मुलीने घरच्या परस्थितीमुळे त्याच्या प्रेमाचा स्वीकार केला नाही, सात वर्षाने भेटल्यानंतर जे घडले ते पाहून..

नमस्कार मित्रांनो आपलं स्वागत आहे. मित्रांनो खालील दिलेली माहिती खूप महत्वाची आहे त्यामुळे संपूर्ण लेख नक्की वाचा, आणि तुमचे काही प्रश्न असतील तर कँमेंट मध्ये आम्हाला नक्की विचारा… अंजु नाष्ट्याचे आपटले का सर्वांचे? अंजु नवऱ्यामुलाचा मेकअप झाला का? अंजु आज सकाळी दिलेलं रुकवताचा सामान लावलं का? असे अनेक प्रश्न कानावर आदळत होते. मी एका मंगलकार्यालयात नातेवाईकाच्या लग्नाला आलो होतो आणि गम्मत बघत होतो. एक सावळ्या रंगाची तरतरीत मुलगी हसत मुखाने सगळ्या प्रश्नांची उत्तरे देत होती. या पूर्ण समारंभात ती जबाबदारीने आलेल्या प्रत्येकाला हवं नको ते पाहत होती…तिचं मुलगी अंजु असावी हे समजण्यासाठी फार वेळ लागला नाही.

माझ्या शेजारीच माझी आत्या बसली होती. खात्री करावी म्हणून मी हिला विचारलं.. आत्या कोण ग ही अंजु..! अरे! आपलं दूरच नात आहे तिच्याशी, खूप कामाची आहे पोरगी. पण घरची परिस्थिती खूप बेताची आहे. त्यात तिला वडील नाहीत. आई स्वयंपाकाची कामे करते. ही पोरगी शिकते आहे. तेवढ्यात अंजु आमच्याकडे आली… नाष्टा झाला का? हो झाला.. किती धावपळ करतेस बस जरा..! नको. थांब तुझी ओळख करून देते! आत्या माझ्याकडे वळत म्हणाली..! हा माझा भाचा विद्याधर आणि ही अंजु. नमस्कार अंजु माझ्याकडे पाहत म्हणाली.

सावळा रंग, थरथरत नाक, मोठे पाणीदार डोळे, चेहऱ्यावर मोहक हास्य, माझ्या काळजात लख्ख झाले. नेहमी मेकअप लावलेल्या मुलींपेक्षा हीच ‘साधं सोज्वळ’ रूप किती छान होत… लग्न झालं, जेवण झाली दुपार कलत आली तरी अंजुचा विचार मनातून जाईना. अचानक आमचे काका मला शोधत आले. विद्या तुला मोटारसायकल येत का? मी मान डोलावली… अरे! अंजुला घरी सोडायचे आहे. मी ताडकन उभा राहिलो. अंजु मला रस्ता सांगत होती. मी गाडी चालवत नसून विमान चालवत असण्याचे मला वाटत होते. अंजुच्या घरी पोहोचलो.. साधं घर पण व्यवस्थित, टापटपिट ठेवलेलं. तिची आई नव्हती. अंजुने चहाचा आग्रह केला. खर तर श्रीखंडाच्या जेवणावर काहीच नको होतो. पण केवळ अंजुशी अजून बोलता येईल म्हणून हो म्हणालो.

अंजु नंतर मोकळेपणाने बोलली. ती ‘MA’ ला ऍडमिशन घेणार होती. माझ्या एका मित्राने नुकतेच MA केले होते. त्याची पुस्तके पडून होती. तू पुस्तके घेऊ नको मी आणून देतो अस मी तिला सांगितले. ती हो म्हणाली! ती पुस्तके देण्याच्या बहाण्याने आणि इतर कारणाने मी अंजुकडे जात राहिलो. ती नेहमीच मोकळेपणाने बोलायची. पण अंतर राखूनच… तिने आई असतानाच यावं अस अप्रत्यक्षपणे सुचवले व मी ही ते मानले.बरेच दिवस गेले. मला ही नोकरी लागली. अंजुची MA फायनल ची परीक्षा झाली. शेवटी मी एकदाचा सोक्ष मोक्ष लावायचा ठरविला. एकदा ठरवून तिची आई नसताना तिच्या घरी गेलो. तिने दरवाजा उघडताच आई नसल्याचे सांगितले.

मला तुझ्याशीच बोलायचे आहे. तिच्या नाराजीकडे दुर्लक्ष करत मी आत शिरलो. ‘मी विद्याधर, वय-25, बँकेत नोकरी करतो, पगार 40 हजार आहे. पुढे वाढण्याची शक्यता. आर्थिक परिस्थिती उत्तम, स्वतःचे घर, कोणतेही व्यंग नाही. मी हे सर्व एका दमात बोलून गेलो’. माझ्याकडे आश्चर्याने बोलत अंजु म्हणाली…!पण तू हे मला का संगतोयस? कारण मला तुझ्याशी लग्न करायचे आहे. माझ्याकडे पाहत अस्पष्ट ती पुटपुटली… ते शक्य नाही. सहजपणे ती हो म्हणणार नाही याची मला कल्पना होती… का शक्य नाही, आपल्या परिस्थिती फार फरक आहे. त्याचा काय संबंध. तुझे आई वडील मला सून म्हणून घेणार नाहीत… ते मी बघून घेईल! नको तुझ्या वडिलांची मी दूरची नातलग लागते. ते म्हणतील चांगला मुलगा पाहून हिनेच जाळे टाकले असेल.

त्यांनी नाही सांगितले तर आपण वेगळे राहू. नको एकुलत्या एक मुलाला आईवडिलांन पासून तोडण्याच्या पापात मला पडायचे नाही. अंजु संसार मला करायचा आहे त्यांना नाही. तुझ्या मनात कोणी दुसरा आहे का? ती म्हणाली तस तुला वाटत का..! अंजु प्लिज पाहिजे तर मी नंतर येतो. आई असताना येतो. नाही त्याची गरज नाही. प्रत्येकाने परिस्थिती बघून आपले पाय पसरावे. अंजु माझीच चूक झाली. मी तुझ्या सोबत भावी आयुष्याची स्वप्न रंगवली. येतो मी… अत्यंत निराशाजनकपणे मी उठलो. दुःखात मी पायरीवर थोडे लडबडलो. सांभाळ विद्या अंजु आली आणि मला सावरले. मी तिच्या कडे पाहिले. तिच्या डोळ्यात पाहत म्हणालो. कशाला स्वतःला फसवते अंजु… तिने माझा हात सोडला आणि घरात निघून गेली.

या गोष्टीला आज सात वर्षे झाली. मी इथे त्याच कार्यालयात बसलो आहे. जुनेच डायलॉग ऐकू येत आहेत. हाक मारताना अंजुचा ऐवजी अंजु ताई असा बदल झाला होतो. अंजु ही प्रत्येक नाष्टा कसा झाला हे आवर्जून विचारात होती. त्याच वेळेस स्वयंपाक घरात जाऊन आचार्यांना सूचना देत होती. अंजु जाड झाली होती…! मला मात्र ती टाळत होती. तेवढ्यात माझी पत्नी जवळ आली आणि तिनेच अंजुला हाक मारली अंजु ताई… एक क्षण माझे प्राण कंठात आले. पण आम्ही तर विपरीत काहीच केले नव्हते.

अंजु लगेच आली. बोला ताई.. हे कॅटरिंग तुमच्याकडे आहे का? हो ताई..! कस आहे. छान आहे. तुमचे कार्ड मिळेल का? पुढच्या महिन्यात माझ्या दिराचे लग्न आहे. तुम्हालाच कॉन्ट्रॅक्ट देऊन टाकू. चालेल ताई अगदी मन लावून तुमचे काम करू. माझ्या कडे म्हणत अंजु म्हणाली..! तेवढ्यात कोणीतरी हाक मारली म्हणून पत्नी उठून गेली. अंजु ही उठू पाहत होती. तेवढ्यात मीच म्हणालो. थांब अंजु कशी आहेस.

अंजु म्हणाली दिसते तशीच… तू कसा आहेस. दिसतो तसाच… मी म्हणालो अंजु तुझ्या निर्णयाचा कधी पच्याताप नाही झालं. नाही! लग्न ठरले तेव्हा हे छोटी मोठी स्वयंपाकाची कामे घेत. मी मदत करायला लागली आणि धंदा वाढू लागला. आज आम्ही दोघे ही स्वतंत्र कामे घेतो. हाताखाली माणसे आहेत. एकेकाळी जे अशक्य वाटत होतं ते सर्व आहे. बंगला, कार, बँक बेलेन्स कदाचित तुझ्या पेक्षा जास्त. अजून काय पाहिजे.

छान! अंजु मला फक्त एवढेच विचारायचे आहे सुखी आहेस ना…! होय अर्थातच हे वाक्य एवढ्या जोरात म्हंटली की चार लोकांनी आमच्याकडे वळून पाहिले.अंजु घाईने उठून गेली. मी सुन्न पणे बसून राहिलो. मी ही तसा सुखीच होतो. प्रेमळ बायको, पैसा, नोकरी तरीही काहीतरी हरवले होते. कुठेतरी चुकल्यासारखे वाटत होते. भानावर आलो…उतरलेला चेहरा आणि डोळ्यात जमा होऊ पाहणारे अश्रू लग्नात चांगले दिसले नसते. मी चेहरा धुवायला कोपऱ्यात गेलो. तिथे पोहचताच चमकलो.. कारण भिंती जवळच्या कोपऱ्यात अंजु साडीने डोळ्यातील अश्रू पुसत होती…

माहिती कशी वाटली आम्हाला कमेंट करून नक्की कळवा आणि अशी उपयोगी माहिती आपल्या प्रियजणांसोबत नक्की शेयर करा. अशाच अनेक माहितीपुर्ण लेखांसाठी आताच आमचे फेसबुक पेज नक्की लाइक करा.धन्यवाद …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *