या दोन राशींचे लग्न झाले तर चांगले पटते…

मित्रांनो एखाद्या व्यक्तीला जाणून घेण्यास बऱ्याच गोष्टी असतात जसं जी आवडतं भोजन, आवडता रंग, गाणं बरंच काही आणि आपल्या आवडीच्या जोडीदाराची निवड करणे हे फारच अवघड काम आहे. पण ज्योतिषशास्त्रामध्ये राशींच्या अशा काही जोड्या सांगण्यात आल्या आहेत की ज्यांची लग्न झाली आणि इतर कुठलीही अडचण नसेल तर अशी लग्न दीर्घकाळ टिकू शकतात किंवा ते एकमेकांचे उत्तम जीवनसाथी होऊ शकतात.

यातली पहिली राशी आहे तुळ आणि सिंह राशीची. तुळ आणि सिंह राशीच्या लोकांचा स्वभाव बराचसा सारखा असतो. हे दोघही सामाजिक असतात आणि लोकांना भेटणं, हसणं, बोलणं या दोघांचाही छंद असतो. त्यांना स्वतःला व्यक्त करायला आवडते. त्यामुळे या राशींचे लग्न झाले तर असे लग्न दीर्घकाळ टिकू शकते.

दुसरी जोडी आहे मेष आणि कुंभ राशीची. या दोन्ही राशींचे लोकं एकमेकांचे जीवनसाथी झाले तर ते उत्तम निर्णय घेऊ शकतात. हे दोघही प्रेम आणि रोमांचाने भरलेले असतात आणि अशा गोष्टी पसंत करतात. दोघही आपल्या जोडीदाराला योग्य स्पेस देणे पसंत करतात. पुढची जोडी आहे मेष आणि कर्क राशीची. मेष राशीचे लोकं नेहमी बहादूर आणि निडर असतात आणि कर्क राशीचे लोक उर्जावान असतात. हे जोडीदाराला देखील उर्जावान ठेवतात.

यानंतरची जोडी अशी आहे राशी चक्रातील पहिली रास आणि राशी चक्रातील शेवटची रास. अर्थातच मेष आणि मीन राशीची जोडी. यांचेदेखील आपापसात प्रेमळ संबंध बनतात. एकमेकांसोबत दोघेही कर्तव्यनिष्ठ आणि एकनिष्ठ असतात. मेष रास अग्नीतत्वाची रास असल्यामुळे अर्थातच स्वभावाने थोडी तापट असते. व त्यांचे लग्न जलतत्वाच्या मीन राशीच्या शांत स्वभावाच्या व्यक्तीशी झाल्यास असं लग्न दीर्घकाळ टिकू शकते.

पुढची जोडी आहे आहे वृषभ आणि कर्क राशीची. हे दोघेही एकमेकांना समान आदर देतात. एकमेकांची प्रशंसा देखील करतात. वृषभ आणि कर्क यांच्यात उत्तम ताळमेळ असतो. कर्क राशीचे लोकं हे खऱ्या मनाचे असतात तर वृषभ राशीचे लोक दुसऱ्यांना मदत करण्यास नेहमी तत्पर असतात. दोघेही घरपरिवारचे महत्त्व जाणून असतात. वृषभ राशीचे आणखी एका राशीबरोबर चांगले पटते आणि ते म्हणजे मकर रास. हे दोघेही एकमेकांसोबत प्रेम आणि समजूतदारीने वागतात.

वृषभ रास असणारे नेहमी मकर राशीच्या लोकांचे काम आणि प्रसन्नचित्त व्यवहाराची प्रशंसा करतात. तर मकर राशीचे लोकं वृषभ राशीच्या उदारता आणि समजदारीला पसंत करतात. पुढची जोडी आहे मेष आणि धनु. धनु राशीचे लोक नेहमी आपल्या मनाचेच ऐकतात. कुठल्याही प्रकारचे नखरे आणि नाटक यापासून ते दूर राहतात. तसेच मेष राशीचे लोक सामाजिक दृष्ट्या सक्रिय असतात आणि वास्तवात जगणं जास्त आवडते.

यानंतरची जोडी आहे कर्क आणि मीन. या दोन्हीही जलतत्वाच्या राशी आहेत. जे त्यांच्या आत्मिक आणि अध्यात्मिक संबंधांना दर्शवते. या दोन्ही राशींचे लोक फार भावुक असतात आणि एकमेकांना दुःख होणार नाही याची नेहमी काळजी घेतात. सिंह राशीच्या लोकांचे धनु राशीच्या लोकांशी चांगले पटते. सिंह राशीचे लोक स्वभावाने थोडे जिद्दी असतात. पण धनु राशीच्या लोकांना यांचा आत्मविश्वास फार आवडतो. त्यामुळे हे प्रत्येक समस्येचं समाधान काढण्यात यशस्वी होतात.

पुढची जोडी आहे सिंह आणि मिथुन राशीची. सिंह राशीचे लोक मानसिक दृष्ट्या सशक्त जोडीदाराची इच्छा ठेवतात. तसेच मिथुन राशीचे लोक दुसऱ्यांना प्रेमाची जाणीव करून देण्याला प्राथमिकता देतात. यानंतरची जोडी आहे कुंभ आणि मिथुन राशीची. या राशीचे लोक जीवनातील प्रत्येक चढ उतारांची साथ देतात. मिथुन राशीवाले चांगल्या कल्पनांची प्रशंसा करतात आणि कुंभ राशीचे जातक कलात्मक असतात.

मिथुन राशीचे आणखी एका राशीसोबत पटते आणि ते म्हणजे तुळ राशीसी. या दोन्ही रास एकमेकांवर पुर्ण अधिकार दाखवणाऱ्या असतात. हीच गोष्ट दोघांमध्ये प्रेम वाढवण्यास मदत करते. या दोघांमधील नातं नेहमीच नवीन वाटते. दोघेही प्रत्येक समस्येवर शांततेने तोडगा काढतात. पुढची जोडी आहे वृषभ आणि वृश्चिक. हे राशीचे लोक बऱ्याच बाबतीत एकसारखे असतात. आपापसातील संबंधांमध्ये दोघेही समान व्यवहार करु शकतात.

वृश्चिक राशीच्या लोकांचे सर्वात उत्तम जोडीदार म्हणून वृषभ राशीचे लोकच असतात. यानंतरची शेवटची जोडी आहे वृश्चिक आणि कर्क. या दोन्हीही जलतत्वाची रास आहेत. म्हणून या दोन्ही राशींचे लोक एकमेकांना सहयोगात्मक पद्धतीने वागतात. या दोन्ही राशींचे लोकं संवेदनशील असतात आणि एकमेकांना समजून घेण्याचा चांगला प्रयत्न करतात.

या होत्या ज्योतिष शास्त्रानुसार राशींच्या काही जोड्या, ज्यांची लग्न झाली तर दीर्घकाळ टिकू शकतात. पण लग्न यशस्वी होण्यासाठी कुठलीही एक गोष्ट कारणीभूत असू शकत नाही तर त्यासाठी दोघांमध्ये सामंजस्य, आपुलकी आणि प्रेम असणे देखील गरजेचे आहे. त्याचबरोबर एकमेकांच्या कुटुंबामध्ये सुद्धा एकमेकांबद्दल आदर असायला हवा आणि हे सगळं जुळून आलं तर अर्थातच सगळे तुम्हाला म्हणतात तुम्ही एकमेकांसाठीच बनले आहात.

Leave a Reply

Your email address will not be published.