फक्त 5 दिवस या वनस्पतीचा रस घ्या शुगर च्या गोळ्या कायमच्या फेकून द्या,लिव्हर आतून पूर्ण स्वच्छ,मधुमेह…

नमस्कार मित्रानो,

पावसाळ्यामध्ये अनेक चमत्कारिक आयुर्वेदिक वनस्पती उगवत असतात त्यामधलीच ही एक वनस्पती आहे. या वनस्पतीने खराब झालेलं लिव्हरसुद्धा ठीक होऊ शकते. इतकी ही वनस्पती उपयुक्त आहे. या वनस्पतीने स्वादुपिंडाचे कार्य आहे ते अनेक पटीने वाढते आणि शरीरामध्ये कितीही प्रमाणात शुगर वाढली असेल ती पुर्णपणे नॉर्मल फक्त पाच दिवसांत कमी करण्याची क्षमता या वनस्पतीमध्ये आहे.

ही वनस्पती आयुर्वेदिक दुकानांमध्ये सुद्धा मिळते. मानवी शरीरामध्ये लिव्हर आणि स्वादुपिंडाचे कार्य आहे हे अत्यंत महत्त्वाचे आहे. ज्यांचे लिव्हर आणि स्वादुपिंड व्यवस्थितरित्या काम करते, हे दोन्हीही अवयव एकमेकांजवळ आणि एकमेकांवर अवलंबून असतात. जर यांचे कार्य व्यवस्थित असेल तर कुठल्याही प्रकारचे पित्त तुम्हाला होणार नाही, जळजळ होणार नाही, मळमळ होणार नाही, अपचन, गॅसेस होणार नाही. त्याचबरोबर तुमच्या शरीरामध्ये अतिरिक्त चरबी साठणार नाही.

त्याचबरोबर तुम्हाला कुठल्याही प्रकारचा डायबेटिस झालेला असेल तर तो दुरुस्त होईल आणि ज्यांना डायबेटिस होण्याची शक्यता आहे कधीही त्यांना डायबेटिस होणार नाही. तर या वनस्पतीचे नाव आहे कडूनाई. हिंदीमध्ये छोटा किरायता सुद्धा म्हणतात. अत्यंत उपयुक्त अशी वनस्पती आहे. याला छोटी छोटी लांबट पाने येतात आणि पांढरी फुलं असतात. ही चवीला अत्यंत कडू असतात. त्यामुळे आपल्याला ही वनस्पती सहज ओळखता येते.

थंडी तापासाठी, मलेरिया या वनस्पतीचा वापर केला जातो. कुठल्याही प्रकारच्या आजारांमध्ये व्यक्तीच्या पचनक्रियेसाठी आणि लिव्हर आणि स्वादुपिंडासाठी या वनस्पतीचा वापर अत्यंत उपयुक्तरित्या करता येतो. म्हणून या वनस्पतीचा वापर हा प्रत्येकाने वर्षातून दोन दिवस जरी केला तरी स्वादुपिंडाचे काम सुरळीतपणे ही वनस्पती करते.

आपल्या शरीरामध्ये लिव्हर हा अत्यंत महत्त्वाचा घटक आहे. आपल्या शरीरामधून पचलेल्या पदार्थांमधून चरबी आणि प्रथिने याच्यावर प्रक्रिया करण्याचे काम, रक्त गोठवण्यासाठी आवश्यक प्रथिने निर्माण करण्याचे काम त्याचबरोबर शरीरामध्ये जे टॉक्सिक इलेमेंट आहेत त्याला बाहेर काढण्याचे काम लिव्हर करत असते.

आपल्या शरीरातील शुगर नियंत्रित ठेवण्यासाठी स्वादुपिंड अत्यंत महत्त्वाचे काम करत असतो. म्हणून या दोन्हींचे काम सुरळीत करण्यासाठी या वनस्पतीचे सेवन करायचे आहे. ज्यांना मधुमेह झालेला आहे अशा व्यक्तींनी तर या वनस्पतीचे अवश्य सेवन करायचे आहे. तुमची शुगर कितीही वाढली असेल तर तो नॉर्मल करण्याचे काम ही वनस्पती करते आणि तुम्ही या वनस्पतीचे सात दिवस सलग सेवन केले तर तुमच्या शरीरामध्ये शुगर वाढणार नाही.

जर तुम्हाला ही वनस्पती ताजी मिळाली तर ताजी आणायची आहे आणि ती स्वच्छ धुवून घ्यायची आहे. त्याची पाने काढायची आहे, ती पाने ठेचून घ्यायची आहे आणि त्यामध्ये पाणी मिक्स करून आपल्याला त्याचा रस काढायचा आहे. साधारण 15 ते 20 मिली रस आपल्याला घ्यायचा आहे. जास्त जरी घेतला तरी याचा कुठलाही साईड इफेक्ट नसतो. सकाळी उपाशीपोटी आपल्याला सेवन करायचे आहे.

ज्या व्यक्तींना मधुमेह आहे, शुगर खुप वाढलेली आहे अशा व्यक्तींनी सलग या वनस्पतीचा जो रस आहे तो सात दिवस घ्यायचा आहे. ज्या लोकांना याची ताजी पाने मिळणार नाहीत त्यांनी आयुर्वेदिक दुकानातून वाळलेला पाला आणलेला असेल तर त्याचे सेवन कसे करायचे? तर तो पाला साधारण दोन कप पाण्यामध्ये रात्रभर भिजत घालायचा आहे. सकाळी उठल्यावर ती पाने किंवा पावडर ती काढून टाकायची आहे आणि त्याचा आर्क उतरलेला रस आहे तो आपल्याला सकाळी उपाशीपोटी घ्यायचा आहे. सलग सहा ते सात दिवस हा उपाय करा.

तुमची शुगर पुर्णपणे नॉर्मल होईल, तुमचं लिव्हर खराब झाले असेल तर लिव्हर दुरुस्त होईल. स्वादुपिंडाचे कार्य याने सुरळीत होईल. त्यामुळे शुगर शरीरात वाढणार नाही. त्याचबरोबर ज्यांना पित्ताची समस्या आहे, जळजळ, मळमळ, गॅस होतो त्यांची समस्या तीन दिवसामध्ये निघून जाईल. जिथं दिसेल तिथं या वनस्पतीची पाने अवश्य तोडून आपल्याजवळ ठेवा, सुखवुन ठेवा. आयुष्यामध्ये कधीही उपयुक्त येणारी ही वनस्पती आहे. तर या वनस्पतीचा अवश्य वापर करा.

माहिती कशी वाटली आम्हाला कमेंट करून नक्की कळवा आणि अशी उपयोगी माहिती आपल्या प्रियजणांसोबत नक्की शेयर करा. अशाच अनेक माहितीपुर्ण लेखांसाठी आताच आमचे फेसबुक पेज नक्की लाइक करा.

Leave a Reply

Your email address will not be published.