मॅगीचे ‘हे’ पाच साईड इफेक्ट्स वाचल्यानंतर आपण मॅगी खाणं सोडून द्याल…

होस्टेलवर राहणारे विद्यार्थी, घरापासून दूर असणारे अनेकजण किंवा इतरही लोक नाश्ता किंवा भूक लागल्यास मॅगी खात असतात. ट्रेकिंग किंवा फिरायला गेल्यावर देखील अनेकजण भूक लागल्यानंतर मॅगी बनवून खातात. मॅगी २ ते ३ मिनिटांमध्ये तयार होते आणि बनवायला देखील सोपी असते. त्यामुळे अनेक जण आपला आवडता पदार्थ म्हणून मॅगीला पसंद करतात.

मात्र आपल्याला आवडणारी ही मॅगी आपल्या आरोग्यासाठी घातक आहे. मॅगीमध्ये मैदा असतो. गव्हाच्या किंवा ज्वारीच्या पिठाच्या बरोबरीला जर मैदा घेतला तर मैदा आपल्याला पचण्यासाठी जास्त वेळ घेतो. मैदा खाल्यानंतर आपल्या शरीरात अधिककाळ राहत असतो जे अत्यंत हानिकारक आहे.

मॅगीमध्ये सोडियम म्हणजेच मिठाचे प्रमाण जास्त असते. एका मॅगीच्या पाकिटामध्ये ८५०मिलीग्रॅम पेक्षा अधिक सोडियम आढळते. ज्यांना बीपीची समस्या असते त्यांच्यासाठी मॅगी खाणे अत्यंत घातक आहे.

मॅगीमध्ये आढळणारे ट्रान्सफॅट्स हे आपल्या शरीरासाठी चांगले नाहीत. कारण ट्रान्सफॅट्स आपल्या शरीरातील चांगल्या कोलेस्ट्रॉलला कमी करते आणि जे शरीरासाठी चांगले नसते अशा कोलेस्ट्रॉलची मात्रा वाढवते. त्यामुळे मॅगी खाणे शरीरासाठी तोट्याचे ठरू शकते.

मॅगी खाल्यामुळे आपल्याला वजनवाढीची समस्या देखील जाणवू शकते. मॅगीमध्ये कार्बोहायड्रेट्स म्हणजेच कार्बोदके जास्त प्रमाणात आढळतात. कार्बोदके जास्त प्रमाणात खाल्यास त्याचे रूपांतर फॅट्समध्ये होते. मॅगीमध्ये १०० ग्रॅमला १५ग्रॅमपेक्षा जास्त प्रमाणात फॅट्स आढळून येतात. ज्यामुळे आपल्याला वजनवाढीचा धोका निर्माण होऊ शकतो.

मॅगीमधून आपल्याला व्हिटॅमिन्स, फायबर, प्रथिने, प्रोटिन्स मिळत नाही. मॅगी खाल्यानंतर आपल्याला फक्त ऊर्जा मिळते. आपण जर जेवणाच्या ऐवजी जर मॅगी खात असू तर हे अत्यंत चुकीचे आहे. मॅगीमध्ये MSG आढळून येते असं म्हणतात ज्यामुळे चायनीज पदार्थांना स्वाद येतो. MSG हे शरीरासाठी अत्यंत घाट असते.

मॅगी दिवसातून आपण एक वेळा खाली तर तिचे साईड इफेक्ट्स होणार नाहीत. मात्र जर दिवसातून दोन किंवा तीन पाकीट आपण मॅगी खाल्ली तर आपल्याला आपल्याला मॅगीपासून होणाऱ्या साईड इफेक्ट्सना सामोरे जावे लागेल.

माहिती कशी वाटली आम्हाला कमेंट करून नक्की कळवा आणि अशी उपयोगी माहिती आपल्या प्रियजणांसोबत नक्की शेयर करा. अशाच अनेक माहितीपुर्ण लेखांसाठी आताच आमचे फेसबुक पेज नक्की लाइक करा.

Leave a Reply

Your email address will not be published.