१० वर्षे जुनाट त्वचारोग,खाज,खरूज,नायटा;या उपायाने झाले बरे। मांड्यांवरील खाज रात्रीत गायब।

सध्याचा ऋतु पावसाळा आहे आणि पावसाळाच काय कोणत्याही ऋतूमध्ये अनेक जणांना फंगल इन्फेक्शनला सामोरे जावे लागते. गजकर्ण, खरूज, नायटा, खुजली वगैरे वेगवेगळे त्वचारोग असतात आणि या त्वचारोगाला सामोरे जावे लागते. खास करून या पावसाळ्यामध्ये आपल्या शरीराची स्वच्छता व्यवस्थित न राहिल्यामुळे या समस्या आपल्याला उदभवू शकतात.

अनेकांना फंगल इन्फेक्शन असते, वर्षानुवर्षे या फंगल इन्फेक्शनचा त्रास त्यांना जाणवत असतो. कधी कमी होतो, कधी जास्त होतो. वेगवेगळी औषधं वापरतात, क्रिम वापरतात पण ती वापरण्याची पद्धत अनेकांना माहीत नसते आणि कदाचित त्या क्रिमचा उलटही साईड इफेक्ट होऊ शकतो.

तर अशा लोकांचा प्रॉब्लेम एका रात्रीमध्ये बरा होणार आहे. यासाठी आपण तीन पदार्थ वापरणार आहोत. पहिला पदार्थ आहे ऍलोवेरा जेल. जे बाजारामध्ये उपलब्ध असते. जर जेल उपलब्ध झालं नाही तर कोरफडीचे फ्रेश पान घ्या. कारण ते शंभर टक्के प्युअर असते. म्हणून कोरफडीचे पान आहे त्याचा एक चमचा गर घ्या.

स्किनच्या कोणत्याही प्रॉब्लेममध्ये कोरफड आपण वापरत असतो. दुसरी वस्तु आहे नारळाचे तेल. आपण बहुतेक जण पॅराशूटचे तेल वापरतो. हे तेल एक चमचाभर घ्यायचं आहे. यामध्ये व्हिटॅमिन A, तसेच स्किनला फायदेशीर असणारे वेगवेगळे घटक आहेत ते असतात. यानंतर आपण घेणार आहे आयुर्वेदामधला महत्त्वाचा घटक कापुर.

आपल्याला दोन ते तीन छोटे छोटे कापुराचे तुकडे घ्यायचे आहेत आणि त्याची पूड करायची आहे आणि ती पूड या मिश्रणामध्ये टाकायची आहे. अँटीफंगल, अँटीबॅक्टरीयल प्रॉपर्टीस असणारा हा कापूर नक्कीच आपल्याला स्किन इन्फेक्शनपासून दूर ठेवणार आहे आणि झालेले स्किन इन्फेक्शन आहे त्यातून लवकर सुटका होणार आहे. हे सर्व घटक व्यवस्थित मिक्स करा. आपले हे मिश्रण तयार होईल.

फक्त हे मिश्रण लावताना काळजी घ्यायची आहे ती म्हणजे आपण जिथे इन्फेक्शन झाले आहे तिथे कापसाचा बोळा वापरून त्याच्या साहाय्याने तिथे गोलाकार पध्दतीने लावायचे आहे. हात, बोट आपल्याला वापरायचे नाही. बऱ्याच वेळा आपले हात इन्फेक्टड असतात त्यामुळे उलट जास्त संक्रमण होते आणि म्हणून हे जे खरूज, गजकर्ण, नायटा आहे ते जास्त पसरण्याची शक्यता असते. म्हणून हे बोटाने लावू नका.

रात्री झोपण्यापूर्वी लावा आणि सकाळी ते धुवून टाका. हा वापर करत असताना तुम्ही कपडे असतील, टॉवेल किंवा कोणतेही पदार्थ, वस्तु या शेयर करू नका आणि स्वतःचे जे कपडे आहेत ते उन्हात चांगले वाळवत जा. पावसाळ्यामध्ये उन्ह कमी असते, त्यामुळे आपण उन्हात कपडे वाळवत नाही आणि म्हणून या इन्फेक्शनला सामोरे जावे लागते. त्वचा रोगापासून जर सुटका करायची असेल तर हा उपाय अत्यंत प्रभावी आहे. तर हा उपाय नक्की करून पाहा.

माहिती कशी वाटली आम्हाला कमेंट करून नक्की कळवा आणि अशी उपयोगी माहिती आपल्या प्रियजणांसोबत नक्की शेयर करा. अशाच अनेक माहितीपुर्ण लेखांसाठी आताच आमचे फेसबुक पेज नक्की लाइक करा.

Leave a Reply

Your email address will not be published.