सर्वांसाठी लक्ष्मी,सुख,शांती, समाधान मिळवून देणारे शब्द श्री स्वामी समर्थ…

नमस्कार मित्रांनो आपले स्वागत आहे. आपले जीवन तसं धावपळीचे झालंय. दररोज आपण सकाळी उठल्यापासून संध्याकाळी झोपेपर्यंत धावपळच करत असतो. बऱ्याच वेळेस असं वाटतं की शांत बसावे, कुणी आपल्याला बोलू नये, कुणी आपल्याला काही सांगू नये.

अशा वेळेस तुम्ही हा सांगितलेला मंत्र म्हटला तर निश्चितच तुम्हाला समाधान लाभेल. श्री स्वामी समर्थ, होय मंडळी तुम्ही याचा प्रत्यक्ष अनुभव घ्या की हा मंत्र म्हटल्याच्या नंतर तुमचे मन शांत होईल. हा मंत्र म्हणत असताना जपमाळ घेऊन तुम्ही किमान 108 वेळा एकावर्तन किंवा तुम्हाला जसं जमलं तसं 108 वेळाचे दोन, तीन, पाच, सात, नऊ, अकरा आवर्तन करावेत. तुमचं मन शांत होईल, स्थिर होईल.

तुम्ही हा मंत्र, हे शब्द जेव्हा जेव्हा तुमचं मन विचलित होईल, तुम्हाला त्रास होईल किंवा दुःख येतील किंवा पैसा, संपत्ती धन वाढ पाहिजे तेव्हा हा मंत्र म्हणा, जप करा. तुम्हाला तुमच्या व्यवहारात निश्चितच फरक जाणवेल. श्री स्वामी समर्थ अर्थातच अक्कलकोट स्वामी यांचा जन्मवधी 1856 ते 1878 या दरम्यान मानला जातो.

या शतकात हे होऊन गेलेले महान थोर संत होते. महाराष्ट्रातील अक्कलकोट येथील दत्त संप्रदायातील ते असून श्रीपाद वल्लभ व श्री नरसिंह सरस्वती यांच्या नंतरचे भगवान श्री दत्तात्रयजी आहेत त्यांचे तिसरे पुर्ण अवतार मानले जातात. गाणगापूराचे श्री नरसिंह सरस्वती हेच नंतर श्री स्वामी समर्थांच्या रूपाने प्रकट झाले अशी ही बऱ्याच भक्तांची श्रद्धा आहे.

मी नरसिंहभान असून श्री शैलम जवळील कर्दळी वनातून आलो आहे हे स्वामींच्या तोंडातून आलेले उदगार नरसिंह सरस्वती यांचा अवतार असल्याचे सूचित करतात आणि या मंत्रात इतकी अफाट शक्ती आहे की तुमच्या मनातील सर्व दुःख, सर्व चिंता, सर्व वाईट गोष्टी दूर करण्यास हा मंत्र मदत करतो.

मित्रांनो कोणत्याही प्रकारची अंध श्रद्धा पसरवणे हा आमच्या पेज चा उद्देश नाही. केवळ भारतीय समाज मान्य असलेल्या कथा, उपाय, विधी आपल्या पर्यंत पोहचवले जातात आमचे पेज कोणत्याही प्रकारच्या अंध श्रद्धेला खतपाणी घालत नाही. इथे शेयर होणारे लेख हे फक्त माहिती साठी आहेत. त्यांचा वापर अंध श्रद्धा म्हणून करू नका.

तुम्हाला काय अजून वाचायला आवडेल हे आम्हाला कमेंट मार्फत नक्की कळवा कारण तुमची एक कमेंट आमचे प्रोत्साहन वाढवत असते. तसेच आमचे फेसबुक पेज हि नक्की लाईक करा जेणेकरून तुम्हाला आमच्या सर्व अपडेट मिळतील आणि त्याच बरोबर आमचे फेसबुक पेज शेअर हि नक्की करा धन्यवाद.

Leave a Reply

Your email address will not be published.