मरेपर्यंत गुढगे दुखणार नाहीत; फक्त 7 दिवस “हा” उपाय करा…

हे कापड गुडघ्याभोवती घट्ट लपेटून बांधा आणि तीन दिवसांत गुडघेदुखी पासून सुटका मिळवा. हा गुडघेदुखी वरचा साधा आणि सोपा घरगुती उपाय आहे. चाळीशी ओलांडलेला जवळजवळ प्रत्येक जण या गुडघेदुखीने हैराण आहे. पूर्वीची हेल्दी, जीवनशैलीची जागा फास्ट फूड आणि धावपळीच्या जीवनाने घेतल्याने आपल्या स्वास्थ्याकडे दुर्लक्ष झाले आहे.

शिवाय आपल्या शरीराचे वेगवेगळे संकेत वेळीच न ओळखल्याने फार कमी वयातच गुडघेदुखी, मणकेदुखी यांसारख्या अनेक व्याधी माणसाला जखडून टाकतात. गुडघेदुखी आणि सांधेदुखीची समस्या इतकी गंभीर होऊन जाते की अनेक वेळा डॉक्टर ऑपरेशन करायचे ठरवतात. मात्र ऑपरेशन नंतरही समस्या समाप्त होते असे नाही.

आयुर्वेदात असे अनेक उपचार आहेत ज्यामुळे गुडघेदुखी, सांधेदुखीची समस्या कायमची बरी होते. फक्त विश्वास ठेवून वेगवेगळे उपाय करावे लागतात. कारण प्रत्येक व्यक्तीचे शरीर वेगवेगळ्या प्रकृतीचे असल्याने इतरांनी केलेला उपाय तुम्हालाही लागू होईल असे नाही. म्हणून आजचा उपायही अनेकांनी करून पाहिलेला आहे, त्यांना गुणकारी ठरलेला आहे. तुम्ही देखील तो सहजपणे अगदी कमी खर्चात करू शकता.

मित्रांनो सांधेदुखीचे प्रमुख कारण म्हणजे शरीरातील कॅल्शियमची कमतरता. ही कॅल्शियमची कमतरता भरून काढण्यासाठी गव्हाच्या आकाराचा एवढा चुना अर्धा ग्लास उसाच्या रसात किंवा ताकामध्ये मिसळून आठवड्यातून दोन ते तीन वेळा पिल्याने शरीराची आवश्यक प्रमाणात कॅल्शियमची पूर्तता होते. यानंतर आपण गुडघेदुखीच्या वेदना कमी करण्यासाठी बाहेरून करायचा उपाय बनवण्यासाठी आपण घेणार आहे अर्धा चमचा जायफळ पावडर. यानंतर दुसरा घटक घेणार आहोत अर्धा चमचा सुंठ पावडर.

या दोन्ही वस्तु आपल्या घरात मसाल्याच्या रुपात वापरल्या जातात. म्हणजे त्या अगदी सहजपणे उपलब्ध होतात. यानंतर आपण घ्यायचे आहे तिळाचे तेल. तुमच्याकडे तिळाचे तेल उपलब्ध नसल्यास ऑलि ऑइल देखील वापरू शकता. तिळाचे तेल दुखणाऱ्या गुडघ्यांवर मॉलिश करण्यासाठी वापरतात. आपण यासाठी तीन ते चार चमचे तिळाचे तेल एका वाटीत घ्यायचे आहे. हे तेल यामध्ये ऍड करण्याआधी थोडे कोमट करून घ्यायचे आहे.

आता हे तिनही घटक व्यवस्थित मिक्स करायचे आहेत. आता आपल्याला एक सुती कापडाची पट्टी घ्यायची आहे. ही या मिश्रणामध्ये चांगल्या प्रकारे बुडवून या तेलाने ती चांगली भिजवून घ्यायची आहे. ही कापडी पट्टी गुडघ्याभोवती लपेटून घ्यायची आहे. यानंतर एखादा प्लास्टिक पेपर त्यावर बांधावा. हा उपाय रात्री झोपण्यापूर्वी करायचा आहे. रात्रभर हे असेच बांधून राहू द्यावे. सलग तीन दिवस हा उपाय केल्याने चौथ्या दिवशीच तुम्हाला फरक अनुभवायला मिळेल. आणखी काही दिवस हा उपाय केला तर तुमची गुडघेदुखी पुर्णपणे थांबेल.

माहिती कशी वाटली आम्हाला कमेंट करून नक्की कळवा आणि अशी उपयोगी माहिती आपल्या प्रियजणांसोबत नक्की शेयर करा. अशाच अनेक माहितीपुर्ण लेखांसाठी आताच आमचे फेसबुक पेज नक्की लाइक करा.

Leave a Reply

Your email address will not be published.