देवी-देवतांच्या जुन्या फुटलेल्या मुर्त्या व फोटो यांचे काय करावे? महिलांनी 5 दिवसात पुजा करावी का?

पहिला प्रश्न आहे की आमच्या देवघरामध्ये देवीदेवतांच्या जुन्या मूर्ती झालेल्या आहेत, त्यातील एखादी मुर्ती फुटलेली असेल, एखादा फोटो फाटलेला असेल, जीर्ण झालेला असेल तर त्याचं नक्की काय करावे? अनेक लोकांकडून हे फोटो किंवा मुर्त्या कचऱ्यात अक्षरशः फेकून दिल्या जातात.

जी कचरा गाडी येते त्या गाडीत लोक देवीदेवतांचे मूर्ती,फोटो खराब झालेले फोटो फेकून देताना दिसून येतात. मग कालांतराने त्यांच्या जीवनात अशा काही समस्या उत्पन्न होतात, अशा काही बाधा निर्माण होतात की त्यातून सुटता येत नाही. ज्या मूर्ती, जे फोटो जुने झालेले आहेत, फाटलेले आहेत ते आपण एकतर वाहत्या पाण्यामध्ये विसर्जित करा. त्यामध्ये मग नदी चालेल, ओढा चालेल आणि जर तुमच्याजवळ पाण्याचा स्रोत नसेल तर अशावेळी आपण पिंपळाच्या वृक्षाखाली या जुन्या मूर्ती आणि फोटो ठेवू शकता.

जर एखाद्या रस्त्यावरती खुप रहदारी आहे आणि त्या रस्त्याच्या कडेला एक पिंपळाचे झाड आहे आणि त्या झाडाखाली जेव्हा तुम्ही अशाप्रकारे देवीदेवतांचे जुने फोटो किंवा मुर्ती ठेवता तेव्हा येणाऱ्या जाणाऱ्या प्रवाशांकडून देवीदेवतांच्या मुर्तीची विटंबना होऊ शकते आणि या विटंबनेचा दोष आहे तो आपल्याच माथी शंभर टक्के लागतो. दुसरी गोष्ट म्हणजे आपण ज्या मुर्तीची वर्षानुवर्षे पुजा केली त्यामध्ये ईश्वरी अंश हा येतोच. जरी ती मुर्ती फुटलेली असेल किंवा फोटो खराब झाला असला तरी त्या मुर्ती आणि फोटोमध्ये ईश्वरी अंश असतो आणि अशा ईश्वरी अंशाचा जेव्हा त्याची विटंबना होते येणाऱ्या जाणाऱ्या लोकांकडून किंवा पशु पक्षांकडून अशावेळी ते दोष आपल्या माथी कायमस्वरूपी लागतात.

त्यामुळे सुटका सहजासहजी होत नाही. तर सर्वोत्तम मार्ग असा जर फोटो खराब झाले असतील तर ते अग्निमध्ये सौं हा करा. त्यांना अग्निदेवतेच्या स्वाधीन करा, समर्पित करा. मुर्त्या असतील तर वाहत्या पाण्यात आणि जर वाहते पाणी नसेल तर विहिरी, तलाव, सरोवर, तळे याठिकाणी सुद्धा आपण विसर्जन करू शकता. मित्रांनो अजून एक प्रश्न फार महत्त्वाचा की स्त्रियांनी मासिक धर्मामध्ये म्हणजे महिन्यातील जे पाच दिवस असतात तर त्यावेळी देवपूजा करावी का? किंवा एखादा व्रत करत आहेत, साधना करतायेत तर अशावेळी ते कसे करावे?

हिंदु धर्मशास्त्राने साधक आणि साधिका यांच्यात कोणताही भेदभाव केलेला नाही. मात्र साधिकांच्या बाबतीत निसर्ग चक्रातील हे जे पाच दिवस आहेत या पाच दिवसांना ऋतु काळ म्हणतात आणि हा ऋतु काळामध्ये साधिकेने साधना करू नये, ही थांबवावी. ऋतुकाळ संपेल आणि संपल्यानंतर जिथे ती साधना थांबवली होती तिथूनच ती पुन्हा सुरू करावी. त्यामुळे साधना खंडित होत नाही. तर ज्या ठिकाणी थांबवली होती तिथूनच पुन्हा आपण सुरू करत आहोत त्यामुळे ती साधना खंडित न होता सलग होते.

शेवटचा प्रश्न घर बंद करून जाताना, आपण काही दिवसांसाठी घर बंद करून जात आहोत आणि अशावेळी आपल्याला देवपूजा करणे तर शक्य नाही तर त्यावेळी काय करावे? आपण कोणत्याही कारणास्तव आपण जेव्हा घर बंद करून जाता तेव्हा आपल्या देवघरापुढे एक नारळ आणि त्यावरती एक रुपया ठेवा आणि देवाकडे प्रार्थना करा आमच्या घराचा, आमच्या वास्तूचा आपण सांभाळ करावा आणि आम्ही ज्या कारणासाठी बाहेर पडतोय ते कार्य निर्विघ्नपणे, कोणत्याही प्रकारची बाधा, अडचण न येता पार पडावे अशी देवाजवळ प्रार्थना करा.

अत्यंत साधा सोपा उपाय आहे आणि प्रत्येकाला करता येण्यासारखा आहे. अजून एक महत्वाचा प्रश्न आहे आजारी माणसाने देवपूजा कशी करावी? तुम्ही आजारी पडला असेल स्त्री असो किंवा पुरुष असो तर शक्यतो आपल्याला स्नान, अंघोळ करता येत नाही आणि जर तुम्ही स्नान केलेलं नसेल तर तुम्हाला देवपूजेचा अधिकार नसतो. अशावेळी आपल्या घरातील जी व्यक्ती देवपूजा करत आहे ती देवपूजा आपण फक्त पाहावी. आपण करू शकत नाही व पाहू शकतो. हिंदू धर्मशास्त्रात या पुजेला अतोरी पूजा म्हटले आहे. नारद पुराणामध्ये हा उल्लेख आहे. देवपुजेचे संपूर्ण फळ यामुळे प्राप्त होते. दुसऱ्याने केलेली पुजा ही आपण पाहू शकता.

मित्रांनो कोणत्याही प्रकारची अंध श्रद्धा पसरवणे हा आमच्या पेज चा उद्देश नाही. केवळ भारतीय समाज मान्य असलेल्या कथा, उपाय, विधी आपल्या पर्यंत पोहचवले जातात आमचे पेज कोणत्याही प्रकारच्या अंध श्रद्धेला खतपाणी घालत नाही. इथे शेयर होणारे लेख हे फक्त माहिती साठी आहेत. त्यांचा वापर अंध श्रद्धा म्हणून करू नका.

तुम्हाला काय अजून वाचायला आवडेल हे आम्हाला कमेंट मार्फत नक्की कळवा कारण तुमची एक कमेंट आमचे प्रोत्साहन वाढवत असते. तसेच आमचे फेसबुक पेज हि नक्की लाईक करा जेणेकरून तुम्हाला आमच्या सर्व अपडेट मिळतील आणि त्याच बरोबर आमचे फेसबुक पेज शेअर हि नक्की करा धन्यवाद.

Leave a Reply

Your email address will not be published.