तिरुपती बालाजीच्या मूर्तीचे हे 10 रहस्य..आजपर्यंत शास्त्रज्ञांना सुद्धा समजले नाही..ही मूर्ती मानवाने बनवलीच नाही..तर एक जिवंत..

भगवान तिरुपती बालाजीचे मंदिर हे भारतातील सर्वात श्रीमंत आणि चामत्कारिक मंदिरांपैकी एक आहे. तिरुमला डोंगरावर वसलेल्या भगवान तिरुपती बालाजींच्या मंदिराला दरवर्षी लाखो लोक भेट देतात. असे मानले जाते की जे भक्त देवासमोर प्रामाणिक अंतःकरणाने प्रार्थना करतात, भगवान तिरुपती बालाजी त्यांच्या सर्व इच्छा पूर्ण करतात.

जेव्हा भाविकांच्या इच्छा पूर्ण होतात तेव्हा भाविक श्रद्धेने आपले केस मंदिरात येऊन दान करतात. तिरुपती मंदिर हे अत्यंत चमत्कारिक आहे आणि मंदिराच्या अनेक रहस्यांबद्दल लोकांना कमी प्रमाणात माहित आहे.

१. असे म्हटले जाते की मंदिरातील भगवान वेंकटेश्वर स्वामींच्या मूर्तीवरील केस खरे आहेत. हे केस नेहमी मऊ राहतात आणि त्यांचा कधीही गुंता होत नाही. असे म्हणतात की स्वयंम देव येथे वास्तव्य करतात.

२. येथे येणारे अनेक भाविक सांगतात की भगवान वेंकटेश्वरांच्या मूर्तीला कान लावल्यास समुद्राच्या लाटांचा आवाज ऐकू येतो. यामुळेच मंदिरातील मूर्ती नेहमी ओलसर असते असे म्हटले जाते.

३. मंदिराच्या मुख्य प्रवेशद्वाराला दरवाजाच्या उजवीकडे काठी आहे.. या काठीबद्दल असे म्हटले जाते की लहानपणी या काठीनेच बाल्यावस्थेतील भगवान बालाजींना मारहाण करण्यात आली होती. ज्यामुळे त्यांच्या हनुवटीला दुखापत झाली होती. या कारणास्तव, आजपर्यंत दार शुक्रवारी त्यांच्या हनुवटीवर चंदनाची पेस्ट लावली जाते, जेणेकरून जखम बरी होईल.

४. भगवान बालाजीच्या मंदिरात नेहमी दिवा लावला जातो. या दिव्यामध्ये कधीही तेल किंवा तूप ओतले जात नाही. मात्र तरीदेखील वर्षानुवर्षे हा दिवा तेवत असतो.

५. ही मूर्ती एका खास प्रकारच्या गुळगुळीत दगडाने बनलेली आहे. परमेश्वराला आराम करण्यासाठी मंदिरात संपूर्ण वातावरण अगदी थंड ठेवले जाते. तरीपण असे असूनही, भगवान तिरुपती बालाजी यांना खूप गरम वाटते, ज्यामुळे त्यांच्या अंगावर घामाचे थेंब पहावयास मिळतात. मंदिराचे पुजारी वेळोवेळी परमेश्वराच्या शरीरावरचा घाम पुसत असतात.

६. भगवान बालाजीच्या मूर्तीवर एक विशेष प्रकारचा पचाई कपूर लावला जातो. वैज्ञानिक मतानुसार या कापूरला कोणत्याही मूर्तीवर लावल्यास मूर्तीला तडा जातो. मात्र भगवान बालाजीच्या मूर्तीवर त्याचा कोणताही असर होत नाही.

७. लक्ष्मी देवी भगवान बालाजींच्या हृदयावर निवास करतात. प्रत्येक गुरुवारी लक्ष्मी देवींची उपस्थिती कळते जेव्हा भगवान बालाजींचा सर्व मेकअप काढून त्यांना आंघोळ घातल्यानंतर चंदनाची पेस्ट लावली जाते. जेव्हा भगवान बालाजींच्या मूर्तीवरची चंदनाची पेस्ट काढली जाते तेव्हा भगवान बालाजींच्या हृदयावर
लक्ष्मीची प्रतिमा उदयास येते.

८. भगवान बालाजींच्या मूर्तीला दररोज धोती आणि वर साडीने सजवली जाते.असे मानले जाते की देवी लक्ष्मीचे रूप बालाजींमध्येच समाविष्ट आहे, म्हणूनच असे केले जाते.

९. भगवान बालाजीच्या मंदिरापासून २३ किमी अंतरावर एक गाव आहे आणि येथे बाहेरील लोकांच्या प्रवेशावर बंदी आहे. असे मानले जाते की भगवान बालाजींना अर्पण करण्यासाठी फळे, फुले, दूध, दही आणि तूप सर्व येथून येतात. या गावात स्त्रिया शिलाई केलेले कपडे घालत नाहीत.

१०. भगवान बालाजींची मूर्ती जरी एका विशिष्ट प्रकारच्या गुळगुळीत दगडाची बनलेली असली तरी ती पूर्णपणे जिवंत दिसते. मंदिर वातावरण खूप थंड ठेवले आहे. थंड वातावरण असूनही असे मानले जाते की बालाजींच्या मूर्तीला गरम होते आणि त्यामुळे मूर्तीवर घामाची थेंबे देखील असतात.

माहिती कशी वाटली आम्हाला कमेंट करून नक्की कळवा आणि अशी उपयोगी माहिती आपल्या प्रियजणांसोबत नक्की शेयर करा. अशाच अनेक माहितीपुर्ण लेखांसाठी आताच आमचे फेसबुक पेज नक्की लाइक करा.

Leave a Reply

Your email address will not be published.