संपूर्ण श्रावण महिन्यात कोणताही उपाय करण्यास जमलं नसेल तर करा फक्त हे १ काम पैशांचा पाऊस पडेल…

मित्रांनो काही दिवसांतच श्रावण महिना संपणार आहे. या संपूर्ण श्रावण महिन्यामध्ये जर तुम्ही कोणताही उपाय केला नसेल संसारातील काही अडचणींमुळे, नोकरी धंद्यामुळे तुम्हाला हे जमलं नसेल तर हा उपाय नक्की करून पाहा. हा उपाय तुम्ही पाच दिवस करायचा आहे. सलग पाच दिवस किंवा अगदीच शक्य नसेल तर एक दिवस करू शकता.

या उपायामुळे तुमची कोणतीही मनोकामना किंवा असुद्या तुमच्या आर्थिक समस्या असतील, जीवनातील दुःख असतील, संकट असतील त्याचा या उपायामुळे नाश होणार आहे. तुम्ही तुमच्या घरामध्ये सुखशांती आणि समृद्धी नांदेल. मित्रांनो श्रावण महिना म्हणजे भोलेनाथांचा अत्यंत प्रिय महिना. या महिन्यामध्ये भोलेनाथांची विशेष पुजा आराधना केली जाते, शिवलिंगाला जलाभिषेक केले जातात.

सर्व शिवभक्त या श्रावण महिन्याची आतुरतेने वाट बघत असतात. जेणेकरून या महिन्यात भोलेनाथांची विशेष पुजा करून, त्यांच्या मंत्राचा जप करून काही उपाय करून महादेवांची शीघ्र कृपा प्राप्त होईल. जी व्यक्ती मनापासून, पूर्ण विश्वासाने, श्रद्धेने भगवान शिवशंकरांची पुजा करते त्यांच्यावर भोलेनाथ अपार कृपा करतात.

तुमच्या जीवनात खूप अडचणी येत आहेत, एकामागून एक संकट येत आहेत, घरात अशांती आहे किंवा इतर काही समस्या असेल यासाठी श्रावण महिन्यातील कोणत्याही सोमवारी तुम्हाला उपाय करायला जमलं नसेल संपूर्ण श्रावण महिन्यात हे शक्य झाले नसेल तर या राहिलेल्या चार पाच दिवसांमध्ये तुम्ही हा उपाय करू शकता. फक्त गरज आहे हे उपाय करताना मनामध्ये दृढ विश्वास ठेवण्याची की भोलेनाथ माझी इच्छा नक्कीच पूर्ण करणार आहेत. चला तर पाहुया कोणता उपाय आहे.

यासाठी आपल्याला पाच दिवे लागणार आहेत. यासाठी तुम्ही पितळेच्या किंवा मातीच्या ज्या पणत्या असतात त्याचा वापर करू शकता किंवा एका दिव्यामध्ये पाच वाती लावून हा उपाय करू शकता. आपल्याला हा उपाय करायचा आहे रात्री 11ते 12 या वेळेत. कारण भोलेनाथांची, महादेवांची रात्रीची पुजा ही विशेष मानली जाते. यावेळी जे कोणी भक्त भोलेनाथांची पुजा करतात, त्यांची आराधना करतात त्यांना भोलेनाथ शीघ्र प्रसन होतात. त्यामुळे हा उपाय रात्री 11 ते 12 या वेळेत करायचा आहे.

हा उपाय करण्यासाठी आपले हातपाय स्वच्छ धुवून घ्यायचे आहेत आणि त्यानंतर आसन टाकून शिवलिंगासमोर बसायचे आहे. शक्य असेल तर तुम्ही मंदिरात जाऊन हा उपाय करा. अगदीच शक्य नसेल तर तुमच्या घरामध्ये शिवलिंग असेल तर घरातल्या घरात हा उपाय करू शकता. आपल्याला पाच दिवे प्रज्वलित करायचे आहेत. यासाठी आपल्याला गाईच्या तुपाचा वापर करायचा आहे. गाईचे तुप नसेल तर तुम्ही तिळाच्या तेलाचा वापर करू शकता.

मित्रांनो हे दिवे स्वच्छ असावेत. जर तुम्ही मातीच्या पणत्या घेत असाल तर त्या आधी वापरलेल्या नसाव्यात, नव्या पणत्या घ्यायच्या आहेत. या दिव्यांमध्ये गाईचे तुप किंवा तिळाचे तेल टाकून हे दिवे प्रज्वलित करायचे आहेत आणि यावेळी एका मंत्राचा उच्चारण आपल्याला करायचा आहे. मित्रांनो या मंत्राचा जप तुम्ही 108 वेळा करायचा आहे. शक्य असेल तेवढा जास्त वेळ मंत्राचा जप करू शकता. हा उपाय करताना शांतता ठेवायची आहे. एकाग्र चित्ताने या मंत्राचे उच्चारण करायचे आहे.

यावेळी तुम्हाला रुद्राक्षाच्या माळेचा वापर करायचा आहे. मित्रांनो चुकूनही शिवशंकरांच्या मंत्राचा जप तुळशीच्या माळेवर करू नका. यासाठी आपल्याला रुद्राक्षाचीच माळ घ्यायची आहे. मित्रांनो मंत्र आहे “ओम सांभ सदा शिवाय नमः”. या मंत्राचा जप आपल्याला करायचा आहे आणि हे दिवे प्रज्वलित केल्यानंतर, मंत्रजप झाल्यानंतर भोलेनाथांना पंचामृताचा नैवेद्य दाखवायचा आहे. लक्षात ठेवा, हा उपाय तुम्हाला रात्री 11 ते 12 यावेळेतच करायचा आहे.

यासाठी तुम्हाला सोमवारची वाट बघण्याची गरज नाही. श्रावण महिन्यातील कोणत्याही दिवशी सलग पाच दिवस, सलग तीन दिवस किंवा फक्त एक दिवस देखील तुम्ही हा उपाय करू शकता. हा उपाय तुम्ही करून पाहा. याचे तुम्हाला चांगले परिणाम बघायला मिळतील. भोलेनाथ तुमच्या सर्व इच्छा पुर्ण करतील. श्रावण महिन्यात तुम्हाला कोणतीच पुजा करणं जमलं नसेल, कोणत्याही मंत्राचा जप केला नसेल, शिवलिंगाला अभिषेक केला नसेल तर हा एक उपाय नक्की करून पाहा. अगदी दृढ विश्वासाने, श्रद्धेने करा भोलेनाथ तुमच्या इच्छा नक्की पुर्ण करतील.

माहिती कशी वाटली आम्हाला कमेंट करून नक्की कळवा आणि अशी उपयोगी माहिती आपल्या प्रियजणांसोबत नक्की शेयर करा. अशाच अनेक माहितीपुर्ण लेखांसाठी आताच आमचे फेसबुक पेज नक्की लाइक करा.

Leave a Reply

Your email address will not be published.