असे शिवमंदिर जिथे पहाटे सकाळीच एक अदृश्य शक्ती येऊन भगवान ”महादेवाची” पूजा करत असते…

भगवान शिवशंकरांचा महिमा आपल्या सगळ्यांनाच माहित आहे. भगवान शिवशंकराची पुरातन मंदिरे जिथं जिथं आढळून येतात तिथं चमत्कार घडतातच असे म्हटले जाते. प्रत्येक शिवमंदिराची एक वेगळी ओळख असते. भारतातील देवी-देवतांची अनेक मंदिरे आहेत ज्यांच्या रहस्यमयी गोष्टींबद्दल कोणालाही माहित नाही. वैज्ञानिकांनाही अनेक रहस्यांबद्दल पूर्णतः माहिती मिळालेली नाही.

ईश्वरा महादेव मंदिर : हे एक असे शिवमंदिर आहे जिथे पहाटे सकाळीच एक अदृश्य शक्ती येऊन भगवान महादेवाची पूजा करत असते. सकाळी मंदिर उघडल्यानंतर त्यावर बेलपत्र चढवलेले असते. यासंदर्भात अनेकांना विचारले असता कोणालाही या भक्ताबद्दल माहिती नाही. मध्यप्रदेशातील पहाडगडमध्ये नाहीत आहे.

यासंदर्भात खरी माहिती मिळवण्यासाठी अनेकदा प्रयत्न केले गेले मात्र सकाळी येऊन पूजा करणाऱ्या अदृश्य शक्ती बद्दल काहीच माहिती मिळाली नाही. एकदा संत महात्मांनी या अदृश्य शक्तीबद्दल जाणून घेण्यासाठी मंदिरातच आपले बस्तान बसवले आणि दिवसरात्र मंदिरावर बारीक लक्ष दिले. मात्र त्यानंतरही भगवान महादेवाच्या पिंडीवर कोण बेलपत्र चढवून जाते आणि पूजा करते याबाबत माहिती मिळालेली नाही.

स्थानिक लोकांच्या म्हणण्यानुसार सोन्याची लंका असणाऱ्या रावणाच्या भावला म्हणजेच लंकेच्या दुसऱ्या राजाला (बिभीषणाला) सप्त चिरंजीवांपैकी एक संबोधले जाते. हे मंदिरही लंकानरेश बिभीषण यांनी बांधले आहे असे म्हटले जाते. तेच आजही या मंदिराची पूजा करण्यासाठी येतात आणि अदृश्य होतात असे इथल्या लोकांचे म्हणणे आहे.

पहाडगडच्या जंगलात वसलेल्या या मंदिराबद्दल लोकांना विशेष आकर्षण आहे. डोंगरातून येणाऱ्या पाण्यानेच या मंदिरातील महादेवाच्या पिंडीचा अभिषेक केला जातो.एवढंच नाही तर पावसाळ्यात या मंदिराच्या आसपासचा परिसर अत्यंत हिरवागार आणि थंड होतो. याठिकणी लोक पर्यटनस्थळ म्हणून देखील येत असतात.

स्तंभेश्वर महादेव मंदिर : गुजरातच्या वडोदरा भागात हे मंदिर स्थित आहे. हे मंदिर बघता बघता पाण्याखाली जाते असे म्हटले जाते. यामुळेच हे मंदिर जगभर प्रसिद्ध आहे. हे मंदिर भगवान शिवशंकराचे पुत्र कार्तिकेय यांनी बांधलेले आहे. या मंदिराचा पाण्याखाली जाण्याचा चमत्कार पाहायचा असेल तर आपल्याला २ दिवस याभागात राहणे गरजेचे आहे.

वीरभद्रेश्वर मंदिर : हे मंदिर एलओसी नियंत्रण रेषेच्या जवळ स्थित आहे. राजूरी जिल्ह्यापासून जवळच सर्वात मोठी पर्वत आहेत. या पर्वताला पीबी म्हणजेच पिरभद्रेश्वर असे म्हटले जाते. वास्तविक हे नाव वीरभद्रेश्वरावरून पडले आहे. याला व्हीबी असे देखील म्हटले जाते. भारत आणि पाकिस्तान या दोन्ही देशांसाठी हा भाग अत्यंत महत्वाचा आहे. या मंदिरावर घंटी बांधल्यानंतर जी काही इच्छा आपण मागू ती पूर्ण केली जाते असे म्हटले जाते. हे मंदिर अतिशय उंच ठिकाणी आहे आणि रस्त्याची कोणतीही सोय नसताना यासाठी अनेक घेण्यासाठी येत असतात.

Leave a Reply

Your email address will not be published.