वांगाचे डाग जाण्यासाठी उपाय, चेहऱ्यावरील काळे डाग जाण्यासाठी उपाय…

नमस्कार मित्रांनो आपले स्वागत आहे. आज आपण चेहऱ्यावरील वांगाचे डाग आणि काळे डाग कसे घालवायचे हे पाहणार आहोत. चेहऱ्यावर जर वांगाचे डाग आले असतील किंवा काळे डाग आले असतील तर आपल्या सौंदर्यामध्ये निश्चितच बाधा निर्माण होते. यामुळे प्रत्येकाला वाटते की आपला चेहरा सुंदर व मुलायम असावा. यासाठी आपण हा उपाय पाहणार आहोत.

हा उपाय अतिशय स्वस्तात करता येण्यासारखा आहे. अगदी एक रुपया पेक्षाही कमी खर्च यासाठी लागणार आहे आणि सर्वांना करता येणारा अतिशय सोपा आणि सुटसुटीत आहे. तर हा उपाय कसा करायचा? यासाठी कोणकोणते साहित्य वापरायचे ते आपण पाहुया. यासाठी पहिला घटक लागणार आहे खोबरेल तेल. यासाठी तुम्ही कोणतेही ब्रँडेड कंपनीचे खोबरेल तेल घेऊ शकता.

तर असे हे खोबरेल तेल दोन चमचे एका वाटीत घ्यायचे आहे. त्यानंतर हे तेल गरम करायचे आहे आणि त्यानंतर हे तेल थोडेसे कोमट होऊ द्यायचे आहे. तर असे हे खोबरेल तेल गरम करून घेतल्यानंतर या तेलाची गुणवत्ता खुप अधिक पटीने वाढते. खोबरेल तेल हे कोणत्याही प्रकारच्या त्वचेसाठी अतिशय चांगले असते. खोबरेल तेलामध्ये फॅटी ऍसिडस् भरपूर प्रमाणात असतात.

तसेच या तेलामध्ये अँटीव्हायरल, अँटीफंगल आणि अँटीबॅक्टरीयल गुणधर्म असतात. तर अशा या गुणकारी खोबरेल तेलामुळे चेहऱ्यावरील वांगाचे डाग, काळे डाग आणि चेहऱ्यावरील पिंपल्स मुळापासून नष्ट होतात. आता यामध्ये दुसरा महत्त्वाचा घटक टाकणार आहोत तो म्हणजे कापूर. कापूर हा आयुर्वेदामध्ये सौंदर्यवर्धक म्हणून ओळखला जातो.

आजपर्यंत तुम्ही कापूर फक्त पूजेसाठी किंवा आरती करताना वापरला असेल. पण कापुर हा आरोग्याचे दृष्टीने खुप फायदेशीर असतो. कापराचा उपयोग अनेक प्रकारच्या आजारांना दूर पळवण्यासाठी केला जातो. कापरामध्ये अँटीफंगल आणि अँटीबॅक्टरीयल गुणधर्म असतात.

तर असे हे तीन कापूर आपल्याला घ्यायचे आहेत आणि हा कापूर बारीक कुस्करून या खोबरेल तेलामध्ये टाकायचा आहे. कापूर आणि खोबरेल तेलाचे मिश्रण व्यवस्थित एकजीव करायचे आहे. असे हे एकजीव झालेले मिश्रण चेहऱ्यावरील वांगाच्या डागांवर लावायचे आहे.

चेहऱ्यावर जिथे जिथे वांगाचे डाग किंवा काळी वर्तुळे आली असतील त्या ठिकाणी हे मिश्रण व्यवस्थित लावायचे आहे. तर अशा या शंभर टक्के नॅचरल आणि शंभर टक्के सुरक्षित घरगुती उपायामुळे तीन दिवसातच तुम्हाला फरक अनुभवायला मिळेल. धन्यवाद..

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *