या वेळेत चुकूनही रक्षाबंधन साजरे करू नका…

रक्षाबंधन श्रावण महिन्यातील शुक्ल पक्षातील पौर्णिमेला साजरे करतात. यावर्षी रविवार, २२ ऑगस्ट २०२१ यादिवशी रक्षाबंधन साजरे केले जाईल. सगळ्या बहिणी अत्यंत आतुरतेने रक्षाबंधनाची वाट बघतात. कारण यादिवशी बहिणी भावाच्या मनगटावर राखी बांधतात व भाऊ बहिणीची रक्षा करण्याचे वचन देतात. भाऊ दुरदूरून येऊन बहिणीकडून राखी बांधून घेतात आणि आपल्या बहिणींना काहीतरी भेटवस्तू देतात.

राखी शुभमुहूर्तावर बांधली पाहिजे. असे केल्यास जीवनात त्याचे शुभ परिणाम दिसतील. भद्रा काळादरम्यान कधीही राखी बांधू नये. भद्रा काळात चुकुनही दोन कामे करू नयेत. एक म्हणजे श्रावणात राखी बांधणे व दुसरे म्हणजे फाल्गुन महिन्यात होलिका दहन करणे. तर यावर्षी २२ ऑगस्टला याप्रकारे भद्रा काळाची स्थिति बनत आहे. २१ ऑगस्टला संध्याकाळी ६ वाजून १२ मिनिटांनी भद्रा काळ सुरू होईल आणि २२ ऑगस्टला पहाटे ५ वाजून ३६ मिनिटांनी संपेल.

या काळादरम्यान रक्षाबंधन साजरे करू नये. या काळादरम्यान पंचक लागलेले असेल. पंचक लागलेले असताना रक्षाबंधन साजरे करण्यास कोणतीही मनाई नाही. कारण २२ तारखेला पूर्ण दिवस व त्यानंतर पाच दिवस पंचक चालेल. परंतु भद्रा काळाकडे विशेष लक्ष देण्याची गरज आहे. आणि भद्रा काळ २१ ऑगस्टला संध्याकाळी ६ वाजून १२ मिनिटांपासून २२ ऑगस्टला पहाटे ५ वाजून ३६ मिनिटांपर्यन्त असेल. या काळादरम्यान तुम्हाला काळजी घ्यायची आहे. या दरम्यान कोणत्याही परिस्थितीत रक्षाबंधन साजरे करू नये. २२ ऑगस्टला शुभमुहूर्तावर तुम्ही रक्षाबंधन साजरे करू शकता.


२२ तारखेला शुभमुहूर्तावर भावाला चौरंगावर बसवा. भावाच्या डोक्यावर रुमाल अथवा टोपी घाला. मग भावाच्या कपाळावर कुंकुमतीलक लावला पाहिजे. मग त्याच्या उजव्या हातात नारळ किंवा नारळाचा गोळा ठेऊन उजव्या हाताच्या मनगटावर राखी बांधली पाहिजे. राखी बांधताना मंत्र म्हणण्याचीही पद्धत आहे. जसे की तुम्ही ॐ जय श्रीकृष्ण हा मंत्र म्हणू शकता. यानंतर राखी बांधा आणि भावाला मिठाई खायला द्या. भावाला औक्षण करा.

तसेच भावाने त्याच्या आवडीने, ऐपतीप्रमाणे बहिणीला काहीतरी भेटवस्तू द्यावी. अशाप्रकार रक्षाबंधन साजरे केले पाहिजे. रविवार, २२ ऑगस्ट २०२१ यादिवशी रक्षाबंधनाचा जो पहिला शुभमुहूर्त सकाळी ९ वाजल्यापासून सुरू होईल व दुपारी १२ वाजेपर्यंत असेल. त्यानंतर दुसरा मुहूर्त दीड वाजता सुरू होऊन ३ वाजेपर्यंत असेल. त्यानंतर तिसरा मुहूर्त संध्याकाळी ६ वाजता सुरू होऊन रात्री साडेदहा वाजेपर्यंत असेल.

याआधी संध्याकाळी साडेचार वाजल्यापासून सहा वाजेपर्यंत राहुकाळ असेल. यावेळेत तुम्ही राखी बांधू नये. शुभमुहूर्तावर राखी बांधल्यास तुम्हाला नक्कीच शुभफल प्राप्त होतील. यादिवशी तुम्ही राशीअनुसारही राखी बांधू शकता. मेष राशीच्या लोकांना लाल रंगाची राखी बांधली पाहिजे. वृषभ राशीच्या लोकांना पांढऱ्या रंगाची राखी बांधू शकतात. मिथुन राशीच्या लोकांना हिरव्या रंगाची राखी बांधू शकतात.

कर्क राशीला पांढऱ्या तर सिंह राशीला लाल रंगाची, कन्या राशीच्या लोकांना हिरव्या रंगाची, तुला राशीच्या लोकांना लाल रंगाची राखी बांधावी. वृश्चिकेला लाल, धनुला पिवळी, मकर व कुंभ राशीला निळी किंवा काळी व मीन राशीच्या लोकांना पिवळ्या रंगाची राखी बांधू शकता. अशुभ काळात राखी बांधू नये. शुभमुहूर्तावर राखी बांधल्यास माता लक्ष्मीचा आशीर्वाद तुमच्यावर नेहमी राहील

Leave a Reply

Your email address will not be published.