न पचलेले सडलेले अन्न चुटकीत बाहेर फेका,कोठा किवा पचन मार्ग धुतल्यासारखा नेहमी साफ ठेवा,पित्त,अपचन…

नमस्कार मित्रानो,

अपचन, करपर ढेकर येणे, छातीमध्ये जळजळ होणे, गॅस होणे, बैचेन झाल्यासारखे होणे, मळमळ होणे, आळस आणि थकवा आणि त्यामुळे झोप लागणे, पोट व्यवस्थित साफ न होणे, अयोग्य आहारामुळे सध्या अपचनाच्या आणि विशेषतः पोट साफ न होण्याच्या समस्या जास्तीत जास्त लोकांना जाणवू लागल्या आहेत.

आपण जे खातो त्याचं पचन होणे खुप महत्त्वाचे असते आणि त्यापेक्षाही अन्न पचन न झालेले किंवा अर्धवट जे पचलेले आहे ते पोटामध्ये सडू न देणे आणि त्याला बाहेर फेकणे हे खुप महत्त्वाचे असतेया आणि 90% लोकांना हाच त्रास होत आहे. खाल्लेल अन्न किंवा न पचलेले अन्न आहे ते पोटामधून बाहेर फेकले जात नाही आणि त्याच ठिकाणी राहून ते सडते आणि पोटामध्ये अन्न सडल्यामुळे गॅसेस होणे, जळजळ होणे, ऍसिडिटी होणे सडलेल्या अन्नाचे जे विष आहे ते शरीरात पसरल्यामुळे मोतीबिंदू, संधीवात, आतड्याचा कर्करोग, चेहऱ्यावर मुरूम येणे, तोंड येणे अशा प्रकारचे अनेक त्रास हे होत आहेत.

पोटामध्ये जे अन्न आहे त्याला सडू न देणे किंवा न पचलेले, अर्धवट अन्न सडू न देता बाहेर फेकणे खुप महत्त्वाचे आहे. आजचा उपाय हा त्याच पद्धतीचे काम करतो. ते तुमच्या पोटामध्ये अन्न अजिबात सडू देत नाही आणि न पचलेले, अर्धवट पचलेले जे अन्न आहे त्याला बाहेर फेकण्याचे काम करतो. यासाठी आपल्याला घरातलेच फक्त दोन घटक लागतात.

अतिशय सोपा उपाय आहे, परंतु पोटाच्या आरोग्यासाठी खुप महत्त्वाचा आहे. यासाठी पहिला घटक लागणार आहे धने. तुम्ही धने वापरू शकता किंवा धन्याची पूड वापरू शकता. आपल्याला धने कुटून घ्यायचे आहेत, त्याची पूड बनवायची आहे. धने हे शितल असतात, वायुहारक असतात. सर्वात महत्त्वाचे म्हणजे आयुर्वेदामधील अँटीऍसिड आहे.

तुमच्या पोटामधील, शरीरामधील ऍसिड कमी करते. म्हणून एक चमचाभर धने पूड घ्यायचे आहे. एक ग्लास पाण्यामध्ये एक चमचा धने पूड उकळवायला ठेवायचे आहे. दोन ते तीन मिनिटे चांगल्या रीतीने उकळवून घ्यायचे आहे. उकळून घेतल्यानंतर त्याला गाळून घ्यायचं आहे. हा जो काढा आहे त्याला कोमट होऊ द्यायचे आहे.

पुर्णपणे गार होऊ द्यायचं नाही, कोमट होऊ द्यायचं आहे. कोमट झाल्यानंतर त्यामध्ये दुसरा घटक मिक्स करायचा आहे तो आहे अर्धा लिंबू. लिंबू हे या समस्येवरचे सर्वात महत्वाचे फळ आहे. लिंबु हे अमशयामधील जे घातक जिवाणू आहेत त्याच्यावर हल्ला करते आणि त्यांना नष्ट करते. तसेच जास्त झालेलं आम्ल किंवा अर्धवट किंवा अपचन झालेले जे अन्न आहे त्याला बाहेर काढण्याचे काम म्हणजे पोट साफ करण्याचे काम हे करते. म्हणून आपल्याला अर्धा लिंबू घ्यायचा आहे.

अर्धा लिंबू या काढ्यामध्ये पिळायचा आहे आणि चांगल्यारीतीने हलवून घ्यायचे आहे. तर आपण हे दोन वेळेला घेऊ शकतो. तुम्हाला ज्या वेळेला शक्य आहे त्या वेळेला घेऊ शकता. एकतर सकाळी उठल्यावर उपाशीपोटी घ्यायचं आहे किंवा सकाळी तुम्हाला शक्य नसेल तर रात्री झोपण्याच्या आधी अर्धा ते एक तासाने म्हणजे रात्रीचे जेवण झाल्यानंतर हे घ्यायचं आहे. दोन्हीपैकी कुठल्याही वेळेला घेऊ शकता. दहा ते अकरा दिवस हा उपाय करा, तुमच्या पोटामधील साचलेली घाण आहे ती पुर्णपणे साफ व्हायला लागेल.

तुमच्या पोटामध्ये अन्न अजिबात सडणार नाही. अपचन, करपर ढेकर या सगळ्या समस्या पुर्णपणे निघून जातील. एक वेळेस वर्षातून जर हा उपाय केला तर वर्षभर तुम्हाला कुठल्याही प्रकारची अपचन, मळमळ या गोष्टी होणार नाहीत. आयुर्वेदिक आहे, याचा कुठलाही साईड इफेक्ट नाही. शरीरासाठी सुद्धा हे खुप चांगले आहे, याने उष्णता सुद्धा नष्ट होते. यानंतर तुम्ही पित्ताची गोळी किंवा विविध प्रकारचे चूर्ण, काढे वगैरे अजिबात घेणार नाहीत. तर हा साधा उपाय अवश्य करा.

माहिती कशी वाटली आम्हाला कमेंट करून नक्की कळवा आणि अशी उपयोगी माहिती आपल्या प्रियजणांसोबत नक्की शेयर करा. अशाच अनेक माहितीपुर्ण लेखांसाठी आताच आमचे फेसबुक पेज नक्की लाइक करा.

Leave a Reply

Your email address will not be published.