मित्रांनो तुम्ही स्वामींचे भक्त असाल, स्वामींचे सेवेकरी असाल तर तुम्हाला माहीतच असेल की स्वामींच्या सेवेमध्ये, स्वामींच्या भक्तीमध्ये स्वामींना रोज नेवेद्य दाखवायचा असतो. मग तो नेवेद्य सकाळचा असेल दुपारचा असेल किंव्हा संध्याकाळचा असेल. बहुतेक दा दोन वेळेचा नेवेद्य आपण दाखवतच असतो.
परंतु नवीन सेवेकरांना यातील काहीच माहीत नसते की स्वामींनी नेवेद्य दाखवायचा असतो. आजची माहिती तुमच्या साठी खूप महत्वपुर्ण आहे. कारण आज आम्ही तुम्हाला गुरुवारच्या दिवशी दाखवला जाणार स्वामींचा नेवेद्य दाखवणार आहे. हा विशेष नेवेद्य जर रोज तुम्ही स्वामींना दाखवत असाल तरी तुम्ही दार गुरुवारी हा नेवेद्य दाखवू शकता आणि जर तुम्ही स्वामींना नेवेद्य ठेवतच नसाल तर तुम्ही फक्त गुरुवारी नेवेद्य नक्की ठेवा.
तो सकाळी असेल, दुपारी असेल, संध्याकाळी असेल फक्त गुरुवारी ठेवा. मित्रांनो नेवेद्य कोणता ठेवायचा आहे तर मित्रांनो तुम्हाला माहीतच असेल की स्वामींचा वार हा गुरुवार आहे. ज्या दिवशी विशेष पूजा केली जाते, नेवेद्य दाखवला जातो आणि हा नेवेद्य असतो गोड नेवेद्य म्हणजे पुरणपोळी, खीर किंव्हा शिरा आणि पुरी.
या पैकी तुम्हाला जे जमेल तो नेवेद्य गुरुवारी करायचा आहे आणि स्वामींना हा नेवेद्य दाखवायचा आहे. हे जमले नाही तर चपाती आणि दूध हा नेवेद्य दाखवला तरी चालेल. 3क गोष्ट लक्षात ठेवा काहींना काही नेवेद्य दार गुरुवारी दाखवायचाच आहे. मग तो कधीही दाखवा. स्वामी भक्तांनी प्रेमाने केलेलं सर्व काही ग्रहण करतात. कोणताही नेवेद्य दाखवताना एक गोष्ट लक्षात घेतली पाहिजे की नेवेद्य दाखवताना तो प्रेमाने, मनाने, कोणतीही मनामध्ये अपेक्षा न बाळगता दाखवला पाहिजे.
मित्रांनो कोणत्याही प्रकारची अंध श्रद्धा पसरवणे हा आमच्या पेज चा उद्देश नाही. केवळ भारतीय समाज मान्य असलेल्या कथा, उपाय, विधी आपल्या पर्यंत पोहचवले जातात आमचे पेज कोणत्याही प्रकारच्या अंध श्रद्धेला खतपाणी घालत नाही. इथे शेयर होणारे लेख हे फक्त माहिती साठी आहेत. त्यांचा वापर अंध श्रद्धा म्हणून करू नका.
तुम्हाला काय अजून वाचायला आवडेल हे आम्हाला कमेंट मार्फत नक्की कळवा कारण तुमची एक कमेंट आमचे प्रोत्साहन वाढवत असते. तसेच आमचे फेसबुक पेज हि नक्की लाईक करा जेणेकरून तुम्हाला आमच्या सर्व अपडेट मिळतील आणि त्याच बरोबर आमचे फेसबुक पेज शेअर हि नक्की करा धन्यवाद.