देवाच्या समोर रडल्यामुळे काय होते, तुम्हाला ह्या चमत्काराविषयी माहिती नसेल…

नमस्कार मित्रांनो. तुमचे स्वागत आहे. मित्रांनो, काय पुजा करताना तुमच्या डोळ्यात पाणी येते का, जर येत असेल, तर हि माहिती शेवटपर्यंत वाचा. आम्ही तुम्हाला अशी काही रहस्ये सांगणार आहोत, ज्यामुळे तुम्हाला समजेल की त्या कोणत्या अज्ञात दैवी शक्ति आहेत, ज्यांची कृपा तुमच्यावर सदैव आहे.

मित्रांनो, आपल्या प्राचीन ग्रंथानुसार सुरूवातीला हे ब्रम्हांड एकदम रिकामे होते, सगळीकडे अंधकार होता. त्यानंतर, अचानक एक विशालकाय शिवलिंग प्रगट झाले, ज्यामुळे हे सगळे ब्रम्हांड उर्जेने भरून गेले. त्यानंतर काही कालावधिंनंतर, या ब्रम्हांडात पदार्थांची निर्मिती झाली. ज्यामध्ये पाणी, धातू, वायु, अग्नि यासारख्या कितीतरी गोष्टींची निर्मिती झाली. म्हणून अशी मान्यता आहे, की या सगळ्यामध्ये भगवान शिवशंकराचा निवास आहे.

सगळ्या ब्रम्हांडात असलेली मुबलक ऊर्जा शिवच आहे. शिवच आदि आहे व शिवच अंत आहे. जेव्हा तुम्ही पूजापाठ करायला बसता किंवा ईश्वराचे ध्यान करायला बसता, तेव्हा तुमच्या आत्मा ईश्वराशी जोडला जातो. ईश्वर सर्वव्यापी आहे. सगळ्या सजीव
किंवा निर्जीव वस्तूंमध्ये त्यांचा वास आहे. म्हणूनच, तुमच्या आत्म्याचा ईश्वराशी संबंध जोडला जातो, तेव्हा ईश्वर म्हणजेच देव तुम्हाला काही संकेत देतात. हे संकेत एकदम साधारण स्वरूपाचे असतात.

ज्याकडे आपण दुर्लक्ष करतो, व त्याचे संकेत समजून घेत नाही. सर्वव्यापी परमात्मा सगळ्या जीवजंतूनशी जोडला गेलेला आहे. जेव्हा पण आपण पुजा किंवा ध्यान करतो, तेव्हा आपल्या आजूबाजूचे वातावरण सकारात्मक उर्जेने भरून जाते, व त्यामुळे आपले मन प्रसन्न होते. दू:खाचे वातावरण पण आनंदाने भरून जाते. तुम्ही कितीही तणावात असाल, तरी तुम्हाला ताजेतवाने वाटायला लागते. कारण या सकारात्मक शक्तींचा प्रभावाच असा काही असतो.

कितीतरी वेळेला विद्यार्थी अभ्यासाला बसताना माता सरस्वतीचे स्मरण करतात तर त्यांच्या डोळ्यात पाणी येते, किंवा अचानक त्यांना झोप येऊ लागते. याचा अर्थ हा आहे, की माता सरस्वतीची कृपा त्या विद्यार्थ्यावर होते आहे. तसेच कधी आपण देवाशी निगडीत काही कथा ऐकत असतो, तेव्हा आपल्या शरीरावर रोमांच उभे रहातात,तसेच डोळ्यात पाणी येते.

ईश्वराच्या त्या अद्भुत शक्तीचा अनुभव करून कधीतरी डोळ्यात पाणी येते व देवावर आपला विश्वास दृढ होत जातो. मित्रांनो, तुम्हाला पण जर असे संकेत मिळत असतील, तर हि माहिती शेवटपर्यंत बघा. आम्ही तुम्हाला काही संकेत सांगणार आहोत. पहिला संकेत म्हणजे डोळ्यात पाणी येणे- जर तुम्ही ध्यान लावून देवाची प्रार्थना करत असाल, तर डोळ्यात पाणी आले, तर हा ईश्वराचा संकेत आहे. आपली मनोकामना देवाला सांगा.

दूसरा संकेत म्हणजे जळलेली ज्योत मोठी होणे – अग्नि पंचतत्वापैकी एक आहे. त्यात भगवान शिवशंकराचा वास आहे. पुजा करताना ज्योत मोठी झाली, तर ईश्वर तुमच्यावर प्रसन्न आहे असे समजावे. तिसरी गोष्ट म्हणजे उदबत्तीचा धूर देवाकडे जात असेल, तर अर्थ हा आहे की तुमची पुजा ईश्वराने कबुल केली आहे.

चौथी गोष्ट म्हणजे फूल पडणे- पुजा करताना जर फूल देवावर वाहिले असेल व ते पडले तर ते शुभ आहे. पाचवी गोष्ट दारावर गाय येणे –गायीला नमस्कार करून तिला खाऊ घाला. तुमची मनोकामना पूर्ण होईल.

माहिती आवडली असेल तर अवश्य शेयर करा. अशाच पोस्ट रोज मिळवण्यासाठी आमचे मराठी हे फेसबुक पेज लाईक करायला विसरू नका. वरील माहिती हि ज्योतिषशास्त्रावर आधारित असून कोणत्याही प्रकारची अंधश्रद्धा पसरवण्याचा आमचा हेतू नाही. अधिक माहितीसाठी ज्योतिषतज्ञांचा सल्ला आवश्यक.

Leave a Reply

Your email address will not be published.