सुप्रसिद्ध मराठी अभिनेत्री निवेदिता सराफ यांचा अनुभव ! श्री स्वामी समर्थ महाराज प्रचिती..बघा निवेदिता सराफ यांनी काय सांगितले..

निवेदिता सराफ या स्वामी भक्त आहेत. त्यांनी त्यांचा अनुभव किंवा स्वामींबद्दल असणारी भावना त्यांनी व्यक्त केली आहे. ते स्वामींबद्दल काय बोलले ते पाहुया. नमस्कार मी निवेदिता सराफ. मी खरंच मनापासून स्वामींची सेवा करते. मी स्वामींची सेवा करू लागली कारण माझ्या मिस्टरांचे म्हणजे अशोक सराफांची आई या स्वामींची भक्ती करायच्या. अशोक सुद्धा स्वामींचे चरित्र वाचायचे आणि त्यामुळेच मी सुद्धा स्वामींचे चरित्र वाचू लागले.

त्यांचे चरित्र वाचून मी खुपच भारावून गेले की जसे संत गाडगेबाबा आहेत तसेच अक्कलकोटचे स्वामी आहेत. त्यांनी कधी चमत्कारावरती विश्वास नाही ठेवला. त्यांनी कधी असं म्हटलं नाही की देव मला म्हणा, माझी पुजा करा. मलाही असं वाटतं की स्वामींकडून मला खुप काही मिळालं. आईवडील फक्त या जन्मापर्यंत असतात पण तुमचे गुरू हे जन्मांजन्मोतरीचे असतात. त्यांना फक्त तुमचा हा जन्म नाही तर पाठचा जन्म, पुढचा जन्म सगळं दिसत असते.

स्वामी हे गुरू, गुरूचा अर्थ काय जो अंधकार दूर करतो तो गुरू. तर स्वामींनी मला काय दिले तर अज्ञानाचा अंधकार स्वामींच्या नजरेने माझ्याकडून दूर झाला. माझ्या आजूबाजूच्या अज्ञानाचा अंधकार दूर झाल्यामुळे ज्ञानाचा दिवा स्वामींच्या मुळे आयुष्यात आला. ते ज्ञान म्हणजे काय? तर तुम्ही आयुष्यात का आलाय? तुमचे इथलं प्रयोजन काय? पहिली गोष्ट म्हणजे यश या शब्दाची व्याख्या काय? यश म्हणजे खुप पैसा, प्रसिद्धी मानसन्मान म्हणजे यश का? तर नाही. मला असं वाटत नाही. स्वामींच्या दृष्टिकोणातून ही यशाची व्याख्या आहे.

यश म्हणजे तुम्हाला आलेल्या संबंधात किती चांगल्या रीतीने उतरता, म्हणजे आई बहीण म्हणून, म्हणजे मी एक स्त्री आहे म्हणून. जो व्यवसाय मी स्वीकारलाय तो किती सचोटीने मी करतेय. मी किती प्रामाणिकपणे तो व्यवसाय करते. कोणावर मी अन्याय करत नाही ना, हे मला दर्शवून देणे माझ्या मते यश आहे. आज जर ते उत्तम रीतीने करत असेल तर आपण जे व्यावसायिक यश त्याच्याशी अजिबात स्वामींचा संबंध नाही.

दुसरी गोष्ट मला असं वाटतं अंधकारापासून प्रकाशाकडे जाण्याचा मार्ग स्वामी तुम्हाला दाखवतात. शेवटी निर्णय तुम्हाला स्वतः घ्यायचे असतात. स्वामी तुम्हाला स्वावलंबी बनवतात. तुमचे निर्णय तुम्हाला घ्यायला शिकवतात. तुम्ही प्रयत्न करायला हवेत कदाचित तुम्हाला ठेच लागेल. पण स्वामी तुमच्या सोबत असतील किंवा तुमच्याकडून चूक झाली तर थप्पड लावायला सुद्धा स्वामी असतील. कारण स्वामी हे खऱ्या आईसारखे आहेत ते फक्त लाड नाही तर बऱ्याचवेळी थप्पड सुद्धा देतात.

पण आपण कित्येक वेळा असं बोलतो की मला हे हवंय, ते हवंय आपल्याला हवं खुप असते पण तुमची ती लायकी आहे का, तुमची तेवढी प्रगती झाली आहे का? आपण आज नववीतला मुलगा बारावीची परीक्षा नाही देऊ शकत. त्याला आधी नववीची परीक्षा पास करायला लागते. मग दहावी, अकरावी परीक्षा पास करायला लागते. मग बारावीची परीक्षा पास करायला लागते. तर तुम्हाला ते मिळवण्याची लायकी आहे का हे पहिल्यांदा आपण शोधले पाहिजे. मला हे हवंय ते कदाचित तुम्हाला ते मिळालं नसेल तर ते तुम्हाला भेटण्याची वेळ नाही आहे.

तुम्हाला अजून खुप काही शिकायचे आहे आणि मग तुम्ही तिथपर्यंत पोहचाल. त्याला ते मिळालं मला का नाही? प्रत्येकाचा मार्ग, प्रत्येकाचा प्रवास हा वेगळा आहे. दुसऱ्याच्या आयुष्यात सुखी आहे की दुःखी आहे हे आपण काठावर उभे राहून कधीच सांगू शकत नाही. कारण त्याच्या आयुष्यात जे काही सुख आहे की जे काही दुःख आहे ते त्याचं त्यालाच माहिती आहे. आपल्याला फक्त वरून वरून दिसत असते. त्याने किती पापं केली, तो किती सुखी आहे पण त्याचबरोबर त्याच्या अंतर्मनात काय चाललंय हे आपल्याला कुठं माहीत असतं.

म्हणून कधी कुणाशी तुलना करू नका. आपण नेहमी स्वतःचे स्वतःशी कंम्पारिसन करावे आणि हेच स्वामी सांगतात. काल मी इथे होतो, आज मी पुढे आली आहे. का आणि कशी आली? आणि पुढे आली म्हणजे अध्यात्माच्या वाटेवर. आपण इंग्लिशमध्ये म्हणतो की मी एक सिकर आहे. आपण एक सिकर आहोत म्हणजे मी एवढंच म्हणेन की मला मार्ग सापडला. मी आता फक्त मार्गावर आहे मला आता कळतंय की इथून पुढे कसं जायचं, कुठल्या मार्गाने जायचय, मला काय करायचं आहे? मी कधीही असं आयुष्यात म्हणणार नाही की मला स्वामींमुळे मिळाले.

माझं आख्ख आयुष्य स्वामींमुळे आहे. आज मी जी कोणी आहे ती स्वामींमुळे. स्वामींची कृपा आणि आपल्या आईवडिलांचे आशीर्वाद. आपल्या आईवडिलांकडून खुप काही शिकायला मिळत असते. आईवडिलांचे, वाडवडीलांचे आशीर्वाद आणि गुरुकृपा या दोन गोष्टी आपल्याला आयुष्यात तारून नेतात. तर अशा प्रकारे निवेदिता सराफ यांनी स्वामींबद्दल असलेल्या आपली श्रद्धा व्यक्त केली. श्री स्वामी समर्थ ।।

Leave a Reply

Your email address will not be published.