1 चमचा धान्यात टाका धान्यातील कीडे सर्व पळून जातील,दहा वर्ष जरी धान्य ठेवले तरी अजिबात खराब होणार नाही…

नमस्कार मित्रांनो आपले स्वागत आहे. ही एक चमचाभर पावडर आणि आणखी एक घरामधला छोटासा पदार्थ आपल्याला धान्यामध्ये वापरायचा आहे. कडधान्य कुठल्याही प्रकारचे असेल मग ते उडीद असेल, मूग असेल, चवळी असेल किंवा मटकी असेल कुठल्याही प्रकारचे कडधान्य असेल त्यामध्ये जर किड लागली असेल तर ती एक मिनिटामध्ये पुर्णपणे निघून जाईल.

शिवाय हे धान्य कितीही दिवस ठेवले नंतर ते खराब होणार नाही, त्याला किड लागणार नाही. यासाठी तुम्हाला कुठल्याही प्रकारचे रासायनिक किंवा कुठल्याही प्रकारचे केमिकलयुक्त प्रॉडक्ट वापरण्याची गरज नाही. अगदी आपल्या घरामधला पदार्थ वापराचा आहे. याचा इतका जबरदस्त रिजल्ट आहे कुठल्याही प्रकारची किड लागलेली तुम्हाला दिसणार नाही आणि घरामध्ये धान्य कितीही दिवस स्टोअर करून ठेवू शकता.

उसळ खाणे आरोग्याला चांगले असते असे जेव्हा आपण म्हणतो तेव्हा बऱ्याच ठिकाणी प्रश्न विचारले जातात की उसळीसाठी आणलेलं धान्य आहे ते लवकर खराब होते. तर आपण अशाच पद्धतीचा उपाय पाहणार आहोत जो कसल्याही प्रकारच्या किडीपासून धान्याचे संरक्षण करणारा आहे.

याचसाठी आपल्याला घरामधले दोन घटक लागणार आहेत. यासाठी पहिला घटक लागणार आहे मिरची पावडर. प्रत्येकाच्या घरामध्ये मिरची पावडर असते. मिरची पावडर पाहिजे फक्त त्यामध्ये कुठल्याही प्रकारचा मसाला वगैरे टाकलेला नसला पाहिजे. फक्त मिरची पावडर असायला पाहिजे आणि ते करत त्यामध्ये मीठ टाकलेलं असेल तर आपल्याला मीठ स्वतंत्र टाकण्याची गरज नाही. म्हणजे मिरची आणि मीठ एकत्र कुटलेली पावडर आहे ती आपल्याला टाकायची आहे किंवा आपण घरीसुद्धा मिक्सरमध्ये काढून हे करू शकतो.

जर तुम्ही बाजारातून आणलेली मिरची पावडर असेल तर घरामधले एक चमचाभर त्यामध्ये टाकायचे आहे. हे जे मीठ आहे ते आपल्याला मोठं मीठ असते ते जरी वापरलं तरी चालते किंवा बारीक मीठ आहे ते जरी वापरले तरी चालते. या दोन्हीला एक एक चमचाभर टाकायचे आहे. साधारणतः दोन किलोची जी बरणी असते त्यासाठी एक चमचाभर मिरची पावडर आणि एक चमचाभर मीठ आपल्याला त्यामध्ये वापरायचे आहे आणि त्यानंतर ज्या बरणीमध्ये किंवा भांड्यामध्ये हे धान्य ठेवलेले आहे त्याला एकदा चांगल्या रीतीने हलवून घ्यायचे आहे. जर तुमच्या धान्यामध्ये किडे झालेले असतील तर त्यामधली किड एक मिनिटांमध्ये निघून जाईल. टिकवण्यासाठी तुम्ही ठेवत असाल तर त्यानंतर बरणीला बंद करून ठेवायचं आहे. कितीही दिवस ठेवा तुम्ही या धान्याला अजिबात किड लागणार नाही.

तुम्ही हा उपाय करून पाहा. अगदी सोपा आहे, घरातल्या घरात करता येण्यासारखा आहे. एक चमचा मिरची पावडर आणि एक चमचाभर मीठ आपल्याला त्या धान्यांमध्ये टाकायचे आहे. साधारणतः दोन किलोसाठी एक चमचाभर वापरायचे आहे. हे दोन्ही पदार्थ आपल्या आहारामधले आहेत त्यामुळे शरीराला कुठलाही साईड इफेक्ट नाही. मिरची टाकल्यामुळे कुठल्याही प्रकारच्या किटकाची त्याठिकाणी वाढ होत नाही. अत्यंत नैसर्गिक आणि धान्य टिकवणारा हा उपाय आहे. हा उपाय करून पाहा.

माहिती कशी वाटली आम्हाला कमेंट करून नक्की कळवा आणि अशी उपयोगी माहिती आपल्या प्रियजणांसोबत नक्की शेयर करा. अशाच अनेक माहितीपुर्ण लेखांसाठी आताच आमचे फेसबुक पेज नक्की लाइक करा.

Leave a Reply

Your email address will not be published.