पैसे ठेवण्यासाठी तिजोरी घेऊन ठेवा… उद्याच्या शनिवार पासून या राशी करोडोमध्ये खेळणार…

शनिवारी राशीतून भ्रमण करणारा चंद्र मानसिक ताण कमी करण्यासाठी मदत करेल. गेले काही दिवस  होणारी  मानसिक आंदोलने  आता कमी होत जातील. घरात शांतता  राहील. आज भाग्य तुमची साथ देणार आहे.

वृषभ

चंद्र बारावा, राशीत राहू, मानसिक ताण वाढवेल. आर्थिक स्थिती बरी राहील. प्रवास टाळा. आरोग्य थोडे जपावे लागेल. कोणाशी वाद करू नका. दिवस  मध्यम आहे.

मिथुन

दिवस  शुभ असुन आर्थिक लाभ संभवतात. प्रगतीच्या नवीन वाटा मोकळ्या होतील. सर्दी चा त्रास होणार्‍या व्यक्तीनी जरा काळजी घ्या.काहींना छोटा प्रवास घडेल.

कर्क

तुमच्या धनस्थानात मंगळ  आणि दशम स्थानात चंद्र  आहेत. लक्ष्मीकारक, कामाच्या ठिकाणी शुभ असा हा योग आहे. पण आठवा गुरू थोडे जपून रहा  असे सांगतोय. दिवस शुभ आहे.

सिंह

भाग्याची साथ  मिळेल . दोन दिवस ताण सोसला .आता शुभ घटना, पुजा, धार्मिक कार्य, इत्यादी मध्ये वेळ आनंदात जाईल. शत्रू नाश, जोडीदाराची चांगली प्रगती  असा उत्तम दिवस आहे.

कन्या

आधीच तयारी करून ठेवली तर येणार्‍या  तणावपूर्ण दिवसाला सामोरे जाता येईल. काही निर्णय पुढे ढकला. प्रकृती सांभाळा. आर्थिक बाजु चांगली राहील. पण काही अनाहूत खर्च येतील. दिवस  मध्यम जाईल.

वृश्चिक

तुमची प्रकृती तुम्हाला व्यग्र ठेवेल. विशेष करून पोटाचे  विकार त्रास देतील. संभ्रमात पाडणारी ग्रहस्थिती आहे. कोणाशी बोलाचाली करू नका. त्याने  आणखी त्रास होईल. आर्थिक व्यवहार आज टाळा. दिवस  मध्यम.

मीन

आर्थिक स्थिती भक्कम राहील. कुंभ राशीतील  गुरू  शुभ घटनांची सुरवात करणार आहे. थोडा धीर धरा. कुटुंबाचे उत्तम सहकार्य लाभेल. प्रकृती उत्तम राहील. दिवस शुभ.

Leave a Reply

Your email address will not be published.