श्रावण महिन्यात ब्रह्मकमळ या फुलाच्या दर्शनाने उजळेल आपले भाग्य आणि पूर्ण होतील आपल्या मनोकामना…

नमस्कार मित्रांनो आपले स्वागत आहे. आज आपण ब्रम्हकमळ फुलाचे महत्त्व, या फुलाची माहिती आणि औषधी गुणधर्म जाणून घेणार आहोत. ब्राम्हकमळ हे प्रवित्र फुल मानले जाते. ज्याच्या घरामध्ये हे फुल उमलते ती व्यक्ती भाग्यशाली मानली जाते व भगवान ब्रम्हाचा आशीर्वाद स्वरूप मानले जाते. ब्रम्हकमळ हे खुप आकर्षक व दिसायला फार सुंदर फुल असते. ब्रम्हकमळ हे वर्षातून एकदाच येते व रात्री नऊ वाजता उमलायला लागते व दोन तासात पूर्ण उमलते.

रात्री बारानंतर हे फुल मिटायला सुरुवात होते. ब्रम्हकमळ हे औषधी फुल आहे. त्यातून निघणाऱ्या पाण्याच्या सेवनाने खुप जुना खोकला बरा होतो. तसेच आपली प्रतिकारशक्ती देखील वाढते. हे फुल सुखवुन त्याच्यापासून कॅन्सरच्या रोगावर औषध बनवले जाते. असे म्हटले जाते हे फुल आपल्या दारावर टांगले तर घरातील वाईट शक्ती निघून जाते आणि वास्तुदोष देखील दूर होतो.

जेव्हा ब्रम्हकमळ फुलते तेव्हा त्याच्यामध्ये ब्रम्हदेव आणि त्रिशूळाची आकृती पाहायला मिळते. ज्याच्या घरामध्ये ब्रम्हकमळ फुलते ती व्यक्ती भाग्यशाली मानली जाते व त्याला सुख समृद्धी मिळते, असे म्हटले जाते. ब्रम्हकमळ हे फुल विकले जात नाही आणि खरेदी ही केले जात नाही. तर ते कुणी भेट म्हणून दिले तरच ते आपल्याला जास्त लाभते.

ब्रम्हकमळ हे फुल फक्त देवाच्या चरणात अर्पण केले जाते किंवा कोणाला भेट म्हणून दिले जाते. धार्मिक दृष्ट्या ब्रम्हकमळ हे फुल भगवान विष्णूच्या नाभीतून तयार झालेले फुल आहे. त्यावर ब्रम्हदेव हे विराजमान आहेत. असे म्हटले जाते की ब्रम्हकमळ माता नंदा यांचे प्रिय फुल आहे. म्हणून हे फुल नंदाअष्टमी या दिवशी तोडतात. हे फुल तोडण्याचे काही नियम पण आहेत. असे म्हणतात की देवी द्रौपदीने ब्रम्हकमळ या फुलासाठी हट्ट केला होता.

तेव्हा भगवान भीम यांनी हे फुल हिमालयातून आणले. ब्रम्हकमळ हे फुल जून ते सप्टेंबर या महिन्याच्या काळात येते. ब्रम्हकमळ झाडाचे एक पान कुंडीमध्ये लावले तर ते छान बहरते. रात्री ब्रम्हकमळ फुल उमगले की त्याची पुजा करुन हे फुल देवाऱ्यात ठेवून हळद कुंकू वाहून, धूप दीप लावून देवाला श्रद्धेने अर्पण करावे. त्यामुळे आपल्या सर्व मनोकामना पूर्ण होतात. ब्रम्हकमळ हे फुल खुप औषधी सुद्धा आहे. त्याच्यापासून आपल्याला फायदे सुद्धा होतात.

ताप आला असेल तर त्यावर गुणकारी देखील आहे. ब्रम्हकमळ फुलाचा अर्क काढून एक चमचा दिवसातून दोन वेळा घेतल्यास ताप दूर होतो. जर महिलांना युरिन इन्फेक्शन झाले असेल तर त्यासाठी या फुलाचा अर्क सेवन करावा. लिव्हर इन्फेक्शनसाठी फुलापासून सूप बनवून त्याचे सेवन करतात. भूक लागत नसेल तर या फुलाचे सेवन करावे. कारण त्यामध्ये पोषणतत्वे आहेत, त्यामुळे भूक लागते. तर ही होती ब्रम्हफुलाची माहिती आणि औषधी गुणधर्म. धन्यवाद

Leave a Reply

Your email address will not be published.