उद्या 6 सप्टेंबर पिठोरी सोमवती अमावस्या; महादेवांच्या कृपेने उद्यापासून या राशींचे नशीब वाऱ्याच्या वेगाने धावणार…

नमस्कार मित्रांनो आपलं स्वागत आहे.मित्रांनो उद्या पिठोरी सोमवती अमावस्या. या राशींची लागणार लॉटरी. मित्रांनो हिंदूधर्मामध्ये प्रत्येक पौर्णिमेला आणि अमावस्येला विशेष महत्त्व प्राप्त आहे. या वर्षी पिठोरी अमावस्या विशेष महत्वपूर्ण मानली जाते. कारण ही अमावस्या सोमवारी येत असून विशेष म्हणजे ही श्रावणातील सोमवार आहे, येणाऱ्या अमावस्येला सोमवती अमावस्या म्हंटले जाते. श्रावण महिन्यात कृष्ण पक्षात येणारी अमावस्या पिठोरी अमावस्या म्हणून साजरी केली जाते. या वर्षी सोमवती पिठोरी अमावस्या ही 6 सप्टेंबर रोजी येत आहे.

धार्मिक मान्यते नुसार पिंपळाची पूजा करावी.पिंपळाच्या झाडामध्ये सर्व देवतांसाहित पितरांचा देखील वास असतो. ही अमावस्या श्रावणात आल्यामुळे भगवान भोलेनाथ बरोबर माता पार्वती, गणेशाची पूजा करणे हे देखील शुभ मानले जाते. शुद्ध अंतःकरणाने महादेव पार्वतीची पूजा केल्याने जीवनातील मनोकामना पूर्ण होतात.

दिनांक 6 सप्टेंबर रोजी सोमवार सकाळी 7 वाजून 40 मिनिटांनी अमावस्येला सुरवात होऊन उत्तर रात्री 6 वाजून 22 मिनिटांनी अमावस्या समाप्त होणार आहे. अमावस्येच्या समाप्तीनंतर श्रावण महिना संपणार आहे. पिठोरी अमावस्येचा प्रभाव या काही खास राशींचा भाग्योदय घडवून आणणार आहे. अमावस्येपासून पुढे येणार काळ आपल्या जीवनात राजयोगाचे दिवस आणणार आहेत. भोलेनाथांची विशेष कृपा या राशींवर बरसणार आहे.

अचानक नशीबाला कलाटणी प्राप्त होईल. दुःख, यातना नष्ट होतील. सुखाचे दिवस येतील. उद्योग व्यापार या मध्ये प्रगती घडून येईल. धनालाभाच्या संधी प्राप्त होतील. चला तर वेळ वाया न घालवता पाहुयात कोणत्या आहेत त्या भाग्यवान राशी आणि त्यांना कोणते फळ प्राप्त होणार आहेत.

सुरुवात करूयात मेष राशी पासून या राशी वर पिठोरी अमावस्येचा प्रभाव पडणार असून येणार काळ आपल्या जीवनातील आनंदाचा काळ ठरणार आहे. भगवान बोलनाथाची विशेष कृपा आपल्या राशींवर बरसणार असून पितरांचा आशीर्वाद प्राप्त होणार आहे. जीवनातील दुःख दारिद्रय संपणार आहे. आपल्या जीवनात सुंदर दिवस येतील. जीवन आनंदी आणि प्रसन्न बनेल. जिद्ध आणि चिकाटीने केलेले कामात यश मिळेल. या काळात आपल्या आत्मविश्वास वाढण्याची शक्यता आहे. इथून पुढे भाग्य आपल्याला भरपूर प्रमाणात साथ देणार आहे. आर्थिक आवक वाढण्याचे संकेत आहेत. वैवाहिक जीवनात आनंदाचे दिवस येतील.

यानंतर आहे वृषभ राशी. वृषभ राशीसाठी येणारा काळ अतिशय शुभ फलदायी ठरणार आहे. या काळात मनाप्रमाणे सगळं होणार आहे. मनोवांचीत फल प्राप्त होण्याचे संकेत आहेत. अडलेली कामे पूर्ण होणार आहेत. भाग्य आपल्याला भरपूर प्रमाणात साथ देणार आहे. उद्योग व्यापारात वाढ घडून येण्यास सुरुवात होणार आहे. सरकारी कामात येणारे अडथळे आता दूर होणार आहेत.

या नंतर आहे कर्कराशी. कर्कराशी साठी सर्वच बाजूने चांगला योग येणार आहे. पिठोरी अमावस्येचा सकारात्मक प्रभाव आपल्या राशींवर पडणार असून हा काळ आपल्यासाठी विशेष लाभदायक ठरणार आहे. योजलेल्या योजना सफल बनतील. भगवान भोळेनाथांची आशीर्वाद आपल्याला प्राप्त होणार आहे. त्यामुळे आर्थिक प्राप्तीचे नवे श्रोत प्राप्त होतील. हाती पैसा खेळता राहणार आहे.

यानंतर आहे सिंह राशी. सिंह राशींवर सोमवती पिठोरी अमावस्येचा अतिशय सकारात्मक प्रभाव पडणार आहे. नाकरीच्या क्षेत्रातिला कामे पूर्ण होतील. कोर्टात चालू असलेल्या केसेस आपल्या बाजूने येतील. उधोग व्यवसायात आणि नोकरीत प्रगतीचे मार्ग मोकळे होणार आहेत. या काळात माता लक्ष्मी चा आशीर्वाद आपल्यावर बरसणार आहे.

यानंतर आहे कन्या राशी. कन्या राशीचे भाग्य आता उदयास येण्यास सुरुवात होणार आहे. पिठारी अमावस्येचा सकारात्मक प्रभाव आपल्यावर पडणार आहे. मागच्या काळात झालेले आर्थिक नुकसान या काळात भरून निघेल. आपल्या परिवारात चालू असणारे कलह आता संपणार आहेत. महादेवाच्या कृपेने संसारी जीवनात वाढ होणार आहे. आपल्या जीवनातील दुःखाचा काळ आता संपणार आहे. आर्थिक प्राप्तीच्या साधनांमध्ये वाढ दिसून येईल. राजकीय आणि सामाजिक क्षेत्रात आपले प्रयत्न फळाला येणार आहेत. येणाऱ्या काळात आपल्या ओळखी मध्ये वाढ होईल.

Leave a Reply

Your email address will not be published.