श्रावण संपण्यापूर्वी शिवमंदिरातून घरी आणा हि वस्तू त्या क्षणापासूनच समस्या होतील नष्ट…

मित्रांनो श्रावण महिना काही दिवसातच संपेल तर हा श्रावण महिना संपण्यापूर्वी शिवमंदिरातून आपल्या घरात ही एक वस्तु नक्की आणा. यामुळे तुमच्या जीवनातील दुःखांचा, संकटांचा, सर्व समस्यांचा नाश होईल. भोलनाथांचा आशीर्वाद आपल्या कुटुंबावर राहील. आपल्या घरामध्ये सुख, समृद्धी आणि समाधान नांदेल. त्या कोणत्या वस्तु आहेत ज्या आपल्याला श्रावण महिन्यात शिवमंदिरातून आपल्या घरी घेऊन यायच्या आहेत.

यातील सर्वात पहिली वस्तु आहे त्रिशुळ. त्रिशुळ हे भोलेनाथांचे शस्त्र आहे. असे त्रिशुळ आपण श्रावण महिन्यामध्ये शिवमंदिरातून आपल्या घरी आणले तर यामुळे भोलेनाथांचा आशीर्वाद आपल्यावर राहतो. आपले जे काही शत्रू असतील त्यांचा देखील नाश होतो. मित्रांनो आपले शत्रु आपले मित्र बनतात.

तर असे त्रिशुळ तुम्ही श्रावण महिन्यात आपल्या घरी नक्की घेऊन या. यासाठी आपण दुकानातून एखादं त्रिशुळ घ्यायचं आहे, अगदी छोटंसं त्रिशुळ असेल तरीही चालेल आणि हे त्रिशुळ घेऊन शिवमंदिरात जायचं आहे. तिथे जाऊन त्या त्रिशुळाची पुजा करायची आहे, त्याला चंदन लावायचे आहे. त्यावर बेल अर्पण करायचा आहे.

शिवलिंगाची देखील आपल्याला पुजा करायची आहे आणि अशाप्रकारे पुजा झाल्यानंतर ते त्रिशुळ आपल्या घरी आणायचे आहे. यामुळे तुमच्या घरावर, तुमच्या कुटुंबावर कोणतेही संकट येणार नाही. यानंतर दुसरी वस्तु आहे एक मुखी रुद्राक्ष. तुम्हाला माहीत आहे की रुद्राक्ष हे भोलेनाथांना किती प्रिय आहे. भोलेनाथांच्या गळ्यामध्ये रुद्राक्षांच्या माळा आहेत. ज्या घरामध्ये रुद्राक्ष असते त्या घरामध्ये कधीही कोणतेही संकट येत नाही. कोणत्याही प्रकारच्या आर्थिक समस्यांचा सामना या कुटुंबाला करावा लागत नाही. तर असं एकमुखी रुद्राक्ष घरी घेऊन यायचं आहे.

यासाठी सुद्धा त्रिशुळासारखेचं तुम्हाला हे रुद्राक्ष आहे मंदिरात घेऊन जायचं, त्या ठिकाणी रुद्राक्षाची पुजा करायची, शिवलिंगाची देखील पुजा करायची आहे आणि त्या शिवलिंगाजवळ हे रुद्राक्ष काही वेळासाठी तुम्हाला ठेऊन द्यायचं आहे. सतत “ओम नमः शिवाय” या मंत्राचा उच्चारण करत राहायचं आहे, जप करत राहायचं आहे आणि काही वेळाने हे रुद्राक्ष आपल्या घरी घेऊन यायचं आहे. हे रुद्राक्ष तुमच्या देव्हाऱ्यामध्ये ठेवू शकता आणि त्याची नित्यनियमाने पुजा करायची आहे. यामुळेदेखील भगवान भोलेनाथांचा आशीर्वाद आपल्यावर राहतो.

आपल्या मनात जर काही इच्छा असेल तर तीसुद्धा भोलेनाथ पुर्ण करतात. हे रुद्राक्ष जेव्हापासून तुमच्या घरामध्ये येईल तेव्हापासून तुमच्या घरामध्ये नकारात्मक ऊर्जा नावाला देखील शिल्लक राहणार नाही. तर असे हे एकमुखी रुद्राक्ष श्रावण महिना संपण्यापूर्वी शिवमंदिरातून आपल्या घरी नक्की घेऊन या. यानंतर पुढची वस्तु आहे बेलपत्र. शिवमंदिरात आपण जेव्हा पुजा करतो तेव्हा जे बेलपत्र शिवलिंगावर अर्पण केलेले असतात त्यातील काही बेलपत्र आपण आपल्या घरी घेऊन यायची आहेत आणि त्याचं तोरण बनवायचं आहे.

ज्याप्रमाणे आपण मुख्य दरवाज्यावर तोरण लावतो त्याप्रमाणे या बेलाच्या पानाचे तोरण बनवायचे आहे आणि ते आपल्या घराच्या मुख्य दारावर लावायचे आहे. हा उपाय श्रावणातील सोमवारी केला तर अतिउत्तम नाहीतर कोणत्याही दिवशी बेलपत्र, त्रिशुळ किंवा रुद्राक्ष शिवमंदिरातून आपल्या घरी घेऊन येऊ शकता. तुम्हाला शक्य असेल तर या तीनही वस्तु आणू शकता आणि शक्य नसेल तर यापैकी एकतरी वस्तु घरी आणली तरीसुद्धा भोलेनाथांचे आशीर्वाद तुम्हाला लाभणार आहेत, त्यांची कृपा तुम्हाला प्राप्त होणार आहे. तुमच्या कुटुंबावरील सर्व संकट, दुःख, समस्या यांचा भोलेनाथ नाश करणार आहेत. तुमच्या सर्व इच्छा, मनोकामना भोलेनाथ पुर्ण करोत हीच भोलेनाथांच्या चरणी प्रार्थना.

मित्रांनो कोणत्याही प्रकारची अंध श्रद्धा पसरवणे हा आमच्या पेज चा उद्देश नाही. केवळ भारतीय समाज मान्य असलेल्या कथा, उपाय, विधी आपल्या पर्यंत पोहचवले जातात आमचे पेज कोणत्याही प्रकारच्या अंध श्रद्धेला खतपाणी घालत नाही. इथे शेयर होणारे लेख हे फक्त माहिती साठी आहेत. त्यांचा वापर अंध श्रद्धा म्हणून करू नका.

तुम्हाला काय अजून वाचायला आवडेल हे आम्हाला कमेंट मार्फत नक्की कळवा कारण तुमची एक कमेंट आमचे प्रोत्साहन वाढवत असते. तसेच आमचे फेसबुक पेज हि नक्की लाईक करा जेणेकरून तुम्हाला आमच्या सर्व अपडेट मिळतील आणि त्याच बरोबर आमचे फेसबुक पेज शेअर हि नक्की करा धन्यवाद.

Leave a Reply

Your email address will not be published.