लोखंडाची कढई चमकविण्याची सोपी पद्धत- लोखंडाचा तवा कसा साफ कराल…

चपाती किंवा रोटी बनविता बनविता कितीतरी वेळा आपला तवा ज्यावर आपले पीठ जळते, चिकटते त्यामुळे आपल्या तव्यावर खूप प्रमाणात कार्बन एकत्र होतो. त्यामुळे आपला तवा खूप खराब दिसतो. आपल्याला त्यावर परत चपात्या करण्याची इच्छा होत नाही व आपण केल्या तरी आपल्या चपात्या व्यवस्थित होत नाहीत, काळ्या होतात नाहीतर जळतात.

आज मी तुम्हाला खूप जबरदस्त असा उपाय सांगणार आहे, जळलेला तवा, तव्यावर कार्बन तयार झालेला असेल तर घरी तो सहजपणे कसा स्वछ करता येईल ते मी आज तुम्हाला दाखविणार आहे. माझी अशी कोणती जादू आहे ज्यामुळे जळलेला तवा सहजपणे स्वछ होईल. घरी आपण जळलेला तवा कशा प्रकारे स्वछ करू शकतो ज्यामुळे आपल्याला जास्त मेहनत न करता तो स्वछ करता येईल.

मी ३, ४ वेगवेगळ्या टिप्स किंवा सूचना देणार आहे त्यापैकि तुम्हाला जी पद्धत आवडेल ती तुम्ही वापरू शकता. आपण चपाती करतो तेव्हा त्याचे पीठ तव्याला चिकटते व त्या जागी जास्त प्रमाणात कार्बन जमा होतो. जेव्हा आपण खास करून पराठे शेकतो, तेव्हा आपला तवा जास्त प्रमाणात जळतो.

माझा पहिला उपाय आहे, की आपण तव्याला कोणत्याही आंबट वस्तूने साफ करा. आंबट वस्तु अॅसिडिक असते. अॅसिडिक वस्तु ज्या असतात, ते मळ, कार्बन यांना दूर करतात. तर आंबट वस्तूंमध्ये तुम्ही व्हीनेगर घ्या, किंवा लिंबू घ्या. मी तुम्हाला एका वस्तूने तवा साफ करून दाखवते आहे. प्रथम तवा गॅसवर गरम होत ठेवा.

जेव्हा तवा खूप चांगला गरम होईल, तवा मोठ्या आचेवर तुम्ही उलटा पण ठेवू शकता. तेव्हा आपण त्यावर घालणार आहोत, खायचा सोडा. १५ ते २० मिनिटे सोडा तव्यावर ठेवा. नंतर व्हीनेगर घालून तवा घासणीने घासायचा आहे. नंतर लिक्विड सोपने धुवा. तवा चमकू लागेल.

दुसरे म्हणजे मीठ- मीठ गॅसवरील तव्यावर घालून ते सगळीकडे पसरा. तवा घासणीने घासा. मीठ ब्राऊन होऊ लागेल. मीठ काढून घ्या. गरम तव्यावर लिंबूचा रस घाला. गॅसची आच मंद करा व लिंबू तव्यावर घासा. मधून मधून लिंबाचा रस त्यावर घालत राहा. खूप घासा. व्हीनेगर घालून घासणीने घासून काढा. आपला तवा स्वछ होऊ लागेल. नंतर लिक्विड सोपने साफ करा. परत लिंबाचा रस घालून जिथे खराब आहे तिथे साफ करा.

स्क्रबरने लिक्विड सोप टाकून तवा साफ करा. १ ते २ थेंब पाणी घाला व घासा. आता मी तुम्हाला तवा धुवून दाखवते आहे. कुठेही तुम्हाला काळेपणा दिसणार नाही. तुम्हाला कोठेही कार्बन जमा झालेला दिसणार नाही. आता तवा सुक्या कपड्याने पुसून ठेवा. आमची माहिती आवडली असेल तर जरूर लाइक व शेअर करा.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *