ते घरातील सर्व अडथळे दूर करतात. गणेशोत्सव विशेषतः महाराष्ट्रात साजरा केला जातो. महाराष्ट्रातील गणेशोत्सव पाहण्यासाठी जगाच्या कानाकोपऱ्यातून गणपतीचे भक्त महाराष्ट्रात येतात. अनंत चतुर्दशीच्या दिवशी गणपतीचे मोठ्या थाटामाटात विसर्जन केले जाते. यावेळी गणेशोत्सव 10 सप्टेंबरपासून सुरु होत आहे. गणपतीची स्थापना आणि पूजा करण्याचे नियम जाणून घ्या.

गणपती स्थापनेचे नियम

चतुर्थीच्या दिवशी आंघोळ आणि स्वच्छ कपडे परिधान केल्यानंतर गणपती बाप्पाला घेण्यासाठी जा. गणपतीची मूर्ती खरेदी करताना लक्षात ठेवा की मूर्ती मातीची असावी, प्लास्टर ऑफ पॅरिस किंवा इतर रसायनांची नाही. याशिवाय बसलेली गणेशमूर्ती घेणे शुभ मानले जाते. त्यांची सोंड डावीकडे असावी आणि उंदीर हे त्यांचे वाहन त्यासोबत असावे. मूर्ती घेतल्यानंतर त्यांना कापडाने झाकून ढोल-ताशांच्या गजराने घरी आणा.

मूर्ती स्थापनेच्या वेळी मूर्तीवरील कापड काढून घरात मूर्तीचा प्रवेश करण्यापूर्वी त्यावर अक्षता अर्पण करा. पूर्व किंवा ईशान्य दिशेला एक पाट ठेवून मूर्तीची स्थापना करा. स्थापनेच्या वेळी, पाटावर लाल किंवा हिरवे कापड घाला आणि अक्षतांवर गणपतीची मूर्ती स्थापित करा. गणपतीच्या मूर्तीवर गंगाजल शिंपडा आणि गणपतीला जानव घाला. मूर्तीच्या डाव्या बाजूला अक्षता ठेवून कलश स्थापन करा. कलशावर स्वस्तिक चिन्ह बनवा आणि त्यात आंब्याची पाने आणि नारळ ठेवा. यानंतर, विधवत गणेशाची पूजा करा.

पूजेचे नियम काय?

स्वच्छ आसनावर बसवून सर्वप्रथम गणपतीला पंचामृताने स्नान घाला. यानंतर त्यांना केशर, चंदन, अक्षता, दुर्वा, फुले, दक्षिणा आणि त्यांचे आवडते नैवेद्य अर्पण करा. जोपर्यंत गणपती घरात राहतात तोपर्यंत त्या काळात गणेश चतुर्थीची कथा, गणेश पुराण, गणेश चालीसा, गणेश स्तुती, श्री गणेश सहस्त्रनामवली, गणेशाची आरती, संकटनाशन गणेश स्तोत्र इत्यादींचे पठण करा. आपल्या श्रद्धेनुसार गणपतीच्या मंत्राचा जप करा आणि दररोज सकाळी आणि संध्याकाळी त्यांची आरती करा. असे मानले जाते की असे केल्याने गणपती कुटुंबातील सर्व अडथळे दूर करतात.

माहिती कशी वाटली आम्हाला कमेंट करून नक्की कळवा आणि अशी उपयोगी माहिती आपल्या प्रियजणांसोबत नक्की शेयर करा. अशाच अनेक माहितीपुर्ण लेखांसाठी आताच आमचे फेसबुक पेज नक्की लाइक करा.

Leave a Reply

Your email address will not be published.