75 रीत 25 चा उत्साह आणि जोर, आजचा खात्री करा…

नमस्कार मित्रांनो आपले स्वागत आहे. पुरुषांच्या विविध प्रकारच्या कमजोरी असतील, पचना संबंधीच्या तक्रारी असतील, तुमच्या बॉडीमध्ये टॉक्सिक साठले असेल, तोंड आणि दात यांच्या समस्या असतील, झोप व्यवस्थित येत नसेल किंवा त्वचेच्या समस्या असतील, त्वचेवर डाग असतील, जुन्या जखमांचे व्रण असतील, तुमच्या शरीरामध्ये विविध प्रकारच्या वेदना असतील, सांधेदुखी व गुढघेदुखी असेल किंवा तुमच्या घरामध्ये लहान मुले असतील तर हे जायफळ तुमच्या घरामध्ये असायलाच पाहिजे.

पावसाळ्यात तर असायलाच पाहिजे. तुम्ही जायफळ हे चहा, कॉफी, दुधात, मिठाईत स्वादासाठी वापरतात हे तुम्ही ऐकलं असेल. पण याचा औषधात देखील खूप मोठ्या प्रमाणात वापर केला जातो. हे जे मोठं टपूरं फळ आहे हे उत्तम प्रतीचे फळ वर्षानुवर्षे टिकू शकते. आयुर्वेदिक उपयोग असणारे हे जायफळ फळ आहे. किती प्रमाणामध्ये खाल्लं पाहिजे, कसं खाल्लं पाहिजे आणि याचा उपयोग कसा करायचा हे आपण पाहणार आहोत.

यामध्ये अनेक प्रकारचे व्हिटॅमिन असतात, मिनरल्स असतात, फायबर, मॅग्नेशियम, लोह, व्हिटॅमिन B3 आणि B6 मोठ्या प्रमाणात असते. सर्वात महत्वाचा उपयोग आहे तो पुरुषांसाठी खूप महत्वाचा आहे. जर पुरुषांना विविध प्रकारची समस्या जाणवत असेल, यौन संबधी समस्या असतील किंवा पुरुषांमध्ये संभोगासाठी तयार होण्यात अडचणी निर्माण होत असतील तर हे जे फळ आहे ते अतिशय उपयुक्त आहे.

तर काय करायचे आहे तर याचा अगदी थोड्या प्रमाणामध्ये म्हणजे 250 ते 500 मिली ग्रॅमपर्यंत म्हणजे एक चुटकीभर किंवा पाव चम्मच मधून अर्धा भाग या जायफळाचा घ्यायचा आहे. संध्याकाळी झोपताना जेवण केल्यानंतर हे जायफळ मधामध्ये घ्यायचे आहे. पचनक्रिया जर चांगली नसेल तर पचनक्रियेमध्ये सुद्धा हे जायफळ खूप महत्त्वाचे काम करते. पोटाचा त्रास असणाऱ्या व्यक्तींनी हे जायफळ नेहमी आहारामध्ये ठेवलं पाहिजे. गॅस असेल, अपचन असेल, पोटात दुखणे अशा अनेक समस्या निघून जातात.

स्मरणशक्ती सुद्धा या जायफळाच्या उपयोगाने वाढते. तुमच्या जेवणामध्ये जायफळाचा भाग वापरला तर याच्यामध्ये मेरीस्टिकन नावाचा घटक असतो. त्याचबरोबर मेलीघ्ना नावाचा घटक असतो. हे जे दोन घटक आहेत ते मेंदूला चालना देतात. त्यामुळे तुमची स्मरणशक्ती वाढते. बऱ्याच जणांना वयाने अल्झायमरचा त्रास आलेला असतो. अल्झायमरचा त्रास काढून टाकण्यासाठी ही अतिशय उपयुक्त फळं आहेत. सहजरित्या उपयुक्त ही फळ उपलब्ध होतात.

शरीरामध्ये आणि रक्तामधील सर्व टॉक्सिक काढण्याचे काम हे जायफळ करत असते. शरीरामध्ये विविध मार्गाने हे टॉक्सिक आहे ते जमा होत असतात. तुम्ही जी विविध प्रकारची व्यसने करता, विविध प्रकारचे अन्न खाता, अन्न, दारू, व्यसने यामुळे टॉक्सिक हे आपल्या शरीरामध्ये साठत असते. लिवरमध्ये, किडणीमध्ये साठते आणि त्यामार्फत अवयवांमध्ये सुद्धा जाऊन बसत असते. ते काढण्यासाठी जायफळ खूप चांगल्या रीतीने काम करते. किडनी स्टोन आणि लिव्हर सारखे आजार आहेत ते बरे करण्यासाठी महत्वाचा उपयोग होतो.

याची सांगितल्याप्रमाणे थोड्या प्रमाणात पूड एकतर तुम्हाला कोमट पाण्यामध्ये किंवा मधामध्ये घ्यायची आहे. जेवण केल्यानंतर किंवा सकाळी नाष्टा केल्यानंतर तुम्हाला हे घ्यायचे आहे. तोंड किंवा दाताचा त्रास असेल तर जायफळामध्ये जे अँटीबॅक्टरीयल गुणधर्म असतात, तोंडामधले हॅलोटॉयसिस सारखे तोंडामधले बॅक्टेरिया मारतात. ज्यामुळे तोंडातून दुर्गंध येण्याची समस्या असते, अनेक जणांना तोंडाचा वास येण्याची समस्या असते तर या जायफळच्या पावडरने तुम्ही जर दात घासले किंवा हिरड्यावर हलक्या हाताने मसाज केला तर तुमच्या तोंडामधून वास येण्याची समस्या पूर्णपणे निघून जाते.

त्याचबरोबर तुमचा दात दुखत असेल तर या जायफळाची पावडर कापसामध्ये धरायची, त्याचा बोळा करायचा आणि ते जर दातावर धरलं तर दोन मिनिटांमध्ये दात दुखण्याची समस्या निघून जाते. बऱ्याच जणांना झोप लागत नाही. त्यासाठी ही जायफळ आहे ती सांगितल्याप्रमाणे 250 ते 500 मिलिग्रॅम किंवा पाव चमचा मधून अर्धा भाग तुम्ही रात्री झोपताना दुधामधून घेतलं तर खूप चांगल्या रीतीने झोप लागते. तुम्ही मसाल्याच्या पदार्थामध्ये जायफळ वापरले असेल तर तुम्हाला वेगळे जायफळ घ्यायची गरज पडत नाही. त्वचा रोगावर सुद्धा फार उपयुक्त असे फळ आहे.

जर तुमच्या त्वचेवर डाग पडले असतील किंवा जुन्या जखमांचे शरीरावर व्रण असतील तर हे व्रण घालवण्यासाठी सुद्धा हे जायफळ उपयुक्त आहे. या जायफळाची पावडर मधामध्ये मिक्स करून ज्या ठिकाणी जखमेचा व्रण आहे किंवा काळा डाग आहे त्या ठिकाणी लावला आणि सलग सात ते आठ दिवस हा उपाय केला तर जो काळा डाग आहे तो सहजरीत्या निघून गेलेला असेल. जायफळामध्ये मॅनथॉल नामक घटक असतो. जो पेनरिलिव्हरचं काम करत असतो.

या कारणास्तव रोजच्या भाजीमध्ये समावेश केला तर तुमच्या ज्या वेदना आहेत, गुढघेदुखीच्या असतील, सांधेदुखीच्या असतील किंवा तुम्हाला कंबरदुखीची समस्या असेल, पाठदुखीची समस्या असेल तर जायफळाच्या वापराने पूर्णपणे निघून जातात. फक्त जायफाळचा वापर आहे तो जास्त दिवस करायचा नाही. सांगितल्याप्रमाणे सात ते आठ दिवस जायफळाचा वापर करायचा आहे. ज्या पुरुषांना कमजोरी आहे त्या पुरुषांनी सांगितल्याप्रमाणे या जायफळाचा वापर आहे तो मर्यादित प्रमाणे मधामधून करायचा आहे. पहिल्या दिवसापासून याचा फरक जाणवेल.

आणखी एक याचा वापर असा आहे की जर तुमच्या घरामध्ये लहान मुले असतील तर सर्दी, खोकला या पावसाळ्यामध्ये अवश्य होत असतो, कफ होत असतो. जायफळाचा उपयोग नऊ महिन्याच्या पुढच्या बाळांसाठी करू शकतो. तर जायफळ दुधामध्ये किंवा आईच्या दुधामध्ये उगळून त्याचा लेप तयार करायचा आहे. लेप कपाळावर आणि छातीवर दिला तर छातीमध्ये साठलेला कफ आणि सर्दी तात्काळ थांबून जाते. हा साधा आणि सोपा उपाय करा.धन्यवाद..

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *