यावेळी झाडूने केर काढल्यामुळे दारिद्रय जाते व देवी लक्ष्मी होते प्रसन्न…

वास्तुशास्त्रानुसार झाडू आपल्या घरातील महत्वाची वस्तु आहे. आपले घर साफ करण्याबरोबरच ती घरातील नकारात्मक ऊर्जाही बाहेर टाकते. आपल्या शास्त्रानुसार झाडूमध्ये देवी लक्ष्मीचा वास असतो. झाडूला देवी लक्ष्मीचे प्रतीक मानतात. झाडूच्या योग्य उपयोगाने आपण लक्ष्मीला प्रसन्न करू शकतो.

वास्तुशास्त्रानुसार घरात झाडू नेहमी पश्चिमेकडे तोंड करून ठेवावा. पश्चिम दिशा झाडू ठेवण्यासाठी उत्तम मानली गेली आहे. यामुळे वास्तुदोष दूर होतात. परंतु स्वयंपाकघर किंवा जेवणाची खोली पश्चिमेकडे असली तरीही तिथे झाडू ठेऊ नये.

स्वयंपाकघरात झाडू ठेवल्यास देवी अन्नपूर्णा नाराज होते. झाडू नहेमी पटकन कोणाला दिसणार नाही अशा ठिकाणी ठेवावा. आपण जसे पैसे लपवून ठेवतो तसेच देवी लक्ष्मीचे प्रतीक मानले गेलेला झाडूही लपवून ठेवावा. बाहेरून आलेल्या लोकांना तो पटकन दिसता कामा नये.

जर तुमच्या घरी भांडणे होत असतील, घरात नकारात्मक ऊर्जा वाटत असेल तर रात्रीच्या वेळी झाडू घराच्या मुख्य दरवाजासमोर ठेवा. यामुळे नकारात्मक ऊर्जा तुमच्या घरात प्रवेश करणार नाही. घरासमोर तुटलेला किंवा जुना झाडू ठेऊ नये. झाडू नेहमी चांगल्या स्थितीत असावा.

नेहमी शनिवारी झाडू खरेदी करावा. शनिवारी झाडू खरेदी करणे शुभ मानतात. यामुळे झाडूबरोबर देवी लक्ष्मी घरात प्रवेश करते असे मानतात. तुम्ही जर सकाळच्या वेळी केर काढत असाल तर रात्री तयार झालेली नकारात्मक ऊर्जा कचऱ्याबरोबर घराबाहेर जाते. सूर्योदयाच्या वेळी जेव्हा सूर्याची किरणे तुमच्या घरात शिरतात त्याचवेळी केर काढला पाहिजे.

यामुळे घरातील नकारात्मक ऊर्जा सूर्यकिरणांबरोबर नष्ट होते व घरात सकारात्मक ऊर्जा तयार होते. यामुळे घरात सुख समृद्धी येते. कधीही दुसऱ्यांचा झाडू वापरू नये किंवा तुमचा झाडूही दुसऱ्यांना वापरायला देऊ नये. असे केल्यास तुमच्या घरात नकारात्मक ऊर्जा येऊ शकते किंवा दुसऱ्यांचे दुर्भाग्यही तुमच्या घरात येऊ शकते.

मित्रांनो कोणत्याही प्रकारची अंध श्रद्धा पसरवणे हा Mahiti.in उद्देश नाही. केवळ भारतीय समाज मान्य असलेल्या कथा, उपाय, विधी आपल्या पर्यंत पोहचवले जातात. Mahiti.in कोणत्याही प्रकारच्या अंध श्रद्धेला खतपाणी घालत नाही. इथे शेयर होणारे लेख हे फक्त माहिती साठी आहेत. त्यांचा वापर अंध श्रद्धा म्हणून करू नका. धन्यवाद!.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *