नेहमी चांगल्या माणसांच्याच नशिबात खूप दुःख का येते? वाचा श्री मच्छिंद्रनाथांचे उत्तर…

मित्रांनो बरेचदा आपल्याला एक प्रश्न पडतो की जीवनात चांगल्या माणसांच्या जास्त दुःख का बरे येतात? आज आपण याच प्रश्नाचे उत्तर जाणून घेणार आहोत. नाथपंतातील श्री मच्छिन्द्रनाथ यांनी या प्रश्नाचे काय उत्तर दिलेले आहे हे त्यांच्याच एका गोष्टीतून जाणून घेणार आहोत आणि यावर त्यांनी काय उपाय सुचवला आहे हे देखील पाहणार आहोत. मित्रांनो मच्छिन्द्रनाथ हे एक थोर योगी होते. ईश्वर चिंतनामध्ये ते कायम मग्न असायचे. अत्यंत मितभाषी, फारचं कमी बोलायचे. पण जे काही बोलायचे ते अगदी काळजाचा ठाव घेईल असे असायचे.

मच्छिन्द्रनाथ सांगतात की तुमचा हा जन्म गेल्या जन्माच्या कर्माचे फळ आहे. प्रत्येक जन्म हा पाठच्या जन्माच्या कर्मातून निघतो. जे गेल्या जन्मी आपण कर्म करतो ते पुढच्या जन्मी भोगावेच लागते. कधी कधी त्यात चालू जन्मात देखील ते भोगावे लागते आणि उरलेलं जे कर्म आहे ते पुढच्या जन्मी भोगावे लागते. म्हणजे हे असे चालूच राहते. मित्रांनो मच्छिन्द्रनाथ ज्यावेळेला लोकांना हे ज्ञान सांगत होते त्यावेळी तिथे अत्यंत असा गरीब, जो एक दीर्घ आजाराने ग्रस्त असा मनुष्य हे सर्व विचात ऐकत होता.

तो मच्छिन्द्रनाथांजवळ आला आणि त्याने त्यांना सांगितले की मी तुमच्या या विचारांशी अजिबात सहमत नाही आणि त्या गरीब माणसाने आपला कहाणी नाथांना सांगायला सुरुवात केली. तो म्हणाला, की महाराज माझे पणजोबा फारच क्रूर होते, ते फार मोठे राजा होते. त्यांनी अनेक वाईट गोष्टी केल्या. खुनखराबा केला, महिलांवर अत्याचार केले, राज्याचा विस्तार केला, खूप अनेक मार्गाने भरपूर धन जोडले. पण त्यांना मरण अगदी छान आलं, अगदी पटकन गेले. त्यांना कुठेही काहीही भोगावे लागले नाही.

माझे आजोबा ते देखील तसेच. ते ही अगदी क्रूर कर्मा होते, अगदी लोकांचा त्यांनी छळ छळ केला आणि ते ही अगदी चटकन गेले. माझे वडील देखील तसेच क्रूर कर्म. पण झाले असे माझा जन्म झाला आणि वडिलांचे राज्य तर गेलेच पण एवढी धुवधान उडाली आमची की भयानक दिवस माझ्या जन्मापासूनच सुरू झाले. मी जन्माला आलो तर केवळ आमचं राज्य गेले नाही तर वडीलांचा खून झाला, आईही वारली, मी अगदी अनाथ झालो. मी या छोट्याशा झोपडीत निर्धन आणि रोगी असा झालो महाराज. बघा ना महाराज मी कधी कोणाचा छळ केला नाही.

कुणा बाईकडे नजर वर करून पाहिले नाही. कुणावर हात उगारला नाही. कारण हातात ते बळच नाही ना. माझ्याजवळ काय आहे तर पणजोबा, आजोबा, वडिलांची चित्रे आहेत म्हणजे पूर्वी राजे महाराजे स्वतःची पेंटिंग वगैरे बनवून घ्यायची ती पेंटिंग त्याच्याकडे शिल्लक होती. बाकी संपत्तीमधील सर्व काही निघून गेले होते. अगदी साध्या झोपडीत, गरिबीत तो माणूस दिवस काढत होता. हे सर्व विशेषतः पणजोबा, आजोबा क्रूरपणे वागूनही निसटले. मी कधीच कुठलं पाप न करता भोगतोय.

हाच का तुमच्या ईश्वराचा न्याय. असा प्रश्न त्याने महाराजांना केला. हे सर्व माणूस नाथांना सांगत होता त्यावेळी मच्छिन्द्रनाथांनी एक काडी घेऊन मातीत काहीतरी असे रेगोट्या मारत होते, असे काहीतरी त्यांचे चालू होते. त्या माणसाचे सर्व सांगून झाल्यावर त्यांनी त्याला जवळ बोलावले आणि बघ मातीत. त्याने मातीत बघितले आणि एकदम आश्चर्यचकित, थक्क झाला. ते काय होते? तर ते त्याच्या आजोबांचे चित्र त्या मातीत काढले होते आणि मच्छिन्द्रनाथ त्याला म्हणाले. अरे तूच तो आहेस. कळलं का मित्रांनो तुम्हाला. म्हणजे त्या माणसाने जे पणजोबांचे वर्णन केले होते की ते कसे क्रूर राजा होते, त्यांनी लोकांचे कसे हाल हाल केले वगैरे ते सगळं आणि त्याच पणजोबांचे पुनर्जन्म गरीब, आजारी माणूस होता तो पणजोबांचा पुनर्जन्म होता.

त्यामुळे त्यांनी मागच्या जन्मी जी काही दुष्कृत्ये केली होती त्याच्या फलस्वरूप त्यांना हा सगळा त्रास या जन्मी भोगावा लागत होता. त्या माणसाला लाख वाटत होते की मी कोणाचे वाईट केलंच नाही पण माझ्या बाबतीत असं कसं. पण त्याची मागच्या जन्माची जी वाईट कर्मे होती ती त्याच्या फलस्वरूप त्याला, त्याची जी परिस्थिती होती ती त्याला भोगावी लागत होती. पुढे मच्छिन्द्रनाथ आपल्याला असे मार्गदर्शन करतात. बघा की जर संचित म्हणजे जे काही मागच्या जन्मीची कर्म आहेत ते आपण सोबत घेऊन येतो.

जे आपण वाईट चांगली कर्म करतो ते आपण या जगात सोबत घेऊन येत असतो. ती जर वाईट असतील तर त्याचे भोग आपल्याला भोगावेच लागतात. आपण कितीही म्हटले, हे खोटं आहे, असं काही नसतं वगैरे परंतु प्रारब्ध म्हणजेच हे भोग, वाईट कर्म केली आहेत त्याचे भोगस्वरूप या जन्मी त्रास वगैरे जे काही भोगायला लागणार आहे त्याला प्रारब्ध. ते भोगावेच लागते, ते काहीही झाले तर ते टळू शकत नाही. ते भोगणे एवढेच माणसाच्या हातात आहे. आपल्या स्वामींच्या कथात देखील असे आहे, अनेक माणसांना त्यांच्या पूर्व कर्माचे भोग भोगावे लागत होते. जेव्हा ते भोग भोगून संपायचे तेव्हा त्यांच्या आयुष्यात चांगला काळ यायचा.

मच्छिन्द्रनाथ यावर पुढे आपल्याला उपाय देखील सांगत आहेत. मित्रांनो गुरुकृपेने काही अंशी ते जे प्रारब्ध आहेत, ते जे भोग आहेत त्यामध्ये बदल अवश्य होतो. गुरू काय करतात? तर त्याचे प्रारब्धाचे भोग आहेत ते सौम्य करतात. म्हणजे जितका त्रास होणार असतो त्या कर्माचा, जर तुम्ही गुरुची भक्ती करत असाल. आता इथे गुरू म्हणजे स्वामी समर्थ. स्वामी महाराजांची तुम्ही मनापासून भक्ती करत असाल तर तुमचे जे काही भोग आहेत त्यांचा तुम्हाला तितका त्रास होणार नाही.

स्वामी ते आपल्या भक्तांसाठी फार कमी करतात आणि उरलेले भोग जे काही थोडेफार आहेत ते भोगण्यासाठी मानसिक बळ गुरू पुरवतात. मित्रांनो हरी कृपेनेच केवळ प्रारब्धाचा नाश होतो असे म्हटलेले आहे. आता हरी म्हणजे कोण? श्रीकृष्ण, विठ्ठल त्यांना आपण हरी म्हणतो. स्वामींच्या कृपेनेच आपले जे काही कर्म आहेत, आता तुमच्यावर पण संकट असेल, वाईट काळ असेल परिस्थितीतुन जात असाल तर मित्रांनो जास्तीत जास्त स्वामींची भक्ती करायची आहे. नामस्मरण करा, जे काही स्वामींचे तुम्हाला वाचन करता येईल किंवा उपासना करा. ते तुम्ही जास्तीत जास्त करा. त्याने हे जे भोग आहेत हे कमी होणार आहेत. हे भोगण्याची ताकद मिळणार आहे.

स्वामींनी प्रेरणा देऊन हे जे ग्रंथ आहेत, चरित्र आहेत हे स्वामींनीच लिहून घेतले आहेत. म्हणजे गुरूलीलाअमृतासारखा थोर स्वामींचा ग्रंथ आहे तो ग्रंथ लिहिला जाणार हे स्वामींनी लिहला जाण्याच्या अगोदर तो ज्या वामन बुवांनी लिहला त्यांचा जन्म होण्याच्या आधीच त्यांच्या वडिलांना स्वामींनी आधीच सांगितला होता की तुझा तिसरा मुलगा माझे चरित्र लिहिल. हे स्वामींनी भाकीत केलं होतं आणि खरंही झालं. मग जर हे असे असेल तर स्वामींनी चरित्र भक्तांना प्रेरणा देऊन का बरे लिहून घेतली.

आपले जे वाईट कर्म आहेत, जी काही वाईट परिस्थिती आहे जो आपल्या कर्मामुळे आहे किंवा जी काही संकटे येतात त्यातून निघण्यासाठी आपल्याला जास्त स्वामी सेवा करणे गरजेचे आहे. तुम्हाला जर लवकर सुटका हवी असेल स्वामी आपल्या कायम पाठीशी असावे, कायम मदतीला यावे, असं तुम्हाला वाटत असेल तर जास्तीत जास्त सेवा करणे गरजेचे आहे. तर मित्रांनो आजच्या गोष्टीतून आपल्याला हा बोध मिळतो की आयुष्यात नेहमी चांगले वागा, प्रामाणिक प्रयत्न करा. दुसऱ्यांना, इतरांना त्रास होईल असे वागू नका आणि जी काही वाईट संकटे, काळ वगैरे येणार पण त्याने घाबरून जाऊन नका. जास्तीत जास्त स्वामींची भक्ती करा, स्वामी तुम्हाला लवकरात लवकर सोडवतील, मार्ग दाखवतील. धन्यवाद..

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *