श्रावण महिन्यात सर्व इच्छा पूर्ण करण्यासाठी शिवलिंगावर वाहा हि एक मूठ…

नमस्कार मित्रांनो आपलं स्वागत आहे. मित्रांनो आपल्या भारत देशामध्ये भगवान शिवशंकराचे अनेक पर्व तसेच सण, उत्सव साजरे केले जातात. या मध्ये श्रावण महिन्याला फार महत्व आहे. या वेळच्या संपूर्ण श्रावण महिन्यामध्ये 5 सोमवार येणार आहेत. या वर्षी पवित्र श्रावण महिना 9 ऑगस्ट पासून सुरू होईल आणि 6 सप्टेंबर रोजी संपेल. या श्रावण महिन्यामध्ये 5 सोमवार, एक प्रदोष, आणि एक शिवरात्री यांचा योग्य मिळणार आहे. म्हणून श्रावण महिना हा वृत, उपवास, पूजा यांचे अधिक फळ देणारा महिना असतो.

श्रावण महिना म्हंटल की समोर येत निर्मळ वातावरण, पवित्र महिना आणि शिवभक्तांच्या उत्साह. महादेवाला या प्रिय असणाऱ्या महिन्याला हिंदुधर्मामध्ये विशेष महत्व आहे. श्रावण महिन्यातच कावड यात्रा काढण्यात येते. श्रावण महिन्यातच सोमवरला विशेष महत्व असते. श्रावण महिन्यातील सोमवार हा दिवस ईच्या पूर्ण करणारा दिवस मानला जातो. श्रावण महिना महादेवांना खूप प्रिय आहे. म्हणूनच या देवांची पूजा विशेष फलदायी असते.

या काळात महादेवाची पूजा केल्याने सर्व ईच्या पूर्ण होतात अशी मान्यता आहे. विशेषतः श्रावण महिन्यातील सोमवारी केलेली पूजा आणि व्रत यांचे तात्काळ फळ मिळते. भगवान शिव आणि माता पार्वती यांची एकत्र पूजा केल्याने सौभाग्य लागते. तसेच आर्थिक समस्या दूर होतात. मित्रांनो अशा या श्रावण महिन्यामध्ये भागवन शिव शंकराची अधिक अधिक कृपा प्राप्त करून घेण्यासाठी व आपल्या मनोकामनांची पूर्ती करून घेण्यासाठी आपल्याला काय करायचे आहे ते जाणून घेऊयात…


मित्रांनो श्रावण महिन्यातील पहिल्या सोमवारी आपल्या शिवलिंगावर एक मूठ कच्चे तांदूळ वाहायचे आहेत. शिव लिंगावर कच्चे तांदूळ वाहिल्याने अफाट धन, संपत्तीची प्राप्ती होते. जर का आपले धन, पैसे कुठेतरी अडकले असतील, कोणी व्यक्ती आपले पैसे देत नसेल तर शिवलिंगावर कच्चे तांदूळ वाहिल्याने आपले अडकलेले पैसे लवकरात लवकर परत मिळतात.

याचप्रमाणे श्रावण महिन्यातील दुसऱ्या सोमवारी आपल्याला शिवलिंगावर एक मूठ पांढरे तीळ वाहायचे आहेत. श्रावण महिन्यामध्ये पांढरे तीळ वाहिल्याने आपल्या जीवनातील संपूर्ण पापांचा नाश होतो. श्रावण महिन्यातील तिसऱ्या सोमवारी आपल्याला शिवलिंगावर एक मूठ अखंड मूग व्हायचे आहेत. श्रावण महिन्यामध्ये शिवलिंगावर मूग वाहिल्याने आपल्या जीवनातील सर्व अडचणी, त्रास, समस्या दूर होतात. जर का आपले महत्वाचे कार्य पूर्ण होत नसेल, वारंवार त्या मध्ये अडथळे येत असल्यास शिवलिंगावर अखंड मूग वाहिल्याने भगवान शिवशंकर जलद प्रसन्न होऊन आपले राहिलेले काम पूर्ण करतात.

श्रावण महिन्यातील चौथ्या समोवरी आपल्याला शिवलिंगावर एक मूठ जव वाहायचे आहे. जर का आपल्या जीवनामध्ये संतान सुखाची कमी असेल तर आपण श्रावण महिन्यामध्ये शिवलिंगावर एक मूठ जव किंव्हा एक मूठ गहू वाहायचे आहे. असे करण्याने संतान सुखाची प्राप्ती असणाऱ्याला त्याच्या कुळाची मान वाढवणारी संतान प्राप्त होते. याचं प्रमाणे श्रावण महिन्यातील पाचव्या सोमवारी आपल्याला शिवलिंगावर एक मूठ सतू वाहायचे आहेत. श्रावण महिन्यामध्ये एक मूठ सतू वाहिल्याने सर्व संसारी सुखांची प्राप्ती होते. आपल्याला धन,संपत्ती, ऐश्वर्य यांची भगवान शिवशंकरांच्या कृपेने प्राप्ती होते. या शिवाय श्रावण महिन्यामध्ये शिवलिंगावर बेलपत्र वाहने फार महत्वाचे असते.

शिवलिंगावर बेलपत्र वाहिल्याने भगवान शिवशंकर अति प्रसन्न होतात. तसेच आपल्या सर्व मनोकामना पूर्ण करतात. आपल्या जीवनामध्ये कधीही आर्थिक संकटांचा सामना करावा लागणार नाही. या महिन्यात केलेले उपाय इतर महिन्यात केलेल्या उपायांपेक्षा अधिक लाभ देतात. भगवान शिवशंकराना प्रसन्न करण्यासाठी व आपल्या मनोकामना पूर्ण करण्यासाठी हा महिना अत्यंत लाभदायक मानला जातो. तर मित्रांनो आपण ही या महिन्यामध्ये भगवान शिवशंकराना प्रसन्न करणारे हे उपाय आवश्य करा. आपल्या जीवनामध्ये सुख समृद्धी येण्यासाठी व सर्व प्रकारचे अरिष्ट घालवण्यासाठी भगवान शिवशंकरांची कृपा प्राप्त करून घेणे फार महत्त्वाचे असते. कारण भगवान शिवशंकर सर्व पापांचे नाश करणारे आहेत.

माहिती कशी वाटली आम्हाला कमेंट करून नक्की कळवा आणि अशी उपयोगी माहिती आपल्या प्रियजणांसोबत नक्की शेयर करा. अशाच अनेक माहितीपुर्ण लेखांसाठी आताच आमचे फेसबुक पेज नक्की लाइक करा.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *