वनस्पती एक फायदे अनेक, या 3 पानाचा असा दुहेरी वापर करा स्पोंडेलीसीस, गुडघेदुखी कायमची बंद…

नमस्कार मित्रांनो आपले स्वागत आहे. जे आजार दवाखान्यात बरे होत नाहीत किंवा दवाखान्यामध्ये खूप खर्चिक असतात असे आजार सहजरित्या बरे करणाऱ्या काही वनस्पती या आपल्या आसपास असतात. याचा जर आपण वापर केला तर अगदी असाध्य रोगसुद्धा बरे होतात, म्हणून आयुर्वेदाला इतकं महत्त्व आहे. जर तुम्हाला मानदुखीचा, पाठदुखीचा त्रास असेल, मणक्यातील चकती सरकली असेल, सांधेदुखीचा त्रास असेल, सांध्यावर सूज असेल किंवा कंबरदुखी आणि गुढघेदुखीचा त्रास असेल तर तो पूर्णपणे घालवण्यासाठी ही वनस्पती अत्यंत उपयोगी आहे.

चार पाच पानाचा आपल्याला वापर करायचा आहे. दोन प्रकारे आपल्याला याचा वापर करता येतो. ही वनस्पती चिकूनगुण्या आणि मलेरिया यांसारख्या आजारांवर सुद्धा इतकी गुणकारी आहे की चिकूनगुण्यामुळे सांध्याला जी सूज येते ती दवाखान्यातील गोळ्या खाऊन सुद्धा कमी होत नाही. ती या औषधाने तीन दिवसांमध्ये बरी होते. म्हणून या वनस्पतीला काही भागामध्ये चिकूनगुण्याचे झाड सुद्धा म्हटले जाते. इतकी जबरदस्त ही वनस्पती आहे. ही जी वनस्पती आहे प्रत्येक आजारासाठी कसा वापर करायचा,

स्पॉंडेलिसिस साठी कसा करायचा, कंबरदुखी साठी कसा, गुढघेदुखीसाठी, चिकणगुण्या, मलेरिया साठी कसा या सर्व गोष्टी आपण पाहणार आहोत. ही जी वनस्पती आहे ती सहजरित्या प्रत्येक ठिकाणी उपलब्ध होणारी ही आहे परिजातक किंवा प्राजक्ता नावाची वनस्पती. याला हिंदीमध्ये शेफाली असे म्हणतात. इंग्लिशमध्ये याला नाईट फ्लॉवरिंग जामसीन असे म्हणतात. रात्रीची फुलं येतात म्हणून याचं नाईट फ्लॉवरिंग जासमीन असे म्हणतात आणि याच त्याच्या गुणधर्मावरून याला रातराणी सुद्धा म्हटले जाते.

जर तुम्हाला स्पॉंडेलिसिसचा त्रास असेल, कंबरदुखीचा त्रास असेल तर तो पूर्णपणे घालवण्यासाठी ही वनस्पती अत्यंत उपयुक्त आहे. तर या वनस्पतीची पाने आपल्याला आणायची आहेत आणि स्वच्छ धुवून घ्यायची आहेत. दोन प्रकारे आपल्याला वापर करता येतो. तर या वनस्पतीच्या गोळ्या बनवून ठेऊ शकतो आणि गोळ्या बनवून सुद्धा खाऊ शकतो किंवा याचा काढा सुद्धा बनवता येतो. पाच पाने आपल्याला धुवून घ्यायची आहेत.

स्वच्छ धुवून त्याला एक ग्लास पाण्यामध्ये टाकून अर्धा ग्लास होईपर्यंत त्याला उकळून घ्यायचे आहे आणि उकळून घेतलेला काढा थंड झाल्यानंतर आपल्याला उपाशीपोटी किंवा जेवणानंतर एक तासाने घ्यायचा आहे. सलग सात दिवस तुम्ही हा उपाय करा. सांध्यावरची सूज आली असेल तर पूर्णपणे निघून जाईल. मणक्यामध्ये त्रास असेल तर तो बंद होईल आणि त्याचबरोबर या सात दिवसामध्ये जर तुम्हाला चिकूनगुण्या झाला असेल तर चिकूनगुण्यामुळे सांध्याला जी सूज येते ती सुद्धा पूर्णपणे निघून जाते.

