रात्री झोपताना प्या लाखो रुपये खर्च करून जे फायदे मिळणार नाहीत ते खजूर घातलेले दूध पिऊन मिळतील. मित्रांनो, आज मी तुम्हाला सांगणार आहे दुधात खजूर घालून प्यायल्यामुळे काय फायदे होतात व कशा प्रकारे तुम्हाला हे दूध घ्यायचे आहे.
काही दिवस तुम्ही जरूर प्या, तुम्हाला हाडांच्या वेदना असुदेत, बद्धकोष्टता असुदे किंवा शारीरिक कमकुवतपणा असेल जरूर दूर होईल. तर इथे मी घेतले आहेत खजूर. तुम्हाला हे खजूर कोणत्याही वाण्याच्या दुकानात सहज मिळतील. तुम्हाला ४ ते ५ खजूर घ्यायचे आहेत. खजूर घातलेले दूध पिऊन जर तुम्ही झोपलात, तर तुम्हाला हाडांच्या वेदनांपासून आराम मिळेल.
आपली स्मरणशक्ती उत्तम होते. हे दूध मुलांना दिले तर उत्तम. मी इथे खजूर घेतला आहे त्याच्या बिया सहज निघतात. बिया काढून टाका. मऊ असल्यामुळे लगेच बी निघते. सगळ्याच्या बिया काढून घ्या. याच्या बियांचा उपयोग तोंडावर फोड झाले असतील तर ती बी पाण्यात उगाळून लावली तर खूप फायदा होतो.
ओला खजूर किंवा सुखा घेऊ शकता. सुखा म्हणजे खारीक. चाकूने खजूर बारीक तुकड्यात कापून घ्या. दुधाबरोबर जेव्हा याचे सेवन करता तेव्हा त्याचा फायदा चौपट होतो. खजुरात मोठ्या प्रमाणात कॅल्शियम असते व दुधात पण कॅल्शियम असते. सुखा खजूर पण घेऊ शकता. मुलांना बिछाना ओला करायची सवय असते, पण दुधात खजूर घालून रात्री दिले तर लघवीच्या त्रासात पण फायदा होतो.
हे पिण्यामुळे रक्ताभिसरण वेगाने होते. रक्ताभिसरण चांगले असेल, तर त्वचेसंबंधी कोणतेच आजार आपल्याला होत नाहीत. दातांच्या वेदानांमध्ये चांगला आहे. सकाळी पण घेऊ शकता. हे दूध सेवन केल्यानंतर एक गोष्ट लक्षात ठेवायची आहे, ती म्हणजे १ ते १.१/२ तास त्यावर पाणी पिऊ नये. वजन कमी करायचे असेल तर लो फट दुधाचा उपयोग करा किंवा मलाई काढून ते दूध सेवन
करा.
मी पण इथे मलाई काढून घेतली आहे व १ ग्लास दूध आता गरम करायला ठेवले आहे. गॅस चालू केला आहे. आपल्याला दूध उकळायचे आहे व नंतर त्यात आपल्याला खजूर घालायचा आहे. तुम्ही कधीही हे खजूर घातलेले दूध पिऊ शकता. खजूर
प्रकृतीने गरम आहे. थंडीच्या दिवसात शरीरात गर्मी देईल ऊर्जा देईल. खजूर दुधात ७ ते ८ मिनिटे उकळायचे आहे त्यामुळे तो मऊ होतो. गरम गरम हे दूध प्या.
रात्री घेतले तर झोप खूप चांगली येईल. खजुरात विटामीन बी ६ असते जे आपल्या बुद्धीसाठी उत्तम आहे. विटामीन के, सोडियम, पोटॅशियम, फायबर असते, आर्यन असते त्यामुळे खजुराचे दूध जरूर प्यावे. मित्रांनो माहिती आवडली असेल तर नक्की लाईक करा आणि आपल्या मित्रांबरोबर शेयर करायला विसरू नका. तसेच आपली प्रतिक्रिया कमेंट करून नक्की कळवा.धन्यवाद…