शत्रुपीडे पासून मुक्तीसाठी देवघरात दिवा लावताना बोला हे ३ शब्द…

जीवन जगत असताना काही लोक आपले मित्र बनतात तर काही लोक आपले शत्रू बनतात. कधीकधी हे शत्रु बनलेले लोक इतके बलवत्तर बनतात की आपल्याला त्यांचा त्रास होऊ लागतो, यालाच आपण शत्रुपिडा म्हणतो. मित्रांनो जेव्हा जेव्हा तुम्ही चांगले काम करता, तुमची प्रगती होऊ लागते तेव्हा ही प्रगती लोकांच्या डोळ्यात खुपते आणि हेच लोक तुमचे शत्रु बनतात. कधी कधी तर तुमच्या अगदी जवळच्या असणारे मित्र सुद्धा तुमच्या प्रगतीमुळे तुमचे शत्रु बनू शकतात.

मित्रांनो ऑफिसमध्ये तुम्हाला तुमच्या सहकाऱ्यांकडून त्रास होत असेल, बॉसचा त्रास असेल, शेजाऱ्यांचा त्रास असेल किंवा तुमच्या उद्योगधंद्यात तुमचे जे स्पर्धक आहेत त्यांच्यापासून तुम्हाला त्रास होत असेल तर यालाच आपण शत्रुपिडा म्हणतो. मित्रांनो तुमचे हे बलवत्तर झालेले शत्रु आजच्या उपायाने निष्प्रभ होतील. त्यांचं बल निघून जाईल. हा उपाय शत्रूपीडेपासून मुक्ती मिळवून देणारा आहे आणि यासाठी आपल्याला विशेष अशी काहीच सामुग्री लागणार नाही. हे केवळ आपण रोजच्या देवपूजेमध्ये जो दिवा प्रज्वलित करतो हा दिवा प्रज्वलित करताना हा एक छोटासा मंत्र म्हणायचा आहे.

मित्रांनो या मंत्रातील शब्द इतके सामर्थ्यवान आहेत, ताकदवान आहेत की तुमचे शत्रू तुमच्यापुढे गुढघे नक्की टेकतील. देवपूजा करताना आपण दिवा नक्की प्रज्वलित करत असाल. दिवा लावण्याचे कारण म्हणजे दिव्यामुळे शुभ आणि मंगल गोष्टी घडू लागतता. देवीदेवता प्रसन्न होतात. खरंतर दिवा आपल्याला परमात्माशी जोडत असतो. म्हणूनच कोणतेही मंगल कार्य असुद्या त्या मंगलकार्यात दिवा हा लावला जातो. मित्रांनो सकाळ संध्याकाळ ज्या घरात दिवा लावला जातो त्या घरातील वातावरण पवित्र राहते. मात्र आपण हा जो उपाय करणार आहोत या उपायासाठी दिवा लावताना काही नियमांचे पालन अवश्य करा.

पहिला नियम, हा दिवा लावताना डोक्यावरती टोपी किंवा स्त्रियांनी पदर घेणे अत्यावश्यक आहे. जर टोपी नसेल तर तुम्ही रुमाल सुद्धा वापरू शकता. दुसरी गोष्ट, हा दिवा जमीनीवर ठेवायचा नाही. तर या दिव्याला आसन द्यायचं. दिवा हा प्रत्यक्ष देवता स्वरूप मानला जातो. एक देवताचे स्वरूप आहे आणि म्हणून अशा दिव्याखाली आसन ठेवायचे आहे. हे आसन मग कोणतीही फुले असो किंवा एखाद्या झाडाचे पान असो किंवा काही जर नसेल तर आपण धान्य, अक्षत, अक्षत म्हणजे न फुटलेले तुटलेले तांदुळ, मूठभर तांदुळ त्याठिकाणी ठेवावे आणि त्यावर हा दिवा ठेवावा.

मित्रांनो जे तेल या दिव्यामध्ये वापरायचे आहे ते तेल आहे मोहरीचे तेल. तर असे हे मोहरीचे तेल आपण त्या दिव्यामध्ये टाकायचे आहे. हा उपाय आपण शत्रूपिडेसाठी करतोय, शत्रु मुक्ती साठी करतोय. मोहरीचे तेल नसेल तर आपण चमेलीचे तेल म्हणजेच जाईचे तेल सुद्धा वापरू शकता. तर असा हा दिवा प्रज्वलित करायचा आहे. मित्रांनो या दिव्यातील जी वात आहे ती आपण कापसाची वात वापरणार आहोत आणि हा दिवा प्रज्वलित करताना दोन लवंगा टाकण्यास विसरू नका. अनेक ज्योतिष उपायामध्ये तंत्र मंत्र शास्त्रांमध्ये या लवंगांचे मोठे महत्त्व आहे.

दोन साबुत लवंगा घ्यायच्या आहेत, साबूत म्हणजे न तुटलेल्या फुटलेल्या अशा लवंगा घ्यायच्या आहेत. अशा दोन लवंगा टाकायच्या आहेत आणि याच दिव्यानेच आपण हनुमानाची आरती करायची आहे. लक्षात घ्या, तुम्ही देवापुढे तुमच्या देवघरात दिवा ठेवलेला आहे तो वेगळा असणार आहे आणि हा दिवा वेगळा असणार आहे. या दिव्याने आपण हनुमानांची आरती करायची आहे आणि त्यानंतर हनुमानांपुढे नतमस्तक होऊन आपल्या जीवनातून शत्रुपिडा नष्ट होऊदे, शत्रूच्या त्रासातून आपल्याला मुक्तता मिळू दे, अशी प्रार्थना करायची आहे. सोबतच या मंत्राचा जप करू शकता.

केवळ एक वेळ हा मंत्र म्हणायचा आहे. हा मंत्र आहे, “शुभम करोती कल्यानंम आरोग्यम धनसंपदा शत्रुबुद्धी विनाशाय दिपज्योति नमस्तुते”. आपल्यापैकी अनेकजण सायंकाळच्या वेळी हा मंत्र म्हणत असाल. आजपासून खासकरून या शत्रूपिडेपासून मुक्तीसाठी आपण या मंत्राचा जप सकाळ आणि सायंकाळी दोन्ही वेळा अवश्य करा. मित्रांनो दररोज हा उपाय करत चला. तुम्हाला दिसेल की तुमचे शत्रु तुमच्यापुढे नतमस्तक होत आहेत, तुमच्यापुढे गुडघे टेकतायेत आणि शत्रूपीडेपासून तुमचा बचाव होईल. धन्यवाद.

Leave a Reply

Your email address will not be published.