काही जणांना तर चिकूनगुण्या झाल्यानंतर कायमस्वरूपी सांधेदुखीचा त्रास सुरू झालेला आहे. तो कायमस्वरूपी सुरू झालेला सांधेदुखीचा त्रास या औषधी वनस्पतीने निघून जातो. मलेरिया झालेला असेल तर मलेरिया झालेल्या व्यक्तींसाठी ही वनस्पती अत्यंत गुणकारी आहे. मलेरियासाठी या वनस्पतीचा असा वापर करायचा आहे, याची चार पाच पाने आणायची आहेत आणि स्वच्छ धुवायची आहेत. स्वच्छ धुवून घेतल्यानंतर ही पाने आपल्याला वाटून घ्यायची आहेत.

वाटून घेतलेल्या पानामध्ये एक चमचा हळद आणि थोडासा गुळ टाकून आपल्याला छोट्या छोट्या गोळ्या बनवायच्या आहेत. जेवढ्या गोळ्या बनतील तेवढ्या बनवायच्या आहेत आणि थोड्या थोड्या वेळच्या आकाराने दिवसभरामध्ये आपल्याला संपवून टाकायच्या आहेत. मलेरिया सारखा आजार सुद्धा याने पूर्णपणे निघून जातो आणि मलेरिया आणि चिकूनगुण्या होऊ नये म्हणून सुद्धा या गोळ्यांचा वापर करता येतो. जर दिवसातून दोन गोळ्या घेतल्या तर दहा अकरा दिवस तर मलेरियाच्या विरुद्ध जी प्रतिकारशक्ती असते ती आपल्याकडे निर्माण होते.

चिकूनगुण्या विरुद्धची प्रतिकारशक्ती आपल्यात निर्माण होते आणि आपल्याला तो आजार होत नाही. परिजातकाची विशेषतः अशी आहे की शरीरामध्ये अनेक रोग होण्याचे मुळ कारण असते आपलं रक्त आमलयुक्त होणे, रक्त ऍसिडीक होणे. परिजातक ही अशी वनस्पती आहे की जी अल्कलाइन आहे आणि या वनस्पतीच्या रसामुळे रक्तामधील आम्लता दूर होते त्यामुळे स्पॉंडेलिसिसचा त्रास असेल, चेताधा असेल, संधीवाताचा त्रास असेल अशा प्रकारचे अनेक विकार त्याचबरोबर त्वचारोग, पोटमधील जंत, तापाचे प्रकार वेगवेगळे हे सर्व निघून जातील.

ही जी वनस्पती इतकी महत्वाची आहे या वनस्पतीला श्रीकृष्णाने स्वर्गातून जमिनीवर आणलं असे महाभारतामध्ये वर्णन आहे. तसेच आयुर्वेदाच्या प्रत्येक ग्रंथामध्ये या वनस्पतीच्या आयुर्वेदिक औषधीचे गुणधर्म सांगितलेले आहेत. इतकी जबरदस्त ही वनस्पती आहे.

तर मलेरिया, चिकूनगुण्या, पाठदुखी, कंबरदुखी, स्पॉंडेलिसिस यासाठी या वनस्पतीचा सलग अकरा दिवस वापर करा. अत्यंत उपयुक्त ही वनस्पती आहे. जमलस्तर ही वनस्पती अवश्य तुमच्या घरासमोर लावा. या वनस्पतीची फुलं तर मिळतातच त्याचबरोबर आयुर्वेदिक फायदे सुद्धा खूप आहेत. तर या वनस्पतीचा अवश्य वापर करा. धन्यवाद..

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *