तुळशीच्या पानांचे ‘असे’ आहेत फायदे ; ना स्टॅमिना कमी होणार ना तारुण्य…

तुळशीच्या झाडाचे अनेक फायदे आयुर्वेदात सांगितले गेले आहेत. तुळशीची पाने अनेक आजारांवर फायदेशीर असतात हे आपल्यातील अनेकांना माहित आहे. मात्र काहीजण तुळशीचे पाने तोडतात आणि लगेचच खातात. असे करणे अत्यंत चुकीचे आहे. कारण तुळशीच्या पानांवर एक विशिष्ट प्रकारचा विषारी गुणधर्म आढळतो ज्यामुळे तुळशीची पाने किटाणूंपासून सुरक्षित राहतात. त्यामुळे तुळशीची पाने खाताना योग्यपद्धतीने खाल्ली पाहिजेत जेणेकरून आपल्या शरीराला फायदा होईल.

तुळशीच्या पानांचा केसांच्या पोषणासाठी चांगला फायदा होतो. ज्यांना टकलेपणाची म्हणजेच केसगळतीची समस्या, कोंडा, पातळ केस अश्यांसाठी तुळशीची पाने अत्यंत फायदेशीर आहेत. १० ते १२ तुळशीची पाने आपण पाट्यावर वाटून घेतली आणि त्यात रीठाची पावडर, शिका पावडर आणि आवळ्याची पावडर लावून जर आपले केस धुतले तर आपल्याला आश्चर्यकारक फायदे यामधून मिळतील.

तुळशीच्या पानांमध्ये अँटीबॅक्टेरिअल गुणधर्म असतो ज्यामुळे केसांची वाढ होत नसल्यास थेट मुळांवर होतो आणि आपल्याला केसवाढीला याची मदत होते. हा उपाय केल्यास आपल्याला कोणत्याही प्रकारचा शेंपू अथवा कंडिशनर लावायची आयुष्यभर गरज पडणार नाही.

नवविवाहित तरुणांमध्ये जर शुक्राणूंची कमी असेल तेव्हा देखील तुळशीची पाने अत्यंत फायदेशीर ठरतात. यासाठी तुळशीची दोन ते तीन पाने कुटून घ्यावीत, त्यामध्ये एक ग्रॅम कोंचंच्या बीजांची पावडर टाकावी, यासोबतच एक ग्रॅम शतावरी, अश्वगंधा आणि थोडं शिलाजीत त्यामध्ये टाकावं. हे सर्व मिश्रण हलक्या गरम पाण्यात घेतल्यास याचा शुक्राणूंच्या वाढीसाठी चांगलाच फायदा होतो.

तुळशीच्या पानांमध्ये असे काही गुणधर्म आढळतात ज्यामुळे आपले शरीर वृद्धपाकाळात देखील मजबूत राहू शकते. सकाळी उठल्यानंतर हटयोग किंवा प्राणायाम केल्यानंतर जर आपण दही आणि तुळशीची पाने एकत्र करून घेतल्यास आपले शरीर मजबूत बनते. तसेच आपले वय हे कमी दिसते आणि चेहरा अत्यंत तेजोमयी होतो.

आपल्याला जर पोटाच्या समस्येबाबत त्रास असेल तर आपण दही आणि तुळशीच्या पानाचे सेवन केलेचे पाहिजे. या दोन्हींमधील गुणधर्मांमुळे आपल्या शरीरातील रक्ताचे शुद्धीकरण चांगल्या प्रकारे होते आणि आपल्या चेहऱ्यावर देखील फोड, मुरूम इत्यादि राहत नाही. दही आणि तुळशीच्या पानाचे सेवन करताना तुळशीची पाने चटणीसारखी बारीक करून घ्यावीत.

माहिती कशी वाटली आम्हाला कमेंट करून नक्की कळवा आणि अशी उपयोगी माहिती आपल्या प्रियजणांसोबत नक्की शेयर करा. अशाच अनेक माहितीपुर्ण लेखांसाठी आताच आमचे फेसबुक पेज नक्की लाइक करा.

Leave a Reply

Your email address will not be published.