ही वनस्पती कुठे सापडली तर पटकन खावे दोन पाने ; जुलाब, पोटदुखी, मुतखडा, पित्त आणि इतर समस्यांपासून मिळेल झटक्यात आराम…

अन्न, वस्त्र आणि निवारा या मानवाच्या मूलभूत गरजा आहेत. पूर्वीच्या काळात अन्न हे अत्यंत शुद्ध असायचं म्हणजेच कोणत्याही फळावर अथवा भाजीवर रासायनिक प्रक्रिया वगैरे केलेली नसायची. आता मात्र परिस्थिती बदललेली आहे आणि जीवनमान देखील पूर्णतः बदललेले दिसून येते. आजकाल वेगवेगळ्या प्रकारच्या रोगराया आणि आजार वाढलेले आपल्या आसपास दिसून येते.

पित्त म्हणजेच ऍसिडिटी ही समस्या अगदी सामान्यतः आढळून येते. आपल्यातील अनेकांना पित्ताचा त्रास देखील असल्याचे जाणवत असेल किंवा एखाद्या दिवशी झोप झाली नसेल किंवा खाण्याच्या बाबतीत चुका झाल्या की पित्ताची समस्या उद्भवल्याचे आपल्याला जाणवले असेल.

फक्त पित्तच नाही तर पोटात वारंवार गॅस होणे, सकाळी उठल्यानंतर पोट नीट साफ न होणे, लघवीची समस्या तसेच सेक्ससंबंधी तक्रारी सध्या समोर येत आहेत. या सर्व समस्यांवर एक औषधी वनस्पती आहे जी जालीम उपाय म्हणून आपण उपचार करण्यासाठी वापरू शकतो. ही वनस्पती आपल्याला आपल्या घराशेजारी सहज मिळू शकते.

रस्त्याच्या कडेला सापडली जाणारी कुरडू ही वनस्पती अनेक आजारांवर एक खात्रीशीर उपाय म्हणून ओळखली जाते. या वनस्पतीला पांढरी आणि गुलाबी फुले असतात. या वनस्पतीची फुले, बिया, पाने आणि मुळं ही अत्यंत चमत्कारिक फायदे देणारी आहेत. ज्या व्यक्तीला पोट दुखण्याचा त्रास होतो किंवा सकाळी उठल्यानंतर पोट साफ होण्यास अडचण येते अशा व्यक्तीने या वनस्पतीची सकाळी उठल्यानंतर चार ते पाच पाने खावीत किंवा रात्री झोपताना देखील ही पाने खावीत. दुसऱ्या दिवसापासूनच पोटाच्या समस्येवर आपल्याला फरक पडेल.

ही वास्पती जास्त खाल्ली तर जास्त बाथरूमला जावे लागेल त्यामुळे चार ते पाचच पाने खावीत. जर आपल्याला पोट डंबरल्यासारखे होण्याची समस्या वारंवार उध्दभवत असेल तर कुरडूची मुळं खावीत जेणेकरून या समस्येपासून मुक्ती होईल.

या वनस्पतीला छोट्या छोट्या बिया असतात. जर एखाद्याला मुतखड्याचा आजार असेल तर त्याने या वनस्पतीची मुळं आणि गोकरूच्या बिया एकत्र करून त्याला बारीक करून सकाळी कोमट पाण्यात घेतल्यास किडनी पूर्णतः साफ होईल आणि मुतखड्याचा आजार बरा होईल.

माहिती कशी वाटली आम्हाला कमेंट करून नक्की कळवा आणि अशी उपयोगी माहिती आपल्या प्रियजणांसोबत नक्की शेयर करा. अशाच अनेक माहितीपुर्ण लेखांसाठी आताच आमचे फेसबुक पेज नक्की लाइक करा.

Leave a Reply

Your email address will not be published.