मित्रांनो घर म्हटलं की घरामध्ये विविध प्रकारचे किटक, प्राणी हे असतातच आणि यामधले बरेचसे प्राणी किंबहुना किटक त्रास देत नसले तर काही प्राणी किंवा किटक हे आपल्यासाठी घातक ठरतात, आपल्याला ते त्रासदायक ठरतात. यामधलाच एक प्राणी किंवा एक किटक म्हणजे पाल.
घरामध्ये जर पाल असेल तर ते अशुभ सुद्धा मानले जाते आणि जर मित्रांनो घरामध्ये पाल असेल तर ही जी पाल आहे ज्या ठिकाणी उजेड आहे त्या भिंतीवर थांबते, त्या ठिकाणची किटक खाते आणि ती जी विष्टा असते ती त्याच ठिकाणी करते आणि जर हे चुकून आपल्या अन्नामध्ये गेले, पोटामध्ये गेले तर आपल्याला पोटाचे भयंकर आजार होऊ शकतात. दिसायला सुद्धा हे अत्यंत भयंकर दिसतात.
त्यामुळे हे जे किटक आहेत किंवा ही जी पाल आहे ती घरामधून बाहेर काढणे आणि त्याला घरामध्ये पुन्हा येऊ न देणे हे अत्यंत महत्त्वाचे आहे. यासाठी अत्यंत प्रभावी उपाय आपण पाहणार आहोत. या उपायासाठी अत्यंत सोपे असे दोन घटक लागणार आहेत. यामधील पहिली गोष्ट आहे हॅन्ड सॅनिटायझर. हे सॅनिटायझर कुठल्याही कंपनीचे असले तरी चालेल.
हॅन्ड सॅनिटायझर मध्ये जेल असेल तर अतिउत्तम, जेलचा प्रभाव आहे तो जास्त वेळ टिकतो. जेल नसेल तर साधं सॅनिटायझर असेल तर तेसुद्धा चालते. या सॅनिटायझरला एक उग्र वास असतो आणि त्या वासाचा परिणाम हा या पालीवर किंवा घरातले कोळे म्हणजे स्पायडर आहेत ते घालवण्यासाठी होतो आणि दुसरी जी गोष्ट लागणार आहे ती म्हणजे कापूस.
या कापसाच्या गाठी बनवून घ्यायच्या आहेत. कारण या गाठी यामुळे बनवून घ्यायच्या आहेत या गाठीसारखे किंवा मण्यासारखा भाग दिसतो त्याला ही पाल घाबरते. शिवाय यामध्ये सॅनिटायझरचा वास आहे तो महिनाभर राहतो. म्हणून आपल्याला हे या पध्दतीने बनवून घ्यायचे आहे.
याप्रमाणे कापसाची बनवलेली माळ आहे ती सॅनिटायझरने पुर्ण ओली करायची आहे आणि ज्या ठिकाणी पाल येते त्या ठिकाणी हे लावा. याचा दुहेरी परिणाम असा होतो की याच्या वासामुळे आणि ही जी माळ आहे ही वाऱ्याने वगैरे हालली की त्याला पाल प्रचंड घाबरते आणि त्या ठिकाणी परत येत नाही. शिवाय वाऱ्याच्या झोतामुळे हालल्यामुळे वास येतो, हा वास पालीला सहन होत नाही. आता प्रत्येकाच्या घरामध्ये सॅनिटायझर आहेच आणि कापूसही असतोच. तर हा उपाय अवश्य करून पाहा.
माहिती कशी वाटली आम्हाला कमेंट करून नक्की कळवा आणि अशी उपयोगी माहिती आपल्या प्रियजणांसोबत नक्की शेयर करा. अशाच अनेक माहितीपुर्ण लेखांसाठी आताच आमचे फेसबुक पेज नक्की लाइक करा.