९ मार्च ची ती भयानक रात्र ; २३९ प्रवासी हवेतच गायब झाले होते…

21 व्या शतकातही जग अद्वितीय आणि रहस्यमय कथांनी भरलेले आहे. हे संपूर्ण जग गूढतेने भरलेले आहे. आजही जगात अशी अनेक रहस्ये आहेत ज्यांचे गुपित आजपर्यंत उडघडलेलं नाही. या माहिती मध्ये, आज आम्ही तुम्हाला अशाच एका गुपित बद्दल सांगणार आहोत, ज्यावर विश्वास ठेवणे अशक्य आहे. या रहस्याने जगातील सर्वात मोठ्या शास्त्रज्ञांनाही भयभीत केले होते.

सुमारे 66 वर्षांपूर्वी, 1955 मध्ये, अशाच एका रहस्याने लोकांना आश्चर्यचकित केले होते. आज आम्ही तुम्हाला अमेरिकेच्या अशा रहस्यमय विमानाबद्दल सांगणार आहोत, जे उड्डाणानंतर सुमारे 30 वर्षांनी दुसऱ्या देशात उतरले आणि उतरल्यानंतर काही काळानंतर ते विमान पुन्हा गायब झाले.मीडियाच्या रिपोर्ट्सनुसार, 2 जुलै 1955 रोजी अमेरिकेच्या न्यूयॉर्क येथून फ्लाइट 914 ने मियामीसाठी उड्डाण केले होते.

या विमानात एकूण 57 प्रवासी आणि 6 क्रू मेंबर्स होते. पण न्यूयॉर्कहून मियामीला पोहोचण्याऐवजी ते आकाशातून नाहीसे झाले. अमेरिकेने त्या वेळी ते शोधण्याचे अनेक प्रयत्न केले, पण कुठेही त्याची माहिती लागला नाही. तुम्हाला सांगतो की, आता, न्यूयॉर्कहून विमानाने मियामीला पोहोचण्यासाठी सुमारे साडेतीन तास लागतात. जर आपण 1955 बद्दल बोललो तर मियामीला जास्तीत जास्त 5 तासांत न्यूयॉर्कहून विमानाने पोहोचू जाऊ शकत होते.

1955 मध्ये गायब झालेली विमान 914, 30 वर्षांनंतर 9 मार्च 1985 रोजी व्हेनेझुएलाच्या कराकस विमानतळावर रहस्यमयपणे उतरले तेव्हा जग पूर्णपणे दुविधेत पडले होते. या दरम्यान, आश्चर्याची गोष्ट म्हणजे एअर ट्रॅफिक कंट्रोलकडे या विमानाबद्दल कोणतीही पूर्व माहिती नव्हती. पण लँडिंगनंतर थोड्याच वेळात हे विमान पुन्हा एकदा टेक ऑफ झाले आणि पुन्हा आकाशात जाऊन गायब झाले.

असे म्हटले जाते की विमान काराकास विमानतळावर उतरल्यानंतर पायलटने तेथे उपस्थित असणाऱ्या कर्मचाऱ्यांना विचारले की, हे कोणतं वर्ष चालू आहे? तेव्हा ग्राउंड स्टाफने सांगितले की हे 1985 साल चालू आहे. तेव्हा वैमानिकांनी एक दीर्घ श्वास घेतला आणि म्हणाले ‘अरे! अरे देवा’. यानंतर विमानाने पुन्हा आकाशात उड्डाण केले.पण तरी देखील या रहस्यात किती सत्य आणि किती खोटे आहे हे सांगणे फार कठीण आहे. पण 9 मार्च 1985 पासून या विमानाबद्दल कोणतीही माहिती नव्हती. या बेपत्ता विमानाच्या शोधात अमेरिका अजूनही गुंतलेली आहे.

माहिती कशी वाटली आम्हाला कमेंट करून नक्की कळवा आणि अशी उपयोगी माहिती आपल्या प्रियजणांसोबत नक्की शेयर करा. अशाच अनेक माहितीपुर्ण लेखांसाठी आताच आमचे फेसबुक पेज नक्की लाइक करा.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *