फक्त स्त्रियांनी ही माहिती वाचा, पुरुषांनी वाचू नका नाहीतर भाव खाल…

एका कॉलेजमध्ये हॅपी मॅरीज लाईफ वर एक कॉम्पिटीशन चालू होती. ज्यात काही कपल्सने पार्टीसिपेट केलं होतं. कॉम्पिटीशन घेणारे प्रोफेसर आले त्यांनी येताना पाहिले खुप सारे कपल्स लग्नावर खुप सारे जोक करत होते, हसत होते. हे पाहून प्रोफेसर बोलले की चला एक गेम खेळूया. सगळे इंटरेस्ट घेऊन त्यांच्याकडे पाहायला लागले, की काय असेल हा गेम? आणि त्यांनी त्या गेमला सुरुवात केली. त्यांनी एका लग्न झालेल्या मुलीला स्टेजवर बोलवले आणि ते बोलले तुझ्या जवळच्या व्यक्ती ज्या तुला महत्त्वाच्या वाटतात अशा व्यक्तींची या ब्लॅकबोर्ड वर नावे लिही.

पंचवीस, तीस नावे लिही. त्या मुलीने नावे लिहायला सुरुवात केली. पहिले तिने कुटुंबातील व्यक्तींची नावे लिहली, नंतर शेजाऱ्यांची लिहली, मित्रांची नावे लिहली आणि तिच्या ऑफिसमधल्या लोकांची नावं लिहली. मग ते प्रोफेसर बोलले की आता त्यांच्यातून काही कमी महत्त्वाची लोकं असतील अशी पाच नावं पुसून टाक. मुलीने तिच्या ऑफिसमधल्या काही कर्मचारांची म्हणजे तिच्या ऑफिसमधल्या व्यक्तींची नावं पुसून टाकली.

त्या प्रोफेसरने अजून पाच नावं पुसायला लावली. मग तिने विचार करून शेजाऱ्यांची नावं पुसली. आता त्या प्रोफेसरांनी सांगितले की अजून दहा नावे पुसून टाक. मुलीने परत थोडा विचार केला आणि तिच्या मैत्र मैत्रिणी आणि जे काही फॅमिलीतले दूरचे लोक होते त्यांची नावं पुसून टाकली. आता बोर्डवर फक्त चार नावं उरली होती. तिचे मम्मी पप्पा, तिचे पती आणि तिच्या मुलाचे नाव. आता प्रोफेसरने कठीण गोष्ट सांगितली यांच्यातून दोन नावं अजून पुसून टाक.

ती मुलगी सॅड होऊन गेली, तिला रडू येऊन गेले. हा विचार करून की हे चारही माझ्यासाठी खुप महत्त्वाचे आहेत. यांच्यातील दोन नावं कसं काय पुसू. तिने मनावरती दगड ठेवून तिच्या आई वडिलांचे नाव पुसून टाकले. तिथे जमलेले सर्व लोक शांत होऊन गेले होते. गेम तर त्या मुलीसोबत चालू होता पण परिणाम सगळ्यांवर होत होता. आता बोर्डवर फक्त दोन नावं उरली होती. तिच्या मुलाचं आणि तिच्या पतीचं.

आता प्रोफेसरांनी तिला सांगितलं की अजून एक नाव पुसून टाक आणि बोर्डवर एकच नाव राहू द्या. ती मुलगी शॉक होऊन गेली आणि डायरेक्ट खाली बसून गेली, आता मी काय करू. जसं की तिला खरंच कोणीतरी त्या दोघांपैकी एका जणाला निवडायला सांगताय. मग प्रोफेसरांनी खुप सांगितलं, मग त्यानंतर तिने विचार केला आणि कसं तरी तिच्या मुलाचं नाव पुसून टाकलं आणि त्यानंतर तिला प्रोफेसरांनी विचारलं की तू असं का केलंस.

ज्या आईवडिलांनी तुला जन्म दिला त्यांचही नाव पुसून टाकलस. ज्या तुझ्या मुलाला तू जन्म दिलाय त्याचंही नाव पुसून टाकलस आणि तुझ्या पतीचं नाव राहू दिलंस. तु असं का केलस? जेव्हा तिला असं विचारलं, तिने सांगितले की माझ्याच जागी माझी आई असती ना तर तिने हेच केलं असते. मला माझ्या आईने शिकवले होते की आई वडील नेहमी तुझ्या सोबत नाही राहणार आणि मुलगा लग्नानंतर बहुतेक तुझी पर्वा नाही करणार. पण तुझ्या जीवनाचा, तुझ्या शरीराचा भाग बनून आता भाग बनून जो नेहमी तुझ्यासोबत राहील तो म्हणजे तुझा पती. म्हणून मी माझ्या पतीचं नाव राहू दिलं आणि हे ऐकून तो सगळा हॉल टाळ्यांनी गजबजून गेला. धन्यवाद..

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *