सीताफळाचे करा असे सेवन- तुमचे गेलेले केस परत येतील…

सीताफळ खाण्यासाठी जितके स्वादिष्ट असते, तितकेच ते आपल्या स्वास्थ्यासाठी अतिशय लाभदायक आहे. सीताफळ एक पित्त, पौष्टिक, टॉनिक, अॅंटी-पोटफुगी, आणि हृदयासाठी फायदेशीर आहे. हे फळ खायला खूपच मधुर असते. सीताफळ हे हिवाळ्याच्या दिवसात बाजारात येते. हे फळ “शरिफा” या नावाने पणमी ओळखले जाते. सीताफळांचा उपयोग औषधात पण मोठ्या प्रमाणात केला जातो. आज आम्ही तुम्हाला सीताफळाचे आपल्या तब्येतीसाठी काय काय फायदे व लाभ आहेत ते सांगणार आहोत.

१. सीताफळामध्ये कॅल्शियम, मैग्ंनेशियम, फायबर आणि अनेक अन्य पोषक तत्व असतात. ते आपल्या शरीराला ताकद देण्याचे काम करतात. हे कोलेस्ट्रॉल कमी करून हृदयाला निरोगी ठेवण्यास मदत करते.

२. कोणालाही काळे, घनदाट केस खूप आवडतात. पण आजकालच्या धावपळीच्या जीवनशैलीत आपण आपल्या केसांच्या स्वास्थ्यासंबंधी खूपच बेपर्वा असतो. त्यामुळे केस गळणे, पिकणे, आणि टक्कल पडणे या समस्यांना सामोरे जावे लागते. आज जगामध्ये खूप लोक केसांच्या समस्यांनी हैराण आहेत. त्याचे एकच उत्तर आहे ते म्हणजे सीताफळ. या फळाच्या सेवनाचे खूप फायदे आहेत.

३. सीताफळात कॅल्शियम आणि आर्यन भरपूर प्रमाणात असल्यामुळे वाढ होणार्याा मुलांसाठी व मुलींसाठी त्यांना सीताफळ खायला दिले जाते, त्यामुळे त्यांचा विकास व वाढ उत्तम होते आणि शरीर स्वस्थ व मजबूत राहाते.

४. सीतफळात कॉपर व आर्यन असल्यामुळे हे गर्भवती महिलांसाठी खूपच फायदेशीर आहे. याचे नियमित सेवन केल्यामुळे गर्भवस्थेतील अडचणी ते दूर करते.

५. ज्या लोकांना दम लागतो, घबराहट होते, किंवा तुम्ही पेलपिटेशन किंवा हृदयात जडत्वाचे लक्षण तुम्हाला जाणवत असेल, तर तुम्हाला हृदयाच्या मांसपेशींची ताकद वाढवून हृदयाची गती नियंत्रित करण्यासाठी सीताफळ खाणे जरूरी आहे.

६. फोड झाले असतील तर सीताफळाची पाने त्यावर लावली तर फोड बरे होतात. काही लोकांच्या तोंडात छाले पडतात, त्यावर सीताफळाची पेस्ट लावली तर खूपच फायदा होतो. सीताफळ हे दात व हिरड्यांसाठी उपयोगी आहे कारण त्यात कॅल्शियम मोठ्या प्रमाणात असते.

७. रात्री झोपताना केसांवर जर सीताफळाच्या बिया रगडून लावल्या, तर केसातील उवा, लिखा व कोंडा नाहीसा होतो. जर तुम्ही या बियांच्या पाऊडर मध्ये शिकेकाई मिसळून केस धुतले तर तुमचे केस स्वछ व चमकदार होतील. केसांची समस्या नाहीशी होईल. तुम्हाला कधीही टक्कल पडण्याची चिंता करायची जरूर पडणार नाही.

८. उच्च रक्तदाब व हृदयरोग या रुग्णांसाठी सीताफळ खूपच फायदेशीर आहे. दररोज एक सीताफळ खाल्यामुळे तब्येतीसाठी खूपच फायदे होतात. यामध्ये असलेले अॅंटी-ओकसिडेंट्स आणि पॉटाशियम तब्येतीसाठी उत्तम आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *