भाड्याच्या घरात राहता, मग घराचे स्वप्न पूर्ण करण्यासाठी मंगळवारी करा हा उपाय…

प्रत्येकाचे घर असावे अशी प्रत्येकाची इच्छा असते. आपल्या संपूर्ण जीवनात आपल्या स्वतःच्या मालकीचे किमान एक तरी घर स्वतः बांधावे किंवा ते आपण विकत घ्यावे अशी मनोमन इच्छा प्रत्येकाचीच असते. मात्र प्रत्येकाची ही इच्छा काही पूर्ण होत नाही. घर विकत घेण्यामध्ये किंवा नवीन घर बांधण्यामध्ये किंबहुना नवीन जागा शोधण्यामध्ये अनेकांचा जन्म निघून जातो. पण घर काही पूर्ण होत नाही.

मित्रांनो जर तुमच्या जीवनात अशा काही समस्या असतील, म्हणजेच पहिली गोष्ट तुम्ही घर बांधण्यासाठी एखादी जागा, एखादा प्लॉट शोधताय मात्र तो प्लॉट काही मिळत नाहीये. योग्य असा प्लॉट योग्य दरात मिळत नाहीये. प्लॉट घेण्यामध्ये, जमीन घेण्यामध्ये अनेक समस्या येत आहेत किंवा तुम्ही प्लॉट विकत घेतलेला आहे मात्र त्या ठिकाणी घराचं बांधकाम अपूर्ण आहे. घराच्या बांधकामात मुहूर्तच मिळत नाहीये. थोडक्यात आपल्या घराचं स्वप्न पूर्ण होण्यासाठी, आपली नवीन वास्तू उभी राहण्यासाठी आपल्यालाकाही छोटे छोटे उपाय करता येतात. आज आपण साधे साधे उपाय पाहणार आहोत. जितके उपाय करणं शक्य आहे तितके करा किंवा त्यातील एखादा उपाय केला तरी चालेल.

मित्रांनो नवीन वास्तूसाठी म्हणजेच नवीन घरासाठी पहिला आणि सर्वात सोपा उपाय म्हणजे श्री गजानन, जय गजानन या महामंत्राचा जप करणे. ज्यांना शक्य असेल त्यांनी कमीत कमी दिवसातून 108 वेळा या मंत्राचा जप करा आणि या मंत्राचा जप करण्यासाठी तुळशीची माळ चुकूनही वापरू नका. आपण इतर कोणतीही माळ वापरू शकता. जर तुमच्याकडे वेळ नसेल तर काळजी करू नका, तुम्ही चालता, बोलता अगदी कुठेही असताना या मंत्राचा जास्तीत जास्तत वेळा जप करा. जर तुम्ही बसमधून प्रवास करताय किंवा तुम्ही चालण्यासाठी जाताय, फिरण्यासाठी जाताय तर बसल्या बसल्या किंवा चालता चालता या मंत्राचा जप करत चला. मनातल्या मनात केला तरी चालेल. या मंत्राचा महिमा इतका मोठा आहे की काही महिन्यातच साधारणतः दीड ते दोन महिन्यांच्या कालावधीत तुमच्या वास्तुस प्रारंभ झालेला दिसून येईल.

दुसरी गोष्ट, थोडासा अवघड उपाय आहे. एकवीस संकष्ट्या कराव्यात. चतुर्थीचा उपवास करा किंवा ज्यांना एकवीस संकष्ट्या करणं कारण कालावधी खुप वाढतो अशा लोकांनी एकवीस मंगळावर उपवास करा. एकभुक्त उपवास करा म्हणजे एक वेळेस भोजन करायचं आहे. तर असा एकवीस मंगळवार आपण उपवास करायचा आहे आणि हा उपवास किंवा या संकष्ट्या आपण गणपतींच्या नावे करायच्या आहेत. गणपती बाप्पा यांच्या नावे हा उपवास करत आहोत. मित्रांनो जर तुम्ही एकवीस मंगळावर एकभुक्त उपवास हा उपाय करणार असाल तर दर मंगळवारी आपण गणपती बाप्पांना एक जास्वंदीचे फुल, पहिल्या मंगळवारी एक जास्वंदीचे फुल, दुसऱ्या मंगळवारी दोन जास्वंदीचे फुल, तिसऱ्या तीन, चौथ्या चार असे करत करत एकविसाव्या मंगळवारी एकवीस जास्वंदीची फुलं गणपतींच्या चरणी अर्पण करणार आहोत आणि दुसरी गोष्ट प्रत्येक मंगळवारी या जास्वंदीच्या फुलासोबत एकवीस दुर्वा सुद्धा गणपती बाप्पांना अर्पण करायच्या आहेत.

अजून एक छोटासा उपाय, गणपती अथर्वशीर्ष. गणपती अथर्वशीर्ष चा दररोज पाठ करा. जास्त वेळ लागत नाही पाच ते दहा मिनिटात हा होऊन जातो. मित्रांनो तुम्ही तुमचे घर होत नाही म्हणून रात्रंदिवस विचार करता, काही जण डिप्रेशनमध्ये जातात मोठ्या प्रमाणात नकारात्मक विचार मनामध्ये येतात. भाड्याच्या घरात किती दिवस रहावे अशा प्रकारच्या विचाराने मन खिन्न होते. तुम्ही विचार करण्यात जितका वेळ घालवता कितीतरी वेळ आपण गणपती अथर्वशीर्षचं पठण करण्यात घालवला तर लक्षात ठेवा तुमचं घर हे काही दिवसातच पूर्ण होईल. जेव्हा तुम्ही हा उपाय करायला सुरुवात कराल जर तुमचे नशीब खुप बलवत्तर असेल किंवा गणपती बाप्पांच्या कृपेने जर काही दिवसातच, काही महिन्यातच जर तुम्हाला घराचे स्वप्न पूर्ण झालेलं दिसलं, तुमचं घर जर पूर्ण झालं तर जो उपाय तुम्ही सुरू केलेला आहे त्या उपायामध्ये खंड पाडू नका. जो उपाय करण्यात तुम्ही सुरुवात केली आहे तो उपाय अगदी संपूर्ण करा.

जर तुम्ही एकवीस संकष्ट्यांचा संकल्प केला होता तर हो पर्यंत एकवीस संकष्ट्या होत नाहीत तो पर्यंत आपण थांबू नका. जर आपण एकवीस मंगळवार करणार होता तर एकवीस मंगळवार उपवास अवश्य करा. या उपायामध्ये खंड पडता कामा नये. मित्रांनो महत्त्वाची गोष्ट सांगायची राहिली जर तुम्हाला घर बांधण्यामध्ये पैशांची अडचण असेल म्हणजे तुम्ही कर्ज मिळवण्यासाठी प्रयत्न करताय मात्र बँक काही होमलोन मंजूर करत नाहीये किंवा ज्या काही गृहनिर्माण सोसायट्या असतात त्या ठिकाणी तुमचं गृहकर्ज मंजूर होत नसेल तर घरासाठी कर्ज मिळवण्यासाठी एक छोटासा पण अत्यंत प्रभावी उपाय आहे. यासाठी आपल्याला प्रत्येक मंगळवारी एक वाटी मसूर डाळ घ्यावी लागेल आणि त्यामध्ये साधारणतः 100 ते 200 ग्रॅम गुळ त्या मसूर डाळीमध्ये टाकायचा आहे.

असे हे मिश्रण आपण लाल रंगाच्या गोमातेस, गाईस खाऊ घालायचे आहे. जर प्रत्येक मंगळवारी हा उपाय केलात तर खुप लवकर कर्ज मिळण्याची योग निर्माण होतात आणि घराचे स्वप्न तुम्हाला लवकरच पूर्ण झालेलं दिसेल. मित्रांनो जेव्हा तुमचे कर्ज कोणतीही बँक मंजूर करेल तेव्हा लागलीच हा उपाय थांबवू नका. अगोदर सांगितल्याप्रमाणे कोणताही उपाय लागलीच थांबण्यासाठी नसतो. जरी तुम्हाला कर्ज मंजूर झालं तर लक्षात घ्या तुम्हाला जे कर्ज मिळणार आहे ते टप्याटप्याने मिळते. म्हणून लगेच भारावून जाऊन कोणताच उपाय थांबवू नका. दर मंगळवारी गोमातेस विशेष करून लाल रंगाच्या गोमातेस जर लाल रंगाची गाई नसेल पांढऱ्या रंगांची पाहा आणि जर पांढरीही नसेल तर कोणत्याही रंगाची चालेल.

तर प्रत्येक मंगळवारी एक वाटी मसूर आणि त्यासोबत 100 ते 200 ग्रॅम गुळ गोमातेस खाऊ घाला. गोमातेच्या पाठीवरून प्रेमाने हात फिरवा, गोमातेस हात जोडून आपलं घराचे स्वप्न पुर्ण व्हावे, आपल्याला घरासाठी कर्ज मिळावे, पैशांची उपलब्धता व्हावी यासाठी प्रार्थना करा. सोबतच गोमातेमध्ये 33 कोटी देवदेवता असतात त्यांना सुद्धा आवाहन करा की त्यांनी घराचे स्वप्न पुर्ण होण्यासाठी तुमची मदत करावी. तर हे छोटे छोटे उपाय अवश्य करा. धन्यवाद..

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *