घरात कधीच धन कमी पडणार नाही,कधीच कोणती अडचण येणार नाही फक्त देवघरात असा ठेवा ‘कुलदेवतेचा कळस’…

मित्रांनो आपण आपल्या देवघरात कुलदेवतेचा कळस अवश्य ठेवावा. या मुळे घरावर आणि कुटुंबावर कधीच कोणती अडचण येत नाही, संकटे येत नाहीत. मित्रांनो तुम्हाला माहीत असेलच की आपल्या कुटुंबाची एक कुलदेवी किंव्हा कुलदैवत असतात आणि आपल्याला माहीत पाहिजे की आपली कुलदेवता, कुलदेवी कोण आहेत. काहींना माहीत नसतात. तर त्याचीही काही हरकत नाही पण, आपल्या देवघरामध्ये एक कायमस्वरूपीचा कळस ठेवायला पाहिजे. आता हा कळस कोणत्या पद्धतीने ठेवावा हे आपण पाहुयात.


पहिले तर तर मित्रांनो तुम्ही एक दिवस ठरवून घ्या.जसे की मंगळवार, शुक्रवार हे देवीचे वार असतात. भरपूर लोकांचे कुलदेवतेचे वार हा मंगळवार असतो. तर मंगळवार च्या दिवशी तुम्ही घरात कळसाची स्थापना करा. कळसासाठी काय लागत एक नारळ लागेल, एक तांब्याचा तांब्या लागेल, त्या तांब्या मध्ये शुद्ध पाणी, त्या मध्ये टाकण्यासाठी एक रुपयेच नाणं, आणि एक सुपारी पाहिजे.

तुम्ही मंगळवारच्या दिवशी सकाळी लवकर उठून अंघोळ करून तुम्ही देवघरासमोर जाऊन बसा. तिथे तांब्याच्या तांब्यामध्ये शुद्ध पाणी घ्या. त्यामध्ये एक सुपारी, एक रुपयांच नाणं त्यानंतर हळद-कुंकू आणि अक्षदा टाका. त्यावर पाच खाऊची पाने लावा. त्यानंतर त्या वर नारळ ठेवावा.

नारळ हा अखंड असावा, सोललेला नसावा. तो नारळ त्या तांब्यावर्ती ठेवायचा आहे आणि तो कळस आपल्या देवघरात पूर्व बाजूला ठेऊन द्यावा. म्हणजे कळस तुमच्या उजव्या हाताला ठेऊ शकता. अशा प्रकारे तुम्ही कळसाची स्थापना करायची आहे. जो आपण नारळ कळसावरती ठेवलेला आहे तो कायम स्वरूपी तोच ठेवायचा, बदलायचा नाही. समाज नारळ फुटला तर तुम्ही तो नारळ पाण्यात विसर्जित करून दुसरा नारळ त्या तांब्यावरती ठेवावा.

आता पाहुयात विड्याची पाने कधी बदलावी? तर दर मंगळवारी तुम्ही ही पाने बदलायची आहेत. आठवड्याच्या दर मंगळवारी तुम्ही कळसावरील पहिली पाने काढून नवीन पाने ठेवायची आहेत. जी पाने काढलेली आहेत त्यांचं नदीत विसर्जन करावे. तर अशा प्रकारे तुम्ही कळसाची स्थापना देवघरात करू शकता. एक गोष्ट लक्षात घ्या या कळसाचे रोज पूजन करायचे आहे.

मित्रांनो कोणत्याही प्रकारची अंध श्रद्धा पसरवणे हा आमच्या पेज चा उद्देश नाही. केवळ भारतीय समाज मान्य असलेल्या कथा, उपाय, विधी आपल्या पर्यंत पोहचवले जातात आमचे पेज कोणत्याही प्रकारच्या अंध श्रद्धेला खतपाणी घालत नाही. इथे शेयर होणारे लेख हे फक्त माहिती साठी आहेत. त्यांचा वापर अंध श्रद्धा म्हणून करू नका.

तुम्हाला काय अजून वाचायला आवडेल हे आम्हाला कमेंट मार्फत नक्की कळवा कारण तुमची एक कमेंट आमचे प्रोत्साहन वाढवत असते. तसेच आमचे फेसबुक पेज हि नक्की लाईक करा जेणेकरून तुम्हाला आमच्या सर्व अपडेट मिळतील आणि त्याच बरोबर आमचे फेसबुक पेज शेअर हि नक्की करा धन्यवाद.

Leave a Reply

Your email address will not be published